अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023 मराठी : ऑनलाइन फॉर्म PDF, पात्रता, लाभ

0
142
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023 मराठी : ऑनलाइन फॉर्म PDF, पात्रता, लाभ

Maharashtra Atal Construction Workers Awas Yojana (Rural) 2023 | Online Form PDF | Atal Bandhakam Kamgar Awas Yojana 2023 | सरकारी योजना | महाराष्ट्र सरकारी योजना | बांधकाम कामगार योजना | अटल आवास योजना | अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)

अटल बांधकाम कामगार आवास योजना 2023 (ग्रामीण) Highlights

योजनाअटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)
व्दारा सुरुमहाराष्ट्र सरकार
योजनेची सुरुवात2018
लाभार्थीराज्याचे नोंदणीकृत कामगार
राज्यमहाराष्ट्र
उद्देश्यकामगारांना स्वतः चे हक्काचे घरकुल मिळावे म्हणून आर्थिक सहाय्य
अधिकृत वेबसाईटMahabocw.in
आर्थिक लाभघर बांधण्यासाठी 1.50 लाख पर्यंत आर्थिक सहाय्य
विभागमहाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
श्रेणीआवास योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) उद्दिष्टे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत ग्रामीण भागातील सुमारे चार लाख बांधकाम कामगार ज्यांच्या कडे पक्के घर नाहीत, तसेच घरा संबंधित मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत अशा ग्रामीण बांधकाम कामगारांना या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावणे त्याचबरोबर त्यांना सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा अत्यंत महत्वाचा शासनाचा उद्देश आहे. तसेच ग्रामीण भागातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देता यावे आणि त्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे जीवनयापन करता यावे हा शासनाचा उद्देश आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा निधी सहजतेने उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडून योजनेचा निधी लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यासाठी DBT मोडचा वापर करण्यात येत आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) योजनेचे स्वरूप

महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांमधून ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) कामगार यांच्या साठी मंजूर करण्यात आलेली अटल बांधकाम कामगार आवास योजनेची कार्यपद्धती आणि योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) असलेल्या बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी 1.50 लाख रुपये अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर (MGNREGA) निर्धारित असलेले 18,000/- रुपये त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी निर्धारित असलेले 12,000/- रुपये असे एकूण 30,000/- रुपये अनुदान 1.50 लाख यामध्ये समाविष्ट असल्यामुळे संबंधित योजनांचा पुन्हा लाभ देय राहणार नाही.

योजनेंतर्गत असणारे घरकुलाचे क्षेत्रफळ :-

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान 269 चौ. फूट इतके चटई क्षेत्र असलेले बांधकाम करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना 1.50 लाख एवढे अनुदान देय राहील. परंतु लाभार्थ्यांना त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम करण्याचे असल्यास, लाभार्थ्यांना ते स्वखर्चाने करावे लागेल.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी पात्रता

महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांमधून ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामाग्रांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेचा लाभ प्रती कुटुंबासाठी असून, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे राहील.

  • अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बांधकाम कामगार हा कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) असावा तथापि अर्ज करतांना पात्र लाभार्थी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
  • या योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारांचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • या योजनेमध्ये अर्जदार बांधकाम कामगाराने वर्षभरात किमान 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
  • या योजनेच्या अंतर्गत मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के, सिमेंट वाळूने बांधलेले घर नसावे. यासाठी पुरावा म्हणून स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक असेल.
  • या योजनेच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावाने स्वतःच्या मालकीची जागा असावी किंवा स्वतःच्या मालकीचे कच्चे घर असावे जेणेकरून त्या ठिकाणी पक्के घर बांधता येईल.
  • या योजनेंतर्गत बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करिता अनुज्ञेय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र किंवा शपथपत्र सादर करणे आवश्यक असेल.
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) योजनेचा लाभ प्रती कुटुंबासाठी आहे. एकदा लाभ मिळाल्यानंतर बांधकाम कामगार पुन्हा या योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार नाही.
  • कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

महाराष्ट्र अटल बांधकाम कामगार आवास योजना 2023 आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ मिळविण्याकरिता विहित अर्जासह खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असेल.

  • सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिकृत नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेले प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • 7/12 च उतारा / मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र
  • बँकेच्या पासबुकाची प्रत

अटल बांधकाम कामगार आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाची रचना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील घरकुलाची रचना खालीलप्रमाणे राहील.

  • घरकुलाचे संपूर्ण बांधकाम विटा, वाळू, सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर आणि एक बैठक हॉल यांचा समावेश असावा, यामध्ये शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहील.
  • जोत्यापासून घराची उंची कमीत कमी 10 फूट असावी.
  • छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंटचे पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास परवानगी राहील.
  • घराच्या दर्शनीभागावर मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) लावणे आवश्यक आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना जिल्हा स्तरीय लाभार्थी निवड समिती :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांमधून ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांसाठीच्या अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत केलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी अपर कामगार आयुक्त / कामगार उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 

जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती गठीत करण्यात येत असून समितीची रचना आणि कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे.

अपर कामगार आयुक्त / कामगार उपायुक्तअध्यक्ष
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणासदस्य
जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळसदस्य
उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळसदस्य सचिव 

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) योजनेची कार्यपद्धती

योजनेंतर्गत अर्ज करण्याची पद्धत :-

या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पात्र नोंदणीकृत कामगारांनी जिल्हा कार्यकारी अधिकारी / उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडे मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करावा.

बांधकाम कामगारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून अर्जदारांची पात्रता तसेच अर्जासोबत सादर केलेल्या कागद्पत्रांची जिल्हास्तरीय निवड समिती पडताळणी करेल आणि त्यात पात्र झालेल्या बांधकाम कामगारांची अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये (ग्रामीण) लाभार्थी म्हणून निवड करण्यात येईल.

उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांची तालुका निहाय यादी तयार करतील, सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील आणि त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करून देतील.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2022
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2022 
  • सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे ग्राम विकास विभाग यांच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण विभाग, नवी मुंबई यांचेकडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकामा पोटी निधी वर्ग करतील.
  • घरांच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्या टप्प्याने ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (PFMS) प्रणालीव्दारे बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
  • या योजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून 4 टक्के एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहील.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदअध्यक्ष
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणासदस्य
कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदसदस्य
उपकार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळसदस्य सचिव 

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अर्ज PDF ऑनलाइन डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र अर्जदार बांधकाम कामगारांनी अर्ज PDF ऑनलाइन डाऊनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
  • सर्व प्रथम तुम्हाला शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच्या अधिकृत वेबसाईटवर https://mahabocw.in भेट द्यवी लागेल.
  • या नंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल, या होम पेजवर स्क्रोल करून तुम्हाला ‘’कल्याणकारी योजना’’ हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करावे लागेल. किंवा थेट या लिंकवर https://mahabocw.in/welfare-schemes/ क्लिक करा.
  • आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला स्क्रोल करावे लागेल, या पेजवर स्क्रोल करून ‘’आर्थिक’’ विभागामध्ये ‘’अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
अटल बांधकाम कामगार आवास योजना अर्ज PDF
अटल बांधकाम कामगार आवास योजना अर्ज pdf  
  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर ‘’फॉर्म डाऊनलोड करा’’ हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा, या पर्यायावर क्लिक करताच योजनेचा फॉर्म डाउनलोड होईल.
  • महाराष्ट्र अटल बांधकाम कामगार आवास योजना 2022 (ग्रामीण) योजनेच्या अर्जाचा PDF नमुना खालीलप्रमाणे दिसेल.
योजना शासन निर्णय PDFइथे क्लिक करा
योजना अर्ज डाऊनलोड PDFइथे क्लिक करा 
शासन निर्णय PDFइथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटइथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) राबवीत आहे, या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यता करून ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि तसेच त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायमचा मिटावा, त्यांच्या जीवनमानत सुधारणा होऊन त्यांनाही जनसामन्यांप्रमाणे जीवन जगता यावे हा महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे, ग्रामीण भागातील बांधकाम कामगार बांधवांनी या योजनेचा मोठयासंख्येने लाभ घ्यावा. वाचक मित्रहो, या लेखामध्ये अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखा मधील माहिती आपल्याला आवडली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यामतून अवश्य कळवा.

महत्वपूर्ण सूचना :- सरकारी योजनांमध्ये वेळोवेळी सुधारणा आणि अपडेट होत असतात त्यामुळे लेख वाचल्या नंतर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अवश्य भेट व्द्यावी.

अटल बांधकाम कामगार आवास योजना 2023 (ग्रामीण) FAQ

Q. अटल बांधकाम कामगार योजना काय आहे ?

महाराष्ट्र सरकार अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना त्यांच्या स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेले कच्चे घर बांधून पक्के करण्यासाठी आर्थिक अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Q. या योजनेसाठी अर्ज कसा करावा ? 

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल त्यानंतरची प्रक्रिया वरील लेखामध्ये संपूर्ण दिलेली आहे, त्या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही अर्ज करू शकता.

Q. अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये किती अनुदान दिले जाते ?

या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेले कच्चे घर बांधून पक्के करण्यासाठी 1.50 लाख रुपये अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Q. अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) कोणासाठी आहे व योजनेसाठी पात्रता काय आहे ?

हि योजना महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील बांधकाम कामगार बांधवांसाठी आहे या योजनेसाठी सर्व बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांचे वय 18 ते 60 वर्षाच्या आत असावे लागते, तसेच या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराने वर्षभरात 90 दिवसांपेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे.

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ