Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)  18 जून 2023

0
76
Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)  18 जून 2023

 

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी मिळताहेत ५० हजारांचे आर्थिक सहाय्य!

Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी तर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ साठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरले अशा उमेदवारांना पन्नास हजार रुपयांचे सहाय्य प्रदान केले जाणार आहे. अर्ज केलेल्यांना हा लाभ मिळेल.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी, अनुसूचित जातीचा व मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा अशा अटी आहेत. योजनेचा लाभ एका लाभार्थ्यास फक्त तीनच वेळा घेता येईल. ज्यांनी यापूर्वी योजनेचा लाभ तीन वेळा घेतला आहे त्यांना लाभ मिळणार नाही. बार्टी संस्थेने दिलेल्या लिंकवर उपलब्ध अर्जाची प्रिंट काढून अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जुलै आहे.

दिव्यांगासाठी खुशखबर! अधिकारीच येणार दारी, काय आहे योजना?

  • राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
  • यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव असतील.
  • दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेकजण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे, त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाने ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास २९ लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा! दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै, ऑगस्ट महिन्यात दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज शुक्रवारपर्यंत होती. ती आता २१ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
  • आता नियमित शुल्कासह २१ जून, तर विलंब शुल्कसह २२ ते २५ जून या कालावधीत अर्ज भरता येतील. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या नाहीत; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

  • तीन वर्षांनंतर शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेत खंड पडतो, ही बाब विचारात घेऊन राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांतील शिक्षकांच्या नियमित बदल्या यापुढे केल्या जाणार नाहीत. विशेब बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाला अपवाद केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केली.
  • यासंदर्भात ग्रामविकास विभाग, शक्षक संघटना यांच्याशी चर्चा झाली असून पुढील काही दिवसांत याबाबत तसा आदेश जारी केला जाईल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. शालेय वयात मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. या वयात मुलांचे शिक्षकांशी नाते निर्माण झालेले असते. त्यामुळे शिक्षक त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे मोलाचे काम करीत असतात. दर तीन वर्षांनी शिक्षकाची बदली झाली तर यात खंड पडू शकतो. त्यामुळे यापुढे नियमित बदल्या न करण्याच्या निर्णयापर्यंत शालेय शिक्षण खाते आले आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
  • राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळातील शिक्षकांच्या अथवा शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील शाळांमधील शिक्षकांची तीन वर्षांनंतर नियमित म्हणजे प्रशासकीय बदली होते. त्या कालावधीपूर्वी बदली केली तर त्यास विनंती बदली म्हणतात.

३० हजार शिक्षकांची पदभरती पूर्ण

  • राज्यात ३० हजार शिक्षकांची पदभरती पूर्ण झाली आहे. मात्र याबाबत न्यायालयात खटला असल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती. यासाठी आवश्यक असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निकाल लागल्यानंतर लगेच भरती प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचेही केसरकर म्हणाले.

जो रुटने झळकावले शानदार शतक, इंग्लडने ९४ वर्षांनंतर केला ‘हा’ खास कारनामा

  • वर्षातील सर्वात हाय व्होल्टेज अॅशेस मालिका सुरू झाली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी यजमानांनी डाव घोषित करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कसोटी क्रिकेटमध्ये हे क्वचितच पाहायला मिळते, तर अॅशेसमध्ये हे दृश्य ९४ वर्षांनंतर पाहायला मिळाले. या सामन्यात ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अॅशेसमध्ये शतक झळकावणारा इंग्लंडचा फलंदाज जो रूटसाठी पहिला दिवस खूप खास होता.

इंग्लंडने पहिल्या दिवशीच घोषित केला डाव –

  • इंग्लंडने पहिल्या दिवशी ७८ षटकांनंतर आपला डाव घोषित केला. त्यावेळी जो रूट ११८ आणि ऑली रॉबिसन १७ धावांवर खेळत होते. इंग्लंडच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. १९३७ नंतर पहिल्यांदाच एखाद्या संघाने अॅशेसच्या पहिल्या दिवशी डाव घोषित केला आहे. १९३७ साली मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ षटके खेळून डाव घोषित केला होता. त्यावेळी एका षटकात ८ चेंडू असायचे.
  • इंग्लंडच्या या निर्णयावर क्रिकेट चाहते दोन भागात विभागले आहेत. एकीकडे काही चाहत्यांनी या निर्णयाला नव्या क्रिकेटचा उदय म्हटले आहे, तर दुसरीकडे काहींनी हा मूर्खपणाचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. तसे, जर आपण सर्वात कमी धावसंख्येवर डाव घोषित करण्याबद्दल बोलायचे, तर हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे ज्याने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५९/९ धावांवर डाव घोषित केला होता.

जो रूटने झळकावले शतक –

  • इंग्लंडने पहिल्या डावात जो रूटच्या शतकासह ३९३ धावा केल्या. या ३२ वर्षीय खेळाडूने नाबाद ११८ (१५१) धावा केल्या. २०१५ नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो रूटचे हे पहिले शतक आहे. रुटने ३० व्या शतकासह मोठा विक्रमही केला. त्याने आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या शिव नारायण चंद्रपॉलची बरोबरी केली आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

 

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022