3 life changing tips व 4D formula मुळे रश्मी तलेवार बनल्या sale tax inspector

0
275

3 life changing tips व 4D formula मुळे रश्मी तलेवार बनल्या sale tax inspector

“नारीशक्ती को कभी नजरअंदाज मत करना क्योकी इस के तेवर बदलते है तो  इतिहास बदलता है “. 

          रश्मी तलेवार यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील  छोट्याशा आदिवासी गावात झाला. घरी आई-वडील आजी आजोबा दोन भाऊ ,एक बहीण व त्या स्वतः असे आठ जण एका कुटुंबामध्ये राहत होते .वडील पोलिसांमध्ये ठाणेदार होते .त्यामुळे घरचं वातावरण कडक शिस्तीचं 

 होतं. वडील घरी कमी व बाहेर जास्त होते. वडिलांच्या सतत बदल्या होत असत. त्यामुळे त्या सांगतात माझ्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणामध्ये मला सात वेळा शाळा बदलावी लागली. त्यामुळे आपसूकच त्यांना सेल्फ स्टडी व परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय लागली. त्यांच ग्रॅज्युएशन ही असंच झालं. घरामध्ये पैशांची कमी नव्हती पण आयुष्य स्थिर नव्हतं.

                एसटीआय ऑफिसर होण्यामागे त्यांच्या आयुष्यामध्ये तीन टर्निंग पॉईंट घडले. एकदा एका गावाला आई-वडिलांसोबत गाडीतून जातअसताना काही कारणावरून आई-वडिलांमध्ये प्रचंड भांडण झालं. वडिलांचा स्वभाव तापट असल्याने त्यांनी रस्त्यातच त्यांना व आईला सोडून पुढे गेले .त्यांना काही सुचेना. वाहनांची वर्दळही कमी होती. त्यानंतर तासाने  ते त्यांना न्यायला परत आलेहि परंतु या प्रसंगानंतर आपण वडिलांवर अवलंबून आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि तेव्हाच त्यांना त्यांच्या आयुष्याचा पहिला लेसन मिळाला.

   जगाने त्यांना ठाणेदाराची मुलगी किंवा कोणाची तरी बायको म्हणावं हे त्यांना मान्य नव्हतं .त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची होती .या सर्वातून त्यांना एमपीएससीचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली या सर्व प्रकारातून त्यांनी किमान गॅझेटेड ऑफिसर ची पोस्ट मिळवायची असं ठरवलं. ती काळोखी रात्र त्यांच्या आयुष्यात प्रेरणादायी सोनेरी प्रकाश देणारी ठरली.

आयुष्यात एक  रात्र अशी येथे जी सोनेरी प्रकाश देणारी ठरते. आपला जन्म हा जगण्यासाठी झालेला नसून जिंकण्यासाठी झालेला आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

            त्यांच्या आयुष्यातील दुसरा टर्निंग पॉइंट म्हणजे एक दिवस कॉलेजमध्ये असताना वडिलांबद्दल आक्षेपार्ह बातमी छापून आली. त्यामुळे  कुटुंबामध्ये कलह निर्माण झाले. त्यावरून बरेच  लोक त्यांना खूप चिडवायचे, काही जवळचे मित्र होते. काही मैत्रिणी वर्तमानपत्र हातात धरून जाणीवपूर्वक आजूबाजूला फिरत होत्या. दबक्या आवाजात बोलत होत्या. हे सर्व पाहून त्यांना खूप वाईट वाटायचं . खूप त्रास व्हायचा खूप  हताश व्हायच्या. त्यामुळे कॉलेजमध्ये जात नव्हत्या. त्यांच्या आई वडील व भाऊ बहीण यांनी त्यांना त्याकाळात खंबीर साथ दिली. त्यांनी ठरवलं की पुन्हा कॉलेजमध्ये जायचं. काहीही चूक नसतान घरात लपुन बसण्यापेक्षा सर्व परिस्थितीचा सामना करायचा त्यांनी ठरवलं हा त्यांना दुसरा life lessonमिळाला. यातून कोण आपलं कोण परकं हे समजलं जगाचा अनुभव आला. या सर्वांमधून  अभ्यास करण्याशिवाय पर्याय नव्हता हे समजलं.

                 रश्मी यांनी ग्रॅज्युएशन पासूनच एमपीएससीची माहिती काढायला सुरुवात केली होती. वडील अधिकारी असल्याने त्यांनी नेहमी त्यांच्या अवतीभोवती अधिकारी लोक असलेली पाहिलं होतं त्यामुळे त्यांनीही अधिकारी व्हायचं ठरवलं.लहानपणापासूनच त्यांनी अभ्यास ,भाषण, खेळ यामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. कॉलेजमध्ये त्या सर्वात हुशार. सतत तीन वर्ष Best student award त्यांना मिळालेले होतं. प्राध्यापक व युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह ऑलराऊंडर असल्यानं त्यांना त्यांच्या शिक्षकांनी खुप आधार व प्रेरणा दिली. रश्मी यांनी त्यांचे सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. दिवस-रात्र ते अभ्यासच करत होते.

                नातेवाईकांनी टीका केली. तू काय अधिकारी होणार? यावरून त्यांना तिसरा लाइफ लेसन मिळाला. अभ्यास करताना निराश व्हायला व्हायचं. त्या सांगतात यशाची उंची गाठताना कष्ट करायला विसरू नका. 2018 झाली फ्री एक्झाम मेंस आणि इंटरव्यू मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडी करून वयाच्या बाविसाव्या वर्षी त्या सेल टॅक्स इंस्पेक्टर झाल्या. घरी सगळे खुश झाले पण त्यांना एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. त्यांनी त्यांच्यावरचा पद मिळवायचे ठरवलं एमपीएससी चा अभ्यास चालू ठेवला. या प्रवासात त्यांना त्यांचा मित्र प्रशांत भेटला व पुढे त्यांचा पती झाला. त्यांनीही या कामात त्यांना खूप मदत केली. त्या वित्त व लेखाधिकारी झाल्या. त्यांना हवं ते परत त्यांनी मिळवलं याचा त्यांना खूप आनंद झाला. आपल्या मुलींने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं यामुळे आई-वडील व बहिण भाऊ यांना आनंदाश्रू अनावर झाले.

      ”  खुशियो से गिरते नही फुल झोली मे,

 वक्त की शाखो मे उसको झुला ना पडेगा

 कुछ नही होगा अंधेरे को बुरा कहकर

अपने हिस्से का दिया खुद जला ना पडेगा .,”

            जन्म व मृत्यू हे आपल्या हातात नसले तरी त्या दोन्ही मधील आयुष्य हे आपल्या हातात आहे. ते जास्तीत जास्त सुखी, समृद्धी व यशस्वी करणं आपल्या हातात आहे .आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपले यश आपल्याच हातात आहे ते आपण तळहाताच्या रेघोट्या मध्ये बघतो. मन, मेंदू व मनगटाच्या योग्य संयोग साधला तर यशस्वी होण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकणार नाही. आजच आपलं स्वप्न निश्चित करा असं त्या सांगतात.

              तसेच त्यांनी 4D फॉर्मुले सांगितले आहेत. 

 First  D म्हणजेच  Dream big and decide your goal .

 कल्पना ,स्वप्न व वास्तव यामध्ये आपण कार्यरत असतो. मोठी स्वप्ने बघा, ध्येय निश्चित करा व त्यासाठी जोरदार प्रयत्न करा.

Second D. 

Develop the positive attitude and confidence.

 निराशावादी माणसे प्रत्येक संधी

 मध्ये अडचणी शोधतात तर आशावादी माणसे प्रत्येक संकटात संधी शोधतात.

Third D

Dare and fight

महान गोष्टींचा जन्म हा अंतकरणातून केलेले प्रयत्न व संघर्ष यातून होत असतो. संघर्षाचे हसतमुखाने स्वागत करा यातूनच सोनेरी झळाळी मिळते.

Forth D

Don’t stop till the goal is achieved.

कष्ट ,मेहनत, जिद्द व चिकाटी याशिवाय यश मिळायला पर्याय नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here