भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना PDF- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2023

0
55
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना PDF- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2023

फळबाग लागवडीसाठी क्षेत्र मर्यादा किती?

  • या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी कोकण विभागासाठी कमीत-कमी ०.१० हेक्‍टर ते जास्तीत जास्त १० हेक्‍टर तर उर्वरित विभागांसाठी ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर मर्यादा पर्यंत अनुदान अनुज्ञेय राहील.
  • कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करू शकतो.
  • लाभार्थ्याच्या ७/१२ नोंदीनुसार त्याला संयुक्त खात्यावरील त्याच्या नावे असलेल्या क्षेत्राकरिताच त्याला लाभ घेता येईल.
  • जर लाभार्थ्याने यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेअंतर्गत किंवा राज्य रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला असेल, तर ते लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी शेतकरी लाभ घेण्यास पात्र असेल.

फळबाग लागवडीसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष –

  • फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे शेत जमिनीचा ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे. जर संयुक्त खाते असेल, तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील.
  • जर लाभार्थ्याची शेत जमीन कुळ कायद्याखाली येत असेल, ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळ कायद्याचे नाव असेल, तर ही योजना राबवण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक असेल.
  • सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर इतर शेतकऱ्यांचा विचार करता येईल.
  • निवड करताना प्राप्त अर्जांमधून अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती व जमाती, महिला, दिव्यांग यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान अर्थसहाय्य देऊन लाभ देण्यात येणार नाही.

फळबाग लागवड योजनेसाठी आवश्यक कामे –

अ. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे –

  • जमीन तयार करणे.
  • सेंद्रिय खत मिश्रण आणि खड्डे भरणे.
  • रासायनिक खत वापरून खड्डे भरणे. अंतरमशागत करणे.
  • काटेरी झाडांचे कुंपण करायचे असल्यास ते करणे. (ऐच्छिक)

ब. शासन अनुदानित कामे –

  • खड्डे खोदणे.
  • कलमे लागवड करणे.
  • पिक संरक्षण नांग्या भरणे.
  • ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादी कामे १०० टक्के राज्य शासन अनुदानावर केली जातील.

फळबाग लागवड योजनेसाठी अनुदान वितरित करण्याचे निकष –

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास तीन वर्षात १०० टक्के अनुदान देय असेल. त्यामध्ये या तीन वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० या प्रमाणात अनुदान देय राहील. खालील तक्त्यात अनुदान विवरण देण्यात आलेले आहे

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता व कागदपत्रे  :

  • लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
  • सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
  • लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना लय योजनेचा लाभ देय नाही.
  • शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
  • ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
  • परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या . अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ