Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) 2 ऑगस्ट 2023

0
63
Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)   2 ऑगस्ट 2023

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

IPL 2024 चा हंगाम विदेशात होणार? जाणून घ्या काय आहे कारण

Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi
  • क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएलबाबत एक मोठी बातमी आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ लवकरच आयोजित केली जाऊ शकते. एका अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच आयपीएल २०२४ चे आयोजन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे हा हंगाम परदेशातही होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
  • बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहिती नुसार, बीसीसीआय लवकरच आयपीएल २०२४ चे आयोजन करू शकते. त्यासाठी लवकरच खिडकीचा शोध घेतला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलवर परिणाम होऊ शकतो. आयपीएल २०२४ मार्चमध्ये आयोजित केले जाऊ शकते. त्याचा अंतिम सामना मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. पण सध्या संपूर्ण लक्ष २०२३ च्या विश्वचषकावर आहे. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जाईल.
  • बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “होय, आम्हाला पुढील आयपीएलमध्ये येणाऱ्या अडचणींची जाणीव आहे. आमच्याकडे जूनमध्ये इंग्लंडची मालिका आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका तसेच विश्वचषक आहे. पण आता काहीही नियोजन करणे खूप घाईचे आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनाकडे आपल्या सर्वांचे लक्ष आहे. डिसेंबर-जानेवारीमध्येच कोणताही निर्णय घेतला जाईल.”
  • ते पुढे म्हणाले, “आयपीएल आणि निवडणुकांच्या तारखा एकमेकांत भिडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१४ मध्ये आम्ही पूर्णपणे आयपीएलचे भारतात आयोजन केले होते. त्यामुळे ते बाहेर आयोजित करण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. पण तसे झाले तर वेळ आल्यावर विचार करू. आता असे करणे खूप घाईचे आहे. आम्ही ही स्पर्धा भारतातच ठेवण्याचा प्रयत्न करू आणि टी-२० विश्वचषकापूर्वी खेळाडूंना विश्रांतीची संधी देऊ.”Daily Current Affairs in Marathi 

पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर थोड्याच वेळात पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर उतरणार

  • ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी राज्यात मोठा अपघात झाला आहे. शहापूर येथे समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना क्रेन कोसळल्याने १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बचावकार्य सुरू झाले आहे. तर, दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
  • लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने अवघ्या राज्याचं लक्ष आज पुण्याकडे लागलेलं आहे. हा कार्यक्रम अराजकीय असला तरीही अेनक राजकीय नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय.
  • दरम्यान, शहापूर येथे मोठा अपघात झाल्याने मोदी आज तिथे भेट देतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ISROच्या प्रक्षेपकाचे अवशेष ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर?

  • काही महिन्यांपूर्वी चीनने उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरलेल्या रॉकेटचे अवशेष जमिनीवर पडल्याने चीनचे उपग्रह प्रक्षेपण वादात सापडले होते. असं गेल्या काही वर्षात किमान तीन वेळा घडून आलं आहे. २०२२ मध्ये एप्रिल महिन्या विदर्भातील काही भागात रात्री आकाशातून काही वस्तू जळत जमिनीवर पडल्याचं हजारो नागरीकांनी पाहिलं होतं, काही दिवसानंतर ते चीनच्या रॉकेटचे अवशेष असल्याचं स्पष्ट झालं होतं.
  • असं असतांना आता यावेळी चर्चेत रहाण्याची वेळ भारतावर- इस्रोवर आलेली आहे. इस्रोने काल रविवारी म्हणजेच ३० जुलैला PSLV या प्रक्षेपकाद्वारे सिंगापूरचे उपग्रह प्रक्षेपित केले होते. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील श्रीहरीकोटवरुन आग्नेय दिशेला हे प्रक्षेपण झाले होते. इस्रोच्या प्रक्षेपकाचे – रॉकेटचे विविध टप्पे हे ज्वलन प्रक्रिया झाल्यावर वेगळे होतात आणि अवकाशातून जमिनीच्या दिशेने येतांना वातावरणात जळून नष्ट होतात. मात्र यापैकी एक वस्तू ही ऑस्ट्रेलियातील Jurien Bay या किनाऱ्यावर आढळून आली आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या अवकाश एजन्सीच्या @AusSpaceAgency या ट्विटर वरुन याबाबत दुजोरा देण्यात आला आहे. एक वस्तू किनाऱ्यावर आढळून आली असून ती PSLV रॉकेटच्या तिसऱ्या टप्पातील भाग असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत आणखी माहिती घेण्यासाठी इस्रोशी संपर्कात असल्याचं म्हंटलं आहे.Daily Current Affairs in Marathi 

एप्रिल-मेमध्ये १४,००० कोटींचा वस्तू व सेवा कर चुकविला!

  • चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये जीएसटी चुकवल्याची २ हजार ७८४ प्रकरणे उघड झाली असून त्यामध्ये १४ हजार ३०२ कोटींची करचुकवेगिरी झाली, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी संसदेला दिली. या गुन्ह्यासाठी २८ जणांना अटक करण्यात आली असून ५ हजार ७१६ कोटींचा चुकवलेला जीएसटी वसूल करण्यात आला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले.
  • प्रश्नोत्तराच्या तासामध्ये एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये सीतारामन यांनी जीएसटी, आयकर चुकवेगिरीचे तपशील तसेच सीमाशुल्क विभागाकडून पकडण्यात आलेल्या तस्करीसंबंधी माहिती दिली. सरकारकडील आकडेवारीनुसार, २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीमध्ये जीएसटी चुकवल्याची ४३ हजार ५१६ प्रकरणे उघड झाली असून या कालावधीत २ लाख ६८ हजार कोटींपेक्षा जास्त जीएसटी चुकवेगिरी लक्षात आली आहे. यादरम्यान १ हजार २० लोकांना अटक करण्यात आली असून ७६ हजार ३३३ कोटी चुकवलेला जीएसटी वसूल करण्यात आला.
  • सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये आयकर विभागाने राबवलेल्या शोध आणि जप्ती कारवायांमध्ये ३ हजार ९४६ समूहांवर शोध कारवाई करण्यात आली आणि ६ हजार ६६२ कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. गेल्या म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ७४१ समूहांवर शोध कारवाई करून १ हजार ७६५ कोटी ५६ लाख मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. तर गेल्या चार वर्षांमध्ये सीमाशुल्क विभागाकडून सुमारे ४६ हजार कोटी मूल्यांची ४२ हजार ७५४ तस्करीची प्रकरणे उघड करण्यात आली.Daily Current Affairs in Marathi 

Chandrayaan 3 च्या निर्णायक प्रवासाला सुरुवात, चंद्राच्या कक्षेत कधी पोहचणार?

  • चांद्रयान ३ हे १४ जुलैला प्रक्षेपित करण्यात आले होते. गेले काही दिवस यान हे पृथ्वीच्या भोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते, प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळी पृथ्वीपासूनचे अंतर वाढवत होते. आज मध्यरात्री २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ यानाचे इंजिन प्रज्वलीत करण्यात आले. यामुळे यानाचा वेग वाढत तो सुमारे १० किलोमीटर प्रति सेंकद एवढा झाला आणि यान पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदण्यात यशस्वी झाल्याचं इस्रोने जाहिर केलं आहे.
  • चांद्रयान ३ मोहिमेच्या महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस चांद्रयान ३ चा प्रवास चंद्राचा दिशेने सुरु राहील. पाच ऑगस्टच्या सुमारास पुन्हा एकदा यानावरील इंजिन प्रज्वलीत केले जाईल आणि यानाला चंद्राच्या कक्षेत आणले जाईल.
  • त्यानंतर पुढील काही दिवस यानाची चंद्राभोवती लंबवुर्तळाकार कक्षा कमी करत यानाला १०० किलोमीटच्या कक्षेत आणलं जाईल. त्यानंतर चंद्रावरील उतरण्याची जागा निश्चित केल्यावर ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात चंद्रावर अलगद उतरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘टीईटी’ गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरतीत अपात्र करण्याची मागणी

  • राज्यात २०१९ आणि २०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेत अपात्र करण्याची व पवित्र संकेतस्थळावर नोंदणी करण्यास प्रतिबंध करण्याची मागणी डीटीएड, बी.एड. स्टुडंट असोसिएशनने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
  • गेल्यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षेचा गैरप्रकार उघडकीस आला. त्यात सुमारे सात हजार ८८० उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानुसार गैरप्रकार केलेल्या  उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांना पुढील पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्याचे परिपत्रक राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केले आहे. मात्र, गैरप्रकार केलेल्या उमेदवारांनी प्रस्तावित शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेली अभियोग्यता परीक्षा व बुद्धिमापन चाचणी परीक्षा दिली आहे. अनेक उमेदवारांनी टीईटी परीक्षा देऊन अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी दिली आहे.
  • मात्र, संबंधित उमेदवार शिक्षक होण्यास नैतिकदृष्टय़ा पात्र नाहीत. त्यामुळे आधार पडताळणीद्वारे त्यांना प्रतिबंधित करावे, जेणेकरून त्यांचा निवडयादीत विचार होणार नाही. अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीत संबंधित उमेदवारांना अपात्र करून पवित्र संकेतस्थळावर नोंदणी करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष संतोष मगर यांनी केली.Daily Current Affairs in Marathi