Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) 16 जुलै 2023
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
एमपीएससीच्या लिपिक टंकलेखक व करसहायक पदाचा निकाल जाहीर

- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अकराशेहून अधिक पदांचा निकाल आहे. कौशल्य चाचणी आणि इतर परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.
- महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाचा निकाल जाहीर केला. सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- तसेच, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
23 ऑगस्टला यान चंद्रावर उतरविण्याचे नियोजन- इस्रो प्रमुख
- २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविण्याच प्रयत्न केला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी सांगितले.
- सॉफ्ट लँडिंग यान अलगद उतरविणे हे तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक मानले जाते. चंद्रयान-३ हे १ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती सोमनाथ यांनी यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांना दिली.
- २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी चंद्रयान-३ अलगद उतरविण्याची योजना आहे. मागील मोहिमेमध्ये काय चूक झाली याचा अभ्यास करण्यासाठी एक वर्ष लागले. दुसरे म्हणजे आम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत आणि काय चूक होऊ शकते याचा अभ्यास केला. त्या आधारावर पुनरावलोकन केले, असे ते म्हणाले.
प्रक्षेपण केंद्रावर पुस्तकाचे प्रकाशन
- सतीश धवन अंतराळ केंद्रावरील प्रक्षेपण केंद्रावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-लेखक विनोद मानकारा यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘प्रिझम- द अॅन्सेस्ट्रल अॅबोड ऑफ रेनबो’ असे शीर्षक असलेल्या या पुस्तकात विज्ञानविषयक लेख आहेत. धवन अंतराळ केंद्रावर ऐतिहासिक प्रक्षेपणाची उलटगणती सुरू असताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी हे पुस्तक विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांच्याकडे सुपूर्द करून प्रसिद्ध केले. यावेळी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ आणि पुस्तकाचे प्रकाशक उपस्थित होते.
- चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण हा अंतराळ संशोधन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धता आणि अतूट बांधिलकी दिसून येते.Daily Current Affairs in Marathi
द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
- चंद्रयान-३ हा भारताच्या अंतराळ प्रवासातील ‘नवा अध्याय’ असून यामुळे प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. हा क्षण शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या ऊर्मीला आणि कल्पकतेला सलाम करतो! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- चंद्रयान-३चे यशस्वी प्रक्षेपण हे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या सर्व माजी पंतप्रधानांचा दृष्टिकोन, दूरदृष्टी, दृढ निश्चय,प्रयत्न यांचे फलित आहे.
मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष
- चार वर्षांपूर्वी चंद्रावर यान अलगद उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर इस्रोने सुधारात्मक पावले उचलली आहेत. हे एक अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण असून भारताला या महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.Daily Current Affairs in Marathi
फ्रान्समध्ये लवकरच भारताची यूपीआय प्रणाली! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान कराराची शक्यता
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात डिजिटल अर्थव्यवस्था, उत्पादन क्षेत्र आणि हरित इंधन या क्षेत्रांत दोन्ही देशांदरम्यान सहकार्याची पावले उचलली जाणार आहेत. या दौऱ्यात भारताची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणाली फ्रान्समध्ये सुरू केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- सध्या भारताबाहेर, सिंगापूरमध्ये यूपीआय प्रणालीचा वापर सुरू आहे. याच वर्षी यूपीआय प्रणाली चालविणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि सिंगापूरमधील पेनाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केली. यामुळे यूपीआयचा वापर सिंगापूरमध्ये आणि पेनाऊचा वापर भारतामध्ये करणे शक्य झाले. एनपीसीआय आणि फ्रान्समधील लायरा या कंपन्या वर्षभरापासून यावर काम करीत आहेत. मोदींच्या दौऱ्यादरम्यान याबाबत निर्णय यूपीआयचा वापर सुरू करणारा फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश ठरेल.Daily Current Affairs in Marathi
- नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ‘यूपीआय’ प्रणाली विकसित केली आहे. तिच्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे आणि सध्या देशातील सुमारे ४०० बँका आणि बँकेतर वित्तीय कंपन्या ‘यूपीआय’शी जोडल्या गेल्या आहेत.
भारत-फ्रान्समधील उद्योगपतींची बैठक
- ‘भारत-फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदे’चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या परिषदेची बैठक पॅरिसमध्ये १४ जुलैला होणार असून, त्यात दोन्ही बाजूंकडील १० ते १२ उद्योगपती उपस्थित असतील. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्युबिलंट समूहाचे सहअध्यक्ष हरी भाटिया आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कॅपजेमिनी एसईचे अध्यक्ष पॉल हर्मिलीन करणार आहेत.
‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण.. पुढे काय?
- श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दिशेने झेपावले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या यानातील लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. या चांद्रमोहिमेचे तीन प्रमुख टप्पे आहेत.Daily Current Affairs in Marathi
पृथ्वीला निरोप..