बारावी नापास मुलगा अलोक खिशमतराव बनतो एम पी एस सी टॉपर
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने उठणाऱ्या नजरा आदराने झुकतात. वाघाचे पिल्लू एकदा मेंढ्यांच्या कळपात चुकून शिरलं तेव्हा तेही मेंढ्यांच्या बरोबर मे मे करत होत. एकदा चुकून ते आरसा बघत आणि म्हणत, अरे मी तर वाघ आहे. तुम्ही वाघा आहात आणि हे जंगल तुमचा आहे आणि या जंगलाचे तुम्ही राजे आहात.
अलोक हे लहानपणापासूनच खूप हुशार होते .दहावीला चांगले मार्क मिळाले म्हणून अकरावीला सायन्स ला ऍडमिशन घेतले. कॉलेज घरापासून लांब होतं. घरापासून पहिल्यांदाच दूर. जुने मित्र नाहीत ,म्हणून करमेना. अभ्यासात लक्ष लागेना .कॉलेजमध्ये जावे त्यामुळे ते सुरुवातीला टंगळमंगळ करत राहिले नुसतेच घरी लोळत राहिले, परिणामी बारावी मध्ये ते नापास झाले. बारावीची दुसर्यांदा परीक्षा दिली, तेव्हाही नापास झाले. तिसऱ्यांदा परीक्षा देताना तर अभ्यासक्रम बदलला होता, दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना त्याप्रमाणे . पूर्ण अभ्यासक्रम बदलला होता सगळे नातेवाईक म्हणाले पहिली ते दहावी पैकीच्या पैकी मार्क पडणारा बारावीला नापास त्यामुळे मीच सर्व नातेवाईकांना फोन करून सांगितलं मी नापास झालो आहे.
नवीन अभ्यासक्रमाचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी परीक्षा दिली. 55 टक्क्यांनी पास झाले. पण अभ्यासाची त्यांची इच्छा व कॉन्फिडन्स संपला होता. आता शिकून काय उपयोग नाही म्हणून मोबाईल रिचार्ज दुकानात काम केलं. ग्रॅज्युएशन करून तरी काय करणार पण घरच्यांच्या सततच्या बोलण्यामुळे बीए ऍडमिशन घेतलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून. बीए पास झाले पण ग्रॅज्युएशन झालेल्याला कोठे नोकरी मिळणार आणि चांगली कशी मिळणार मग त्यांनी झेरॉक्स सेंटर मध्ये काम केलं. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम केलं. सर्टिफाइड जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम केलं. काही दिवस दुकान सुरू केलं, व्याजाने पैसे घेतले पण चार महिन्यात दुकान बंद पडलं अडचणी येत होत्या ,पण कुटुंबानं साथ दिली.या परिस्थितीतही आई वडील व बहीण त्यांच्या पाठीशी उभी होते.
एक दिवस असेच पेपर वाचत असताना एमपीएससी यूपीएससी टॉपर जाहिरात पाहिली टॉपर्स चे फोटो पाहिले माझाही फोटो येथे आला पाहिजे ठरवलं मग माझ्या मनाने ठरवलं आहेस हीच वेळ आहे डरकाळी फोडायची अभी नही तो कभी नही.
तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक .आयुष्यात पुन्हा त्यांनी आणीबाणी आणली .गंज चढलेल
मस्तक घासाल ते पुण्यात आले रूम पाहायला सुरुवात केली .ते म्हणतात की सहा बाय सहा ची रूम. तेथे व्हेंटिलेशन देखील कमतरता होती. आलाराम नसताना दोन ते तीन वाजता उठवायचे ते ढेकूण. सततचा गोंगाटपण डोळ्यासमोर होत 2019 ची पास झाली पण फिजिकल टेस्ट झाले त्यांना रिकव्हर व्हायला चार महिने लागले तीन जिल्हे व चार तालुक्यातील पाच डॉक्टरांचा सल्ला त्यांनी सल्ला व उपचार त्यांनी घेतले झाले ते सांगतात कोणत्या डॉक्टरांच्या उपचाराने फरक पडला माहिती नाही पण फायदा मात्र नक्की झाला
फिजिकल टेस्ट घेत असताना ग्राउंड वर ॲम्बुलन्स होती तेव्हा ठरवलं की आता या ॲम्बुलन्स सारखं धावायचं ,थांबायचं नाही .त्यांना फिजिकल टेस्ट मध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळाले. महाराष्ट्र पोलीस सेवेच्या परीक्षेत ग्राउंड वर शंभर पैकी शंभर मार्क मिळवायची सुरुवात ते म्हणतात आमच्या पासून सुरु झाली.
आठ मार्च महिला दिनाच्या दिवशी त्यांचा रिझल्ट लागला .महाराष्ट्र ते 13 वे आले होते.आणि त्यांनी आईला महिला दिनाच् गिफ्ट दिलं.
ते सांगतात कोणतेही क्षेत्र असू दया तेथील टॉपर बना. रिलेशन , करंट अफेअरमुळ प्रोत्साहन मिळत असेल तर ठीक पण कधीकधी अभ्यास होत नाही .अपयश येतं व परिणामी वाटोळे होत त्यामुळे पहिल्यांदा येते Distraction त्यानंतर येते Dipression व नंतर येतं ते distruction. त्यामुळे सर्वांनी आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवा. तिला विचारा आपण कोणत्या मार्गाने जात आहोत ते. आणि कोणत्या मार्गाने जायला हवं. ध्येयाच्या कामगिरी करा.
लढण्याचा इतिहास आमचा , हारणे माझ्या रक्तात नाही., जोवर उभा मैदानात मी, हारणे नियतीला माहिती नाही.
एमपीएससी परीक्षा पास होण्यासाठी परीक्षार्थी प्रयत्न करतात. ते प्रयत्न करत असताना आपल्या क्षमतेच्या शंभर टक्के देतात .त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे ते त्याच्या शंभर टक्के देतात. जिद्द ,चिकाटी, भरपूर काम करण्याची क्षमता याच्या जोरावर अनेक परीक्षार्थींनी एमपीएससी परीक्षा दिलेली आहे. आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत. काहीच नाही तर आपल्याला हवे ती पोस्ट प्राप्त होईपर्यंत परीक्षा दिलेल्या आहेत. त्यामुळे तूटो हे शरीर फूटो हे श हे मस्तक या उक्तीप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले व आपल्या क्षमतेच्या शंभर टक्के दिले त्यामुळे त्यांचे पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाले.
आपणास जर हा लेख आवडला असेल तर इतरांना देखील फेसबुक ,व्हाट्सअप या सारख्या सोशल मीडियाच्या द्वारे तो शेअर करा व यावर काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. जेणेकरून त्याचा फायदा आपल्यासारखा सर्वांनाच होईल.