नवीन अपडेट – अग्निशमन विभागातील 910 पदे लवकरच भरली जाणार | Fire Department Bharti 2022
Fire Department Bharti 2022
Fire Department Bharti 2022 – Latest Update
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून, उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाचा गाडा हाकला जात आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर येणारा ताण लक्षात घेता ही पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन विभागातील ९१० पदे लवकरच भरली जाणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!
✅Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!
✅Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!
✅10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!
Fire Department Bharti 2022 – Latest Update
- अग्निशमन दलात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्षमता ३,५०० असून, ९१० कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.
- याशिवाय चालकांची क्षमताही कमी असून, ५६ चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे.
- अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने महापालिकेने अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत निविदाही काढण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अग्निशामक जवान म्हणून किमान १७२ सेंटीमीटर उंची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अग्निशमन दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या अग्निशमन सेवा संचालनालयामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांची नोकरीबाबत अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे युवकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
- राज्यभरातील महापालिकेमध्ये अग्निशमन दलामध्ये भरती होताना अग्निशामक जवानाची उंची १६५ सेंटीमीटर असावी, अशी अट आहे.
- तर सरकारी प्रशिक्षण केंद्रामध्येही १६५ सेंटीमीटरची अट आहे.
- राज्य सरकारच्या अखत्यारित अग्निशमन सेवा संचालनालयामध्ये अग्निशमक जवान व अधिकारी पदी भरती होण्यासाठी सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
- संचालनालयामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाला भरतीच्या वेळी मुंबई अग्निशमन दलासह अन्या शहरातील अग्निशमन दलामध्ये प्राधान्य देण्यात येते.
मुंबई वगळता राज्यातील अन्य महानगर व शहरातील अग्निशमन दलामध्ये जवानांची भरती करताना १६५ मीटर उंचीची मर्यादा आहे. मुंबई महापालिका अग्निशमन दलामध्ये १७२ सेंटीमीटर उंचीची सक्ती करण्यात आल्याने मुंबई अग्निशमन दलात भरती होताना अडचणी येणार आहेत.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.