- अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी शेतकरी बांधवांचे शेतीतील उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते.
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना – Birsa Munda Krishi Kranti Yojana:
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुदान: अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पुढील बाबींवर अनुदान देण्यात येते.
- नवीन विहीरीसाठी 2 लक्ष 50 हजार रुपये,
- जुन्या विहीरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये,
- इनवेल बोअरिंगसाठी 20 हजार रुपये,
- वीज जोडणी आकार 10 हजारु रुपये,
- शेततळयाच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लक्ष रुपये,
- सुक्ष्म सिंचन संच यामध्ये ठिबक सिंचनासाठी 50 हजार रुपये
- तुषार सिंचनासाठी 25 हजार रुपये,
- पारसबागेसाठी 500 रुपये,
- 10 अश्वशक्तीपर्यंतच्या पंप संचाकरीता (डिझेल/विद्यूत) 20 हजार रुपये,
- पिव्हीसी/एचडीपीई पाईकरीता 30 हजार रुपये आदी 9 बाबींचा समावेश असून लाभ पॅकेज स्वरुपात देण्यात येतो.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पॅकेज: पुढील तीनपैकी कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थ्यास घेता येतो.
- नवीन विहीर पॅकेजमध्ये नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग.
- जुनी विहीर पॅकेजमध्ये जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग. शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकणामध्ये शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप व परसबाग याचा समावेश आहे.
- ज्या आदिवासी शेतकऱ्यांनी यापुर्वीच योजनेतून किंवा स्वखर्चाने विहीर घेतली असेल त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/ एचडीपीई पाईप, परसबाग यासाठी अनुदान देता येते.
वरील घटकांपैकी काही घटक शेतकऱ्यांकडे असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी पुढील घटकांची निवड करावी. वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग. पुर्वसंमती मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी या बाबींची अंमलबजावणी करावयाची आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी लाभाथी पात्रता:
- लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- या प्रवर्गातील शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे.
- नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- तसेच यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थ्यांच्या सातबारावर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास नवीन विहीरीचा लाभ देता येणार नाही.
- नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून 500 फुटाच्या अंतरावर दुसरी विहीर नसावी.
- नवीन विहीरी व्यतिरिक्त अन्य बाबींचा लाभ घेण्यासाठी किमान 0.20 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास व त्यांची जमीन 0.40 हेक्टर इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ देता येईल.
- 6 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील. मात्र दारिद्रय रेषेखालील लाथार्थ्यांना ही अट लागू नाही.
- परंपरागत अथवा निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वन पट्टेधारक शेतकऱ्याला प्राधान्य राहील.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना: इथे क्लिक करा.
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.