प्रत्येक failure ला हरवणारे Deputy collector रामदास दौंड
सामान्य कुटुंबात राहणारे रामदास विष्णू दौंड यांनी प्रत्येक failure ला हरवत डेप्युटी कलेक्टर ची पदवी मिळवली. त्यांच्या यशाचा प्रवास कसा झाला हे जाणून घेण्यासाठी हा लेख व त्यांची यशोगाथा पूर्ण वाचा. ती निश्चितच तुम्हाला आवडेल व त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल. त्यांची जिद्द, चिकाटी, मेहनत व प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते हे त्यांच्या अनुभवातून त्यांनी दाखवून दिलेली आहे.
तसं पाहायला गेलं, तर रामदास विष्णू दौंड हे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले. सर्वांसारखच त्यांचं बालपण गेलं. अकरावी-बारावी शिक्षण झाल्यानंतर त्यांनी जेव्हा बीएससी ऍग्री ला ऍडमिशन घेतलं तेव्हा एग्रीकल्चरल कॉलेजमधील स्पर्धा परीक्षेचे वातावरण, इतर सीनियर विद्यार्थ्यांचे अभ्यास करताना चे observation यामुळे त्यांच्यामध्ये नकळत आपणही अधिकारी व्हावं हे रुजत गेलं.
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील रामदास विष्णू दौंड. गावाकडे त्यांची थोडीफार शेती आहे .त्यांचे वडील माजी सैनिक व आई गृहिणी आहे .त्यांचे अकरावी-बारावीचे शिक्षण अहमदनगरला झाले. त्यानंतर त्यांनी बीएससी ऍग्रीला admission घेतलं. एग्रीकल्चरल कॉलेज मध्ये असल्यापासून स्पर्धा परीक्षेचे ग्लॅमर होतं. त्यामुळे अधिकारी बनायचं व रुबाबात राहायचं ,सगळ्यांना जसा मान-सन्मान मिळतो तसा आपल्याला ही मिळाला पाहिजे असं त्यांचे स्वप्न होतं.
पण, प्रत्यक्षात अभ्यासाला सुरुवात झाली नाही . परिणामी व्हायचं तेच झालं. कॉलेजच्या दुसर्या वर्षाला असताना एक विषय बॅक राहिला. तेव्हा ते म्हणतात की तेव्हापासून मला खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला दिशा मिळाली .तेव्हा त्यांनी ठाम निश्चय केला की ग्रॅज्युएशननंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची.
स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणजे त्यासाठी क्लास लावावे लागणार, रूमचे भाडे, जेवण या सर्वांचा खर्च काढला. तो महिना दहा हजार अाला. तो खर्च कुटुंबाला पेलवणारा नव्हता, म्हणून एग्रीकल्चरल कॉलेजला तेथे राहूनच अभ्यास करायची परवानगी मागितली .कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे ती दिली .त्यामुळे खर्च पाच हजार रुपये महिना झाला. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये त्यांनी अभ्यास केला इतर मुलांना देखील तिथे अभ्यासासाठी यावे लागत होते त्यामुळे काही तासच लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी मिळायचे .त्यामुळे मिळेल त्या शांत ठिकाणी त्यांनी अभ्यास केला . झाडाखाली, अगदी स्ट्रीट लॅम्पखाली बसून सुद्धा त्यांनी परीक्षेसाठी ग्रुप डिस्कशन केलं.
अभ्यासामध्ये त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. दिवस रात्र अभ्यास केला.ते म्हणतात की बर्याचदा माझं distraction व्हायचं ,विचार बदलायचे ,मित्रांसोबत ट्रेकिंग करावं असं वाटायचं .तसं झालंही पण पुन्हा mindset करुन नियोजन करायचे आणि अभ्यास करायचे. त्यानंतर त्यांनी असे नियोजन केले की सोमवार ते शनिवार अभ्यास करायचा आणि रविवारी मित्रांसोबत फिरायला जायचं. सोशल मीडियावर खूप कंट्रोल केलं. मोबाईल पंधरा ते वीस मिनिटे फक्त लंच ब्रेक मधेच बघायचा. अभ्यास व इंटरटेनमेंट मध्ये त्यांनी संतुलन साधलं. एकदा त्यांचे मित्र असेच फिरायला निघाले होते ,सिंहगड ट्रेकिंग साठी ते त्यांना म्हणाले एका दिवसाने कुठे मोठा कलेक्टर होणार आहेस. त्यावेळेस ते गेले नाहीत. प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. रामदास दौंड म्हणतात मी त्यादिवशी त्यांच्यासोबत गेलो नाही मला एवढेच सांगायचे की प्रत्येक दिवस हा महत्वाचा असतो.
2017 साली जेव्हा त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा ते फेल झाले निराश झाले, रडायला लागले. तेव्हा त्यांनी वडिलांना फोन केला. त्यांनी सांगितलं खचू नको. वडील त्यांचे माजी स्वातंत्र्यसैनिक होते भरतीच्या वेळी तेसुद्धा सात वेळा रिजेक्ट झाले होते. आठव्यांदा त्यांची सैनिक भरती मध्ये निवड झाली त्यानंतर वडिलांच्या बोलण्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा उमेद आली. त्यानंतर त्यांनी अभ्यासा मधील चुका शोधल्या त्या सुधारल्या. गाढव मेहनत न घेता स्मार्ट स्टडी केली.
ते सांगतात पुण्यात आल्यावर त्यांना खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. पहिल्या परीक्षेच्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह चा सर्वात जास्त केला नव्हता त्यामुळे दुसर्या परीक्षेच्या वेळेस ऑब्जेक्टिवचा सराव केला. मायक्रो नोट्स काढल्या. त्यावेळी त्यांनी तीन परीक्षा दिल्या होत्या. त्या तीनही परीक्षेत त्यांना यश मिळालं.त्यांनी राज्यसेवा मधून सेक्शन ऑफिसर, संयुक्त परीक्षेमधून असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि वन सेवेतून असिस्टंट कंजूमर ऑफ फॉरेस्ट ही पद मिळवली. राज्यसेवा मधून वर्ग दोनचे पद मिळाले. आता वर्ग एकचे का नाही मिळणार ?म्हणून पुन्हा जिद्दीने अभ्यास त्यांनी सुरू केला. वडिलांचा सपोर्ट होताच .
2019 मध्ये प्रीलियम आणि मेन्स दोन्ही पास झाले. इंटरव्यूच्या वेळेस विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचा इंटरव्यू घेतला .20 मिनिटे तो इंटरव्यू चालला होता.जून 2020 साली जेव्हा निकाल लागला तेव्हा त्यांना फोन आला. तुझी उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. त्यांचा विश्वासच बसेना. त्यांनी फोन ठेवला पण त्यांना रिझल्ट बघेपर्यंत इतर मित्रांचे फोन येत राहिले .तेव्हा त्यांनी समजून घेतलं की आपली निवड झालेली आहे.MPSC साईट चेक केली तेव्हा विश्वास बसला की उपजिल्हाधिकारी झाल्याचा. रामदास दौंड सांगतात, मोठी स्वप्न बघा, त्याला push करा, दिवस रात्र अभ्यास न करता स्मार्ट स्टडी करा.आणि आहे त्या क्षेत्रात हायेस्ट लेवल पर्यंत पोहचा.
स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणारे जे अधिकारी असतात त्या प्रत्येकालाच एका प्रयत्नात यश मिळतेच असे नाही अगदी क्वचितच असे असतात की ज्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते परंतु सर्वांनाच अपयश येते ,निराशा येते पण जिद्द व चिकाटी आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर हे यश निश्चितच मिळते त्यासाठी आपणामध्ये असलेले सर्व पोटेन्शिअल वापरून आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रत्येकामध्ये ते असते. ते सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. आपल्याला काय आवडते, आपण काय करू शकतो,आपली क्षमता किती आहे याचा प्रथम आपण अंदाज घेतला पाहिजे आणि त्या दिशेने तयारी केली पाहिजे जबरदस्त इच्छाशक्ती व मेहनत घेण्याची तयारी असेल तर हे यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घालते.
हा लेख तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा व तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या अशाच जिद्दी व प्रेरणादायी मित्रांना या पोस्टची लिंक फेसबूक व व्हाट्सअप यासारख्या सोशल मीडियावर अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनाही तुमच्यासारखाच या लेखाचा फायदा होईल.