Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 29 January 2023
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी:29 जानेवारी 2023
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता चालू घडामोडी (Daily Current Affairs in Marathi)29 जानेवारी 2023 पाहुयात.
एकूण 106 पद्म पुरस्कारांची घोषणा:
- भारत सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.
- यावेळी केंद्र सरकारने एकूण 106 पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत.
- यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर 91 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- केंद्र सरकारने एकूण 106 पद्म पुरस्कारांपैकी 6 जणांना पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण तर 91 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
- यामध्ये 19 मान्यवर महिला आहेत. तर यामध्ये 2 एनआरएय, परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022
✅ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2
✅Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!
✅IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022
चालू घडामोडी
महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’जाहीर:
- प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त 901 पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
- यापैकी 140 पोलीस कर्मचाऱ्यांचा शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
- तर 93 पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे.
- याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 668 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झालं आहे.
- यामध्ये महाराष्ट्रातील 31 पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे.
- तसेच,चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 39 पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.
- याशिवाय, 55 जवानांना होमगार्ड व सिविल डिफेंस मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे.
- हे शौर्य पदक होमगार्ड आणि नागरिक सुरक्षेसाठी जवानांच्या शौर्यासाठी दिले जाते.
- उत्कृष्ट सेवा आणि नागरी संरक्षणासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा आणि नागीर संरक्षण पदक प्रदान केले जाते.
- हे पदक 9 जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आणि 45 जवानांना नागरी संरक्षणासाठी दिले जाते.
महाराष्ट्राच्या चित्ररथात गाजला नारीशक्ती आणि देवीचा गजर:
- भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला.
- यावर्षीच्या पथसंचलनात 17 राज्ये आणि दहा विविध केंद्रीय मंत्रालयांनी मिळून 27 चित्ररथ कर्तव्यपथावर सादर केले.
- महाराष्ट्राने यापूर्वी 40 वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे.
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” ही संकल्पना सादर केली आहे.
- या माध्यमातून महाराष्ट्रातील पुरातन मंदिरे आणि महिलांचे कर्तुत्व या गोष्टीला सर्वांच्या समोर आणता येतील.
नौदलाच्या ‘या’ टेहळणी विमानाचे कर्तव्यपथावर ठरले पहिले आणि शेवटचे उड्डाण:
- 26 जानेवारीला कर्तव्यपथावरुन संरक्षण दल, निमलष्करी दल, तसंच केंद्र सरकारच्या विविध तुकड्या संचलन करतात.
- तसंच या संचलनाच्या शेवटी संरक्षण दलातील लढाऊ विमाने, मालवाहू विमाने, हेलिकॉप्टर हे कर्तव्यपथावरुन उड्डाण करत सलामी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
- यावेळी झालेल्या संचलनात नौदलाच्या एका टेहळणी विमानाने पहिल्यांदाच सहभाग घेतला होता.
- यावेळी त्या टेहळणी विमानाने कर्तव्यपथावरुन केलेले पहिले आणि शेवटचे उड्डाण ठरले.
- या टेहळणी विमानाचे नाव आहे IL-38, हे नौदलाच्या सेवेतून गेल्या वर्षी, 17 जानेवारी 2022 ला निवृत्त झाले होते.
- यानिमित्ताने एका vintage aircraft ने कर्तव्यपथावरुन उड्डाण केलं असंच म्हणावे लागेल.
- रशियन बनावटीचे IL-38 हे टेहळणी विमान हे 1977 ला नौदलाच्या सेवेत दाखल झाले होते.
- अशी एकूण पाच विमाने दाखल झाली होती, 2002 ला झालेल्या एका अपघातात दोन विमाने नौदलाने गमावली होती.
- असं असलं तरी भारताच्या तिन्ही बाजूला पसरलेल्या अथांग समुद्रावर नजर ठेवण्याचे काम हे या IL-38 टेहळणी विमानाच्या माध्यमातून केले जात होते.
- एका दमात 13 हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची किंवा सलग 13 तास उड्डाण करण्याची या विमानाची अनोखी क्षमता होती.
नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस बाजारात उपलब्ध:
- करोनाविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक यश मिळालं असून नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे.
- इन्कोव्हॅक (Incovacc) असं या लसीचं नाव आहे.
- भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या या लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्याहस्ते वितरण करण्यात आलं.
- इन्कोव्हॅक या लसीसाठी भारत बायोटेकला डिसेंबर 2022 मध्ये मान्यता मिळाली होती.
- ही लस वर्धक मात्रा म्हणून देखील देता येणार आहे.
- यापूर्वी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड या लसींची मात्रा घेणारे सुद्धा वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅकचा वापर करू शकतात.
icc क्रमवारीत शुबमन गिलची उडी:
- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपुष्टात आली आहे.
- या मालिकेत भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि सलामीवीर शुबमन गिलने वेगवान फलंदाजी केली.
- गिलने या मालिकेत 360 धावा करत बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली.
- या कामगिरीचा फायदा गिलला आयसीसी क्रमवारीत मिळाला आहे.
- यात गिल आता सहाव्या स्थानावर आला आहे.
सूर्यकुमार ठरला क्रिकेटर ऑफ द इयर 2022:
- भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव फॉर्मात आहे.
- त्याने गेल्या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या होत्या.
- सूर्यकुमार यादवची ICC ने 2022 सालच्या ‘पुरुष टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’पुरस्कारासाठी निवड केली आहे.
- सूर्या ‘द-स्काय’ टी20 मध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
- सूर्याला ICC पुरूष क्रिकेटपटू ऑफ द इयर 2022चा पुरस्कार मिळाला आहे.
Importance of Daily Current Affairs in Marathi
Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर (Daily Current Affairs in Marathi) आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.