Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) 31 जुलै 2023
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
रियान परागने रचला इतिहास, तब्बल ‘इतके’ षटकार लगावत मोडला युसूफ पठाणचा विक्रम

- आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणारा रियान पराग देवधर ट्रॉफी २०२३ मध्ये पूर्व विभागाकडून खेळत आहे. या स्पर्धेतील सातव्या सामन्यात त्याने उत्तर विभागाविरुद्ध मैदानावर १३२ धावांची अप्रतिम खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने युसूफ पठाणचा मोठा विक्रम मोडला.Daily Current Affairs in Marathi
एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला –
- रियान परागने उत्तर विभागाविरुद्ध १३२ धावांची खेळी साकारताना ११ गगनचुंबी षटकार लगावले. त्यामुळे परागने युसूफ पठाणचा पश्चिम विभागाकडून उत्तर विभागाविरुद्ध (२०१०) नऊ षटकारांचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला. या पराक्रमात परागने उत्तरेकडील वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या गोलंदाजीवर तीन षटकार ठोकले.
- रियान परागची खेळी महत्त्वाची होती. कारण पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याच्या संघाने ५७ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या, मात्र रियानच्या खेळीमुळे त्याच्या संघाने ५० षटकात ८ विकेट गमावत ३३७ धावा केल्या. रियान व्यतिरिक्त, कुमार कुशाग्रानेही पहिल्या डावात पूर्व विभागासाठी चांगली खेळी खेळली आणि ९८ धावा केल्या, मात्र त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले.
रियान परागने ११ षटकार आणि ५ चौकारांचा पाडला पाऊस –
- रियान परागने सहाव्या क्रमांकावर येऊन संघाला चांगल्या पद्धतीने सावरले. अत्यंत दबावाच्या परिस्थितीतही त्याने संयमाने फलंदाजी केली आणि ८४ चेंडूत ८ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने चौथे शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने १०२ चेंडूंचा सामना करत १३२ धावा केल्या. या सामन्यात रियानला कुशाग्राची पूर्ण साथ लाभली आणि दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी २३५ धावांची भक्कम भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले.Daily Current Affairs in Marathi
भारत-चीनदरम्यान ‘स्टेपल्ड व्हिसा’चा वाद काय?
- चीनमधील स्पर्धेसाठी निघालेल्या ‘वुशू’ या मार्शल आर्ट प्रकारात भारतीय चमूतील अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंना व्हिसाचा शिक्का न देता ‘स्टेपल्ड’ म्हणजे जोड व्हिसा देण्यात आला.
- याचा निषेध म्हणून भारताने आपला संपूर्ण संघच स्पर्धेतून माघारी घेतला. यामुळे जोड व्हिसा म्हणजे काय, चीनने केवळ तीन खेळाडूंसाठीच त्याचा वापर का केला, त्यावर भारताने एवढे संतप्त होण्याचे कारण काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ही घटना, त्यामागची कारणे आणि परिणामांचा वेध घेणे आवश्यक आहे.
महिला बचत गटांना दुपटीने अर्थसहाय, ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक बचत गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींनाही मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ही घोषणा केली. तसेच महिलांची देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका असल्याचंही नमूद केलं.
फिरता निधी दुप्पट
- एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयं सहाय्यता गटांना प्रती गट १५ हजार रुपये फिरता निधी देण्यात येतो. त्यामध्ये वाढ करुन प्रती समुह ३० हजार रुपये फिरता निधी देण्यात येईल. यासाठी राज्य सरकार अतिरिक्त ९१३ कोटी रुपयांची निधीची तरतुद करणार आहे.”Daily Current Affairs in Marathi
मानधनात दुपटीने वाढ
- “स्वयं सहाय्यता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) कार्यरत आहेत. त्यांना सर्वसाधारणपणे दरमहा ३ हजार रुपये एवढे मानधन अदा करण्यात येते. बचत गट चळवळीतील त्यांचे योगदान व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करून ते प्रतिमहा ६ हजार रुपये एवढे करण्यात येणार आहे. या करिता १६३ कोटी रुपये एवढ्या अतिरिक्त निधीची तरतुद करणार आहे,” अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.
जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्यची उपांत्य फेरीत धडक
- भारताच्या लक्ष्य सेनने जपानच्या कोकी वातानाबेला सरळ गेममध्ये नमवत जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. त्याच वेळी एचएस प्रणॉयला झुंजार खेळानंतरही पराभवाचा सामना करावा लागला.
- २०२१च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आणि जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असणाऱ्या लक्ष्यने वातानाबेला २१-१५, २१-१९ असे नमवले.
- लक्ष्यचा सामना पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित जॉनथन क्रिस्टीशी होणार आहे. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असणाऱ्या प्रणॉयने अग्रमानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेनकडून २१-१९, १८-२१, ८-२१ अशी हार पत्करली. तर, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीची सलग १२ विजयांची मालिका खंडित झाली. त्यांना चायनीज तैपेइच्या ली यांग व वांग ची लान जोडीकडून १५-२१, २५-२३, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला.
हिजाब न घालता बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इराणच्या सारा खादेमला मिळालं स्पेनचं नागरिकत्व
- ईराणची बुद्धिबळपटू सारा खादेम (Sara Khadem) जिने हिजाब हटवून या स्पर्धेत सहभागी झाली होती त्याच साराला आता स्पेनचं नागरिकत्व मिळालं आहे. साराने डिसेंबर २०२२ मध्ये कझाकिस्तान या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत हिजाब न घालता भाग घेतला होता. यानंतर इराणने तिचा निषेध केला होता. आपल्यावर काही कारवाई होऊ नये म्हणून सारा खादेम जानेवारी महिन्यातच स्पेनला गेली होती. इराणमधे साराच्या विरोधात अटक वॉरंट लागू करण्यात आलं होतं.Daily Current Affairs in Marathi
- इराणच्या या बुद्धिबळपटू सारा खादेमला स्पॅनिश नागरिकत्व देण्यात आलं आहे. स्पेन सरकारनेच या विषयीची माहिती दिली. सारा खादेमने कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी तिने हिजाब न परिधान करता खेळ खेळला. ही बाब इराणच्या इस्लामिक ड्रेसकोड नियमाच्या विरोधात होती.
- स्पेनचे कायदा मंत्री पिलर होप यांच्या हवाल्याने एका अधिकाऱ्याने ही बाब स्पष्ट केली की तिथल्या कॅबिनेटने मंगळवारी (२५ जुलै) सारा खादेमवर ओढवलेली विशिष्ट परिस्थिती लक्षात घेता तिला स्पेनचं नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका, युरोपच्या आर्थिक चुकांमुळे महागाई; पुतिन
- रशियाच्या युक्रेनविरोधातील लष्करी कारवाईमुळे जागतिक अन्नधान्य दरांत वाढ झाल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फेटाळला आणि या समस्येचे मूळ पाश्चिमात्य देशांच्या ‘आर्थिक चुकां’मध्ये हे असल्याचा प्रत्यारोप केला.
- सेंट पीटर्सबर्ग येथे रशिया-आफ्रिका शिखर परिषदेत पुतीन म्हणाले की, अमेरिका आणि युरोपीय महासंघाने करोना साथ रोगाचा परिणाम म्हणून अन्न खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर चलनाचे मुद्रण केल्यामुळे अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पाश्चात्य अर्थव्यवस्थांनी करोना साथीला तोंड देण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांकडे पुतिन यांचा रोख होता.Daily Current Affairs in Marathi