घन आणि घनमुळ – Cube and Cube Roots

0
769

घन आणि घनमुळ – Cube and Cube Roots

आपण वर्ग आणि वर्गमूळ याविषयी नोट्स बघितल्याचा त्यात तुम्हाला अनेक ट्रिक्स देखील समजून सांगितल्या आहेत. जर तुम्ही त्या बघितल्या नसतील तर एकदा नक्की बघा : वर्ग आणि वर्गमूळ / Square and Square Roots

घनमुळ आणि घन याच्या जास्त क्लुप्त्या नाहीत परंतु ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अगदी पुरेशा आहेत.

घन काढताना

संख्याचे एकक स्थान व त्यांचे घणातील एकक स्थान

  • संख्येच्या एकक स्थानी जर 1 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 1 च असतो.
  • संख्येच्या एकक स्थानी जर 2 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 8 असतो.
  • संख्येच्या एकक स्थानी जर 3 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 7 असतो.
  • संख्येच्या एकक स्थानी जर 4 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 4 च असतो.
  • संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 5 च असतो.
  • संख्येच्या एकक स्थानी जर 6 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 6 च असतो.
  • संख्येच्या एकक स्थानी जर 7 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 3 च असतो.
  • संख्येच्या एकक स्थानी जर 8 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 2 च असतो.
  • संख्येच्या एकक स्थानी जर 9 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 9 च असतो.
  • संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर घन संख्येत देखील एकक स्थानी 0 च असतो.

यातील सोपी ट्रिक म्हणजे 2 असेल तर 8, 8 असेल तर 2 आणि 3 असेल तर 7 आणि 7 असेल तर 3!

या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे तेच अंक येतात.

उदा : 3√79507 = 43

या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला 7 बघायला मिळतो. त्यामुळे घनमुळ संख्येत आपल्याला 3 हा अंक शेवट असणार आहे. 

त्यानंतर एकक, दशक आणि शतक आकडे सोडून इतर संख्यांमध्ये आपल्याला कोणत्या संख्या दिसतात त्या बघव्यात.

इथे 79 शिल्लक असतो. पण आपल्याला यातून वजा होणारा सर्वात जवळचा घन शोधायचा आहे. 64 हा 4 चा घन आहे. त्यामुळे आपले उत्तर हे 43 असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here