Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)  26 जुलै 2023

0
50
Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)  26 जुलै 2023

 

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा: जर्मनीकडून मोरोक्कोचा धुव्वा

Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi
 • जर्मनीच्या संघाने यंदाच्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सर्वात मोठय़ा विजयाची नोंद करताना सोमवारी मोरोक्कोचा ६-० असा धुव्वा उडवला. दोन वेळचा विजेता संघ जर्मनी आणि महिला विश्वचषकात पदार्पण करणारा मोरोक्कोचा संघ यांमधील गुणवत्ता व अनुभव यातील तफावत या लढतीतून दिसून आली.
 • जर्मनीचे आक्रमण रोखण्यात मोरोक्कोला अपयश आले. जर्मनीने ७५ टक्के वेळ चेंडू आपल्याकडे राखला आणि गोलच्या दिशेने १६ फटके मारले. पूर्वार्धात आघाडीपटू अलेक्सांड्रा पॉपने (११ आणि ३९व्या मिनिटाला) दोन गोल नोंदवत जर्मनीला भक्कम आघाडी मिळवून दिली.उत्तरार्धातही जर्मनीने आपल्या आक्रमणाची गती कायम राखली. ४६व्या मिनिटाला क्लारा बुएलने जर्मनीचा तिसरा गोल केला. यानंतर मोरोक्कोच्या एल हाज (५४व्या मि.) आणि यास्मिन मरबेत (७९व्या मि.) यांच्याकडून झालेल्या स्वयंगोलमुळे जर्मनीला ५-० अशी आघाडी मिळाली. अखेरीस ९०व्या मिनिटाला लिया शुलेरने गोल करत जर्मनीला ६-० असा मोठा विजय मिळवून दिला.
 • जर्मनीचा संघ महिला विश्वचषकातील आपल्या गेल्या २० साखळी सामन्यांत अपराजित राहिला आहे. त्यांनी १६ विजय मिळवले असून चार सामने बरोबरीत राखले आहेत.दुसरीकडे, इटलीने विश्वचषकातील मोहिमेची यशस्वी सुरुवात करताना अर्जेटिनाला १-० असे पराभूत केले. इटलीकडून ख्रिस्टियाना गिरेलीने ८७व्या मिनिटाला निर्णायक गोल नोंदवला. त्यामुळे अर्जेटिनाला महिला विश्वचषकात आजवर खेळलेल्या १० सामन्यांत आठवा पराभव पत्करावा लागला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ८,६७७ कोटी रुपये मंजूर! अजित पवारांची घोषणा

 • गेल्या वर्षी पावसाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं होतं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरपाई जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२४ जुलै) विधान परिषदेत सांगितलं की, गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस यामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी ८ हजार ६७७ कोटी रुपये तर यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात अवेळी पावसाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी ५१३ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.Daily Current Affairs in Marathi
 • अजित पवार म्हणाले, गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी १,५०० कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीबीटी प्रणालीमार्फत ६०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर केले असून हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.
 • त्याचबरोबर गेल्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. प्रामुख्याने यवतमाळ, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर आणि वाशिम या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या मुसळधार पावसात ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते, त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

नोकरभरतीच्या कठोर कायद्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे ‘टि्वटर वॉर’ आंदोलन; जाणून घ्या सविस्तर…

 • राज्यात ७५ हजार पदभरतीची घोषणा सरकारने केली असून विविध पदांच्या जाहिरातीही येत आहेत. मात्र, आतापर्यंतचा अनुभव बघता अशा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळे ठरले आहेत.
 • मंत्रालयात बसलेले आयएएस अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे संचालक, दलाल, परीक्षा केंद्र चालक आणि शेकडो उमेदवारांना या घोटाळ्यांमध्ये अटक झाली होती. त्यामुळे अशा घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात परीक्षांमधील गैरप्रकारांसाठी इतर राज्यांप्रमाणे विशेष कायदा करणे आणि परीक्षा केंद्र हे टीसीएसचे स्वत:चे हवेत या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मंगळवार २५ जुलैला सकाळी ११ ते दुपारी १२ वाजातपर्यंत टि्वटर वॉर पुकारला आहे.Daily Current Affairs in Marathi
 • स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. याचाच भाग म्हणून आता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन टि्वटरच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी या मार्गाने लढा दिला जाणार आहे. यामध्ये हॅश टॅग परीक्षा केंद्र फक्त टीसीएस आणि हॅश टॅग पेपरफुटीवर कडक कायदा अशी मागणी राहणार आहे. यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

‘ट्विटर’चे नवे बोधचिन्ह

 • ट्विटरचा चिरपरिचित निळा पक्षी आता या प्रसिद्ध समाजमाध्यमावर दिसणार नाही. त्याऐवजी काळी-पांढरी फुली ट्विटरची खूण मानली जाणार आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी सोमवारी ‘ ’ हा नवीन लोगो लोकांसमोर आणला. ट्विटरचे हे मोठे रिब्रँडिंग मानले जात आहे. मस्क यांनी गेल्या वर्षी ४४ अब्ज डॉलरना ट्विटर खरेदी केले होते.
 • मस्क यांनी स्वत:च्या ट्विटर हँडलवर हा बदल करून त्याची प्रतिमा पोस्ट केली. सोमवारी डेस्कटॉपवर ट्विटरची काळय़ा पार्श्वभूमीवर पांढरी फुली दिसू लागली. मात्र फोनवरील अ‍ॅपमध्ये निळा पक्षीच मोठय़ा प्रमाणात दिसत होता. मस्क यांनी नवीन लोगोसाठी चाहत्यांकडून कल्पना मागवल्या होत्या. रिब्रँडिंगनंतर ट्वीट हे एक्स नावाने ओळखले जातील असेही मस्क यांनी स्पष्ट केले आहे.Daily Current Affairs in Marathi

देशातील पहिलं खासगी हिल स्टेशन लवासाची विक्री, ‘इतक्या’ कोटींना झाला व्यवहार

 • नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने भारतातील पहिले खासगी हिल स्टेशन लवासा हे डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरला विकण्यास मान्यता दिली आहे. NCLT ऑर्डरमध्ये सादर केलेल्या ठराव योजने(Resolution Plan)ला डार्विनच्या कर्जदारांनी परवानगी दिल्यानंतर NCLT ने लवासाच्या विक्रीला मान्यता दिली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने खासगी हिल स्टेशन लवासाची दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया (Insolvency resolution process) सुरू झाल्यानंतर सुमारे पाच वर्षांनी १८१४ कोटी रुपयांच्या ठराव योजनेला मंजुरी दिली आहे. आठ वर्षांमध्ये १८१४ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. ठराव योजनेमध्ये कर्जदारांना ९२९ कोटी रुपये आणि घर खरेदीदारांना पूर्णतः बांधलेली घरे देण्यासाठी ४३८ कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. ८३७ गृहखरेदीदार आहेत, ज्यांचे दावे स्वीकारण्यात आले आहेत.
 • विशेष म्हणजे त्यांचे स्वीकृत दावे एकूण ४०९ कोटी रुपयांचे आहेत. कंपनीने कर्जदार आणि ऑपरेशनल क्रेडिटर्ससह एकूण ६,६४२ कोटी रुपयांचा दावा स्वीकारला आहे. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (DPIL) लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी विजेता बोलीदार म्हणून समोर आले आहेत. कंपनी प्रामुख्याने पुण्यातील खासगी हिल स्टेशनच्या लवासाच्या विक्री प्रक्रियेत गुंतलेली आहे. ट्रिब्युनलने शुक्रवारी दिलेल्या २५ पानांच्या आदेशात १,८१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संकल्प योजनेला मंजुरी दिली. “या रकमेमध्ये १,४६६.५० कोटी रुपयांच्या ठराव योजनेच्या रकमेचा समावेश आहे, ज्यामधून कॉर्पोरेट कर्जदाराला हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाणार आहे,” असंही आदेशात म्हटले आहे.