Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) 17 जुलै 2023
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
विम्बल्डन टेनिस स्पर्धा : वोन्ड्रोउसोवाचे ऐतिहासिक जेतेपद, अंतिम लढतीत सरळ सेटमध्ये विजय

- चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोन्ड्रोउसोवाने इतिहास रचताना प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेची पहिली बिगरमानांकित विजेती होण्याचा मान मिळवला. वोन्ड्रोउसोवाने शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरवर विजय मिळवला. त्यामुळे जाबेऊरला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत ४२व्या स्थानी असलेल्या २४ वर्षीय वोन्ड्रोउसोवाने धक्कादायक निकाल नोंदवताना जाबेऊरवर ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये सरशी साधली.
- ऑल इंग्लंड क्लबच्या या स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी डावखुरी वोन्ड्रोउसोवा गेल्या ६० वर्षांतील पहिली महिला टेनिसपटू होती. त्यामुळे अंतिम लढतीत जाबेऊरचे पारडे जड मानले जात होते . जाबेऊरने गतवर्षीही विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. यंदा पुन्हा अंतिम फेरी गाठण्यापूर्वी जाबेऊरने उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या एलिना रायबाकिनाचा, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची विजेती आणि दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काचा पराभव केला होता. त्यामुळे जाबेऊर कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवेल अशी बहुतांश टेनिसरसिकांना अपेक्षा होती. मात्र, वोन्ड्रोउसोवाविरुद्ध तिला आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले.
- वोन्ड्रोउसोवाने दोन्ही सेटमध्ये पिछाडीनंतर पुनरागमन केले. पहिल्या सेटमध्ये २-४ अशी पिछाडीवर असताना वोन्ड्रोउसोवाने सलग चार गेम जिंकले. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने अखेरचे सलग तीन गेम जिंकत सेट आणि सामना जिंकला. वोन्ड्रोउसोवाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यापूर्वी २०१९ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेत ती उपविजेती होती. वोन्ड्रोउसोवा गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत दुखापतीमुळे टेनिस कोर्टच्या बाहेर होती. त्यामुळे वर्षांअखेरीस ती क्रमवारीत ९९व्या स्थानी गेली होती. मात्र, २०२३ वर्षांत तिने अप्रतिम कामगिरी केली आहे.Daily Current Affairs in Marathi
भारत-अमिराती व्यापारास बळ; आता स्थानिक चलनांद्वारे व्यवहार, द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचा निर्धार
- डॉलरऐवजी आपाआपल्या स्थानिक चलनांत व्यापारविनिमय करणे आणि जलद देय व्यवहार यंत्रणांची (फास्ट पेमेंट सिस्टीम) जोडणी याबाबत शनिवारी भारत आणि संयुक्त अरब अमिराती(यूएई)मध्ये द्विपक्षीय करार करण्यात आला.
- भारत आणि यूएईमध्ये द्विपक्षीय करार करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दोन्ही देशांतील व्यापार सध्या ८५ अब्ज डॉलर असून तो लवकरच १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.Daily Current Affairs in Marathi
- यूएईच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी यूएईचे अध्यक्ष शेख मोहंमद बिन झायेद अल् नह्यन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत व्यापक चर्चा केली. शेख मोहंमद यांची भेट घेतल्यानंतर मोदी म्हणाले, की गेल्यावर्षी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून भारत-यूएईमधील व्यापारात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उभय देशांच्या चलनांमध्ये व्यापार विनिमय करण्यासाठी शनिवारी झालेल्या करारामुळे दोन्ही देशांतील भक्कम आर्थिक सहकार्य आणि परस्पर विश्वास याची प्रचीती येते, असेही मोदी यांनी नमूद केले. दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार सुलभतेसाठी परस्परांच्या जलद देय व्यवहार प्रणालींची (फास्ट पेमेंट सिस्टीम) जोडणी करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता भारताची ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’(यूपीआय) यूएईच्या ‘इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म (आयपीपी)’शी जोडण्यात येईल. त्याचबरोबर आयआयटी, दिल्लीचे कॅम्पस अबुधाबी येथे सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली.
- चलन व्यवहार यंत्रणा.. भारत- यूएईतील व्यापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि यूएईचे दिऱ्हम या चलनांचा वापर करता यावा म्हणून एक रचना तयार करण्याबाबत दोन्ही देशांत सामंजस्य करार करण्यात आला. द्विपक्षीय व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक चलन व्यवहार यंत्रणा (एलसीएसएस) विकसित करणे, हा त्यामागील उद्देश आहे. दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांनीही त्यास सहमती दर्शवल्याची माहिती अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फ्रान्सचे अध्यक्ष, त्यांच्या पत्नीसह प्रमुख व्यक्तींना ‘या’ खास भेटवस्तू
-
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांना खास भारतीय वस्तू भेट दिल्या. याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मोदींनी मॅक्रॉन यांना चंदनाच्या लाकडाचा सतार भेट म्हणून दिला. या चंदनाच्या लाकडावर भारतातील प्राचीन शिल्प कोरलेले आहेत. याशिवाय या सतारावर सरस्वती, गणपती आणि मोरही कोरलेला आहे.
- विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी ब्रिगिट मॅक्रॉन यांनाही खास भेट दिली. फ्रान्सच्या पहिल्या महिला नागरिक ब्रिगिट यांना तेलंगणातील प्रसिद्ध पोचमपल्लीची रेशीम साडी भेट म्हणून देण्यात आली. पोचमपल्लीच्या साडीने कापड आणि साडी उद्योगात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या साडीवर अगदी गुंतागुंतीचं नक्षीकाम अगदी सफाईदारपणे केलेलं आहे. तसेच नक्षीकामाची रंगसंगतीही कमालीची सुंदर आहे. त्यामुळेच पोचमपल्लीची ओळख भारताबाहेर अगदी जगभरात झाली आहे.Daily Current Affairs in Marathi
संसदेच्या अध्यक्षांना काश्मीरची प्रसिद्ध कार्पेट भेट
- फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्याशिवाय मोदींनी फ्रान्सच्या संसदेचे प्रमुख येल ब्रॉन पिवेट यांना हाताने तयार केलेली काश्मीरचं प्रसिद्ध कार्पेट भेट दिलं. हे कार्पेट जगप्रसिद्ध आहेत. आता त्याची फ्रान्समध्ये जोरदार चर्चा आहे. या कालीनवर खासप्रकारची कलाकुसरही करण्यात आली आहे.
- मोदींनी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांना मार्बल इनले वर्क टेबल भेट दिला. राजस्थानमधील संगमरवराच्या दगडापासून तो तयार करण्यात आला आहे. याशिवाय सिनेट अध्यक्षांना चंदनाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेलं खास हत्तीशिल्प भेट देण्यात आलं.
२३ ऑगस्टला यान चंद्रावर उतरविण्याचे नियोजन- इस्रो प्रमुख
- २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविण्याच प्रयत्न केला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी सांगितले.
- सॉफ्ट लँडिंग यान अलगद उतरविणे हे तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक मानले जाते. चंद्रयान-३ हे १ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती सोमनाथ यांनी यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांना दिली. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी चंद्रयान-३ अलगद उतरविण्याची योजना आहे. मागील मोहिमेमध्ये काय चूक झाली याचा अभ्यास करण्यासाठी एक वर्ष लागले. दुसरे म्हणजे आम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत आणि काय चूक होऊ शकते याचा अभ्यास केला. त्या आधारावर पुनरावलोकन केले, असे ते म्हणाले.
प्रक्षेपण केंद्रावर पुस्तकाचे प्रकाशन
- सतीश धवन अंतराळ केंद्रावरील प्रक्षेपण केंद्रावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-लेखक विनोद मानकारा यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘प्रिझम- द अॅन्सेस्ट्रल अॅबोड ऑफ रेनबो’ असे शीर्षक असलेल्या या पुस्तकात विज्ञानविषयक लेख आहेत. धवन अंतराळ केंद्रावर ऐतिहासिक प्रक्षेपणाची उलटगणती सुरू असताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी हे पुस्तक विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांच्याकडे सुपूर्द करून प्रसिद्ध केले. यावेळी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ आणि पुस्तकाचे प्रकाशक उपस्थित होते.
- चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण हा अंतराळ संशोधन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धता आणि अतूट बांधिलकी दिसून येते.
द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
- चंद्रयान-३ हा भारताच्या अंतराळ प्रवासातील ‘नवा अध्याय’ असून यामुळे प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. हा क्षण शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या ऊर्मीला आणि कल्पकतेला सलाम करतो! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- चंद्रयान-३चे यशस्वी प्रक्षेपण हे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या सर्व माजी पंतप्रधानांचा दृष्टिकोन, दूरदृष्टी, दृढ निश्चय,प्रयत्न यांचे फलित आहे.
मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष
- चार वर्षांपूर्वी चंद्रावर यान अलगद उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर इस्रोने सुधारात्मक पावले उचलली आहेत. हे एक अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण असून भारताला या महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.Daily Current Affairs in Marathi