अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023 मराठी : ऑनलाइन फॉर्म PDF, पात्रता, लाभ

0
226
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023 मराठी : ऑनलाइन फॉर्म PDF, पात्रता, लाभ

Maharashtra Atal Construction Workers Awas Yojana (Rural) 2023 | Online Form PDF | Atal Bandhakam Kamgar Awas Yojana 2023 | सरकारी योजना | महाराष्ट्र सरकारी योजना | बांधकाम कामगार योजना | अटल आवास योजना | अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)

भारत देश हा विकासशील देश आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात आहे, तसेच लोकसंख्येमुळे लोकवस्त्या दाट आहेत यामुळे शहरिभाग असो किंवा ग्रामीणभाग राहण्यासाठी घरांची कमतरता आहे या समस्येकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष दिल्या जात आहे, महाराष्ट्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक, असंघटीत कामगार यांची आर्थिक सहायता करत असते या नागरिकांसाठी विवध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

या योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाने शहरीभागातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांच्या निवासाच्या समस्येकडे लक्ष देऊन कामगारांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली, यामध्ये ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना समाविष्ट करण्यात आले नव्हते, परंतु केंद्र सरकारने जून 2015 मध्ये देशातील प्रत्येक कुटुंबांना राहण्यासाठी स्वतःचे हक्काचे घरकुल असावे या धोरणावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) ग्रामीण भागातील कामगारांसाठी अटल  बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेस मंजुरी आणि अर्थ सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. वाचक मित्रहो, या लेखात आपण अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेविषयी संपूर्ण माहिती जसेकी योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया, योजनेसाठी लागणारी पात्रता, या योजनेचे लाभ इत्यादी सर्व माहिती पाहणार आहोत.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023 संपूर्ण माहिती मराठी

महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिनांक 30 ऑक्टोबर 2018 रोजीच्या बैठकीत ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागातील त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर घरकुल बांधण्यासाठी किंवा त्यांच्या सध्याच्या अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे बांधकाम करून त्याला पक्के घर करण्यासाठी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत योजना राबविण्यासाठी आणि या योजनेच्या अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्यता देण्याच्या ठरावास मंजुरी देण्यात आली.

राज्यामध्ये बांधकाम निर्माण क्षेत्र मोठयाप्रमाणात रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते, यामुळे या क्षेत्रात मोठया प्रमाणात असंघटीत कामगार आहेत, राज्यातील ग्रामीण भागात सुद्धा बांधकाम कामगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे या कामगारांकडे मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत उदाः राहण्यासाठी पक्के घर, वीज, रस्ते, इत्यादी अशा असंघटीत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत नोंदणी करून ग्रामीण भागातील कामगारांना या सर्व मुलभूत सुविधायुक्त घरकुले उपलब्ध करून.

Atal Bandhakam Kamgar Awas Yojana (Gramin) 2023 Features (वैशिष्ट्ये)

महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात त्यांच्या स्वतःच्या जागेवर नवीन घर अथवा अस्तित्वात असलेले कच्चे घर, या कच्च्या घराचे बांधकाम करून पक्क्या घरकुलात रुपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण), कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबविण्याचे सुरु केले आहे आणि त्याचबरोबर यासाठी 1,50,000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील बांधकाम कामगार लाभार्थ्यांकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे, यासंदर्भात लाभार्थ्यांनी खरेदी केलेली जमीन आणि इतर संबंधित बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी शासनाकडून अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेचा लाभ घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून घर बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे. असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून आर्थिक सहाय्य मिळण्यास पात्र असतील.

ज्या बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2022 या योजनेचा लाभ घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून घर बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज सादर केलेला आहे, अशा लाभार्थी बांधकाम कामगारांना जमीन खरेदी व घरबांधणीच्या संबंधित बाबींसाठी लेलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 50,000/- रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येत आहे. आणि हे मंजूर आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात जवळपास 26 लाख बांधकाम कामगार आहेत, यापैकी सुमारे 12.5 लाख बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत आहे, या नोंदणीकृत कामगारांपैकी ग्रामीण भागातील जवळपास 4 लाख बांधकाम कामगारांकडे पक्के घर नाहीत. या सर्व बांधकाम कामगारांना घर बांधणीसाठी अर्थ सहाय्य करण्याचा शासनाचा उद्देश आहे. यासाठी त्यांच्याकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे.  

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ