Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)  20 जुलै 2023

0
45
Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)  20 जुलै 2023

 

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेत ३२ संघ होणार सहभागी, जाणून घ्या वेळापत्रक आणि स्ट्रीमिंगबद्दल

Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi
  • फिफा महिला विश्वचषक २०२३ २० जुलैपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे या मार्की स्पर्धेचे सह-यजमान असतील. सलामीच्या लढतीत न्यूझीलंडचा सामना नॉर्वेशी होणार आहे. एकूण ३२ संघ येथे प्रवास करतील आणि त्या सर्वांचे एकच स्वप्न असेल. २० ऑगस्ट रोजी सिडनी ऑलिम्पिक स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल.
  • युनायटेड स्टेट्स (यूएसए) फ्रान्समधील स्पर्धेच्या २०१९ हंगाम आणि कॅनडामध्ये २०१५ ची स्पर्धा जिंकून ‘थ्री-पीट’ पूर्ण करण्याची आशा करत आहे. युनायटेड स्टेट्स हे महिला सॉकरचे पॉवरहाऊस राहिले आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला सलग तीनवेळा फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. फिफा महिला विश्वचषक २०२३ मध्ये ३२ संघ असतील. गेल्या वेळी या स्पर्धेत २४ संघ सहभागी झाले होते तर यावेळी आणखी आठ संघ सहभागी होणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, यावेळी फिफा विश्वचषकासाठी संघांची आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
  • यजमान ऑस्ट्रेलिया देखील फेव्हरेटमध्ये आहेत आणि चेल्सीचा स्ट्रायकर सॅम केरकडे स्टार पॉवर आहे. नेहमीचे संभावित स्पेन, जर्मनी आणि फ्रान्सदेखील अमेरिकन लोकांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, तर २०१९ च्या अंतिम फेरीतील नेदरलँड्स गट टप्प्यात देखील यूएसचा ​​बदला घेण्याचा प्रयत्न करतील. फिफा महिला विश्वचषक २०२३ च्या गट टप्प्यातील सामने २० जुलैपासून सुरू होतील. हे सामने ३ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. यानंतर ५ ऑगस्टपासून १६वी फेरी सुरू होईल. फिफा महिला विश्वचषक २०२३ च्या उपांत्यपूर्व फेरीला ११ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला आणि दुसरा उपांत्यपूर्व सामना ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. तर तिसरा आणि चौथा उपांत्यपूर्व सामना १२ ऑगस्टला खेळवला जाईल.Daily Current Affairs in Marathi

रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांचे आदेश

  • रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असल्याने जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाला तसे निर्देश देण्यात आले आहे.
  • जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सावित्री, पाताळगंगा, अंबा नद्यांना पूर आला आहे. कुंडलिका नद्याही इशारा पातळीवर वाहत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने या नदीलाही पूर येण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागांत पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
  • सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांना तातडीने घरी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाला सर्व शाळांना तसा निरोप देण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी म्हसे यांनी दिली.Daily Current Affairs in Marathi
  • राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची कलचाचणी का झाली बंद? शिक्षणमंत्र्यांनी सांगितले कारण…
  • राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करीअरचे क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी मोफत कलचाचणीचा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. मात्र पुन्हा कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
  • विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना विद्यार्थ्यांना करीअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मोफत कलचाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी एका संस्थेशी करार करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित संस्थेमार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्याचे निष्कर्ष जाहीर केले जात होते. मात्र गेली तीन वर्षे ही कलचाचणी बंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर कलचाचणी बंद करण्याची कारणे काय, कलचाचणी पूर्ववत सुरू करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात येत आहे याबाबतचे प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांकडून उपस्थित करण्यात आले.Daily Current Affairs in Marathi
  • राज्य सरकारचा संबंधित संस्थेबरोबरचा करार २०२० मध्ये संपुष्टात आल्याने कलचाचणी बंद करण्यात आली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन आणि मानसशास्त्रीय समुपदेशन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात दिली. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी कलचाचणी पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ही तर भ्रष्टाचाऱ्यांची बैठक -मोदी 

  • बंगळूरु येथील विरोधकांची बैठक ही भ्रष्टाचाऱ्यांची बैठक असल्याची टीका जनता करत आहे. लोकशाही म्हणजे ‘लोकांचे, लोकांद्वारे, लोकांसाठी राज्य’, पण या घराणेशाहीद्वारे चालणाऱ्या या पक्षांचा ‘कुटुंबाचे कुटुंबाद्वारे, कुटुंबासाठी’ असा या बैठकीमागील मंत्र आहे, अशी तीव्र टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.
  • येथील वीर सावरकर विमानतळाच्या नवीन ‘इंटिग्रेटेड टर्मिनल’ इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मोदींनी विरोधी पक्षांच्या दोनदिवसीय बैठकीवर टीकास्त्र सोडले. भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी विरोधकांची ही बैठक होत असल्याची चर्चा जनता करत आहे. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुक पक्षाविरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणे असूनही विरोधी पक्षांनी द्रमुकला निर्वाळा (क्लीन चिट) दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
  • मोदी यांनी सांगितले, की तृणमूल काँग्रेस सत्ताधारी असलेल्या पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या पंचायतींच्या निवडणुकांत मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार होतो. पण त्यात डावे पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्यानंतरही या पक्षांनी याबाबत सोयीस्कर मौन राखले आहे. या पक्षांच्या नेत्यांनी आपल्या स्वार्थी हेतूंसाठी आपल्याच कार्यकर्त्यांना मरण्यासाठी बेवारस सोडून दिले. या सर्व विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र पाहून व यानिमित्त छायाचित्रासाठी एका चौकटीत त्यांना पाहून हे भ्रष्टाचाराचे बोलके प्रतीक असल्याची टीका जनता करत आहे.
  • जनतेने २०२४ मध्ये आमचे सरकार पुन्हा सत्तेत आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांच्या घोषणेपासून प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात किमान ३९ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यापैकी बहुतेक सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे समर्थक होते. विरोधी पक्षांना देशातील गरिबांच्या मुलांच्या हिताची-विकासाची काळजी नाही.Daily Current Affairs in Marathi