कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात वाढ, आता मिळणार एवढा पगार

0
249

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात वाढ, आता मिळणार एवढा पगार

Employees DA News : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील वाढ मिळणार आहे. मार्च महिन्यापासून ही वाढ लागू होणार असून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात DA ४ टक्के वाढ लागू होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता दिला जातो तर केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महागाई भत्ता किंवा DA ४२ टक्क्यांवर जाईल.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत आताचे मोठे अपडेट 

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. या महागाई भत्ता वाढीवर एका सूत्रावर एकमत झाले आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजला जातो. लक्षात घ्या की लेबर ब्युरो कामगार मंत्रालयाचा एक भाग आहे. यापूर्वी १ जुलैपासून डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली होती, तेव्हापासून महागाई भत्ता ३८ टक्क्यांवर पोहोचला Employees DA News.

पगारामध्ये होणार एवढी वाढ ; येथे क्लिक करून पहा

ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा म्हणाले, “डिसेंबर २०२२ साठी CPI-IW ३१ जानेवारी २०२३ रोजी रिलीज झाला. महागाई भत्त्यात वाढ ४.२३ टक्के आहे, पण सरकार महागाई भत्त्यात दशांश घेत नाही. अशा परिस्थितीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ होऊ शकते. आणि ते ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर जाऊ शकते. डीए वाढवण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाचा खर्च विभाग तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर १ जानेवारी २०२३ पासून महागाई भत्त्यात वाढ लागू होईल Employees DA News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here