बल (Force)

0
653
बल (Force)

बल (Force)

 1. न्यूटनच्या पहिल्या नियमाच्या अनुसार, अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा एखादी सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूची गती बदलण्यासाठी आवश्यक असणारी भौतिक राशी म्हणजे बल होय.
 2. बलाच्या माध्यमातून आपण-

★ गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात बदल करू शकतो.

★ वेग हे परिमाण तसेच ठेऊन गतीची दिशा बदलू शकतो.

★ म्हणजेच वेगाचे परिमाण व दिशा या दोन्हींमध्ये एका वेळी बदल देखील करू शकतो.

 1. बल या भौतिक राशीला दिशा व परिमाण दोन्ही आहेत त्यामुळे ही सदिश राशी आहे.
 2. CGS या मापन पद्धतीत बलाचे एकक हे डाईन (Dyne) असे आहे. 
 3. 1cm/s^2 वास्तुमानात 1 त्वरण निर्माण करणाऱ्या बलाला 1 डाईन बल असे म्हणतात.
 4. 1 Newton म्हणजे 10^(-5) dynes

बलाचे प्रकार (Types of Forces)

 1. गुरुत्वाकर्षण बल- पृथ्वी तिच्या पृष्ठभागावर असणाऱ्या आणि सभोवताली असणाऱ्या वस्तूंवर जे आकर्षण बल प्रयुक्त करते त्याला गुरुत्वाकर्षण बल (Gravitational Force) असे म्हणतात.
 2. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व वस्तूंच्या गती या गुरुत्वाकर्षण बलाने प्रभावित झालेल्या असतात.
 3. ग्रह, तारे, उपग्रह, कृत्रिम उपग्रह या सर्वांच्या गती या गुरुत्वाकर्षण बलामुळे आहेत.
 4. विद्युत चुंबकीय बल- वस्तूचे अणू व रेणू या दोघांना एकत्र ठेवणाऱ्या बलाला विद्युत चुंबकीय बल म्हणजेच Electromagnetic Force असे म्हणतात.
 5. हे बल गुरुत्वाकर्षण बलाच्या पेक्षा खूप जास्त मोठे असते.
 6. समुद्रकिनारी मोठं मोठे कंटेनर्स उचलण्यासाठी वापरण्यात येणारे साधन हे electromagnetic force चे उदाहरण आहे.
 7. केंद्रकिय बल- अणूचे केंद्रक आणि त्यात असणाऱ्या कणांना एकत्र ठेवण्यासाठी जे बल कार्यरत असते त्याला केंद्रकिय बल किंवा Nuclear Force असे म्हणतात.
 8. केंद्रकिय बल हे सर्वात प्रबळ बल असते.
 9. गुरुत्व बलाची सापेक्ष तीव्रता ही 1 असते.
 10. विद्युत बलाची सापेक्ष तीव्रता ही 1038 असते.
 11. केंद्रकिय बलाची सापेक्ष तीव्रता ही 1040 असते.
बलउदाहरण
यांत्रिक बलविहिरीतून राहटाने पाणी काढणे
रेणू बलपाण्याच्या थेंबात बल
चुंबकीय बललोह कणांचे चुंबकाला चिटकणे
विद्युत बलकेसावर फिरवलेल्या कंगव्याकडे कागदाच्या तुकड्यांची होणारे आकर्षण
गुरुत्वाकर्षण बलझाडावरून खाली पडणारे फळ
घर्षण बलमैदानावर घरंगळत जाऊन चेंडूचे थांबणे
केंद्रकिय बलअणुकेंद्रकात कण एकत्र ठेवणे
विद्युत चुंबकीय बलअणू व रेणू यांना एकत्र ठेवणे
गुरुत्व बलउपग्रहांचे गती आणि कक्षा

न्यूटनचा गुरुत्वाकर्षनाचा नियम

Newton’s Law of Gravitation

 1. एक पदार्थ दुसऱ्या पदार्थावर प्रयुक्त केलेले गुरुत्व बल हे त्या पदार्थाच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि पदार्थातील अंतराच्या व्यस्तानुपाती असते.
 2. पदार्थांचे वस्तुमान हे m1 आणि m2 असे आहे.

पदार्थातील अंतर हे D असे आहे.

दोन्ही पदार्थातील आकर्षण बल हे F आहे.

या सूत्रात G हा एक स्थिरांक आहे, याला गुरुत्व स्थिरांक (Gravitational Constant) असे म्हणतात. 

या स्थिरांकाची किंमत ही 6.67 × 10^(-11) Nm^2/Kg^2 (न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग) आहे.

 1. गुरुत्वाकर्षण बलामुळे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते.

काही महत्वाचे पदार्थ व त्यांची घनता-

पदार्थघनता (Kg/m^3)घनता (g/cm^3)
1इरिडियम2240022.4
2प्लॅटिनम2150021.5
3सोने1930019.3
4पारा1360013.6
5शिसे1130011.3
6चांदी1050010.5
7तांबे89608.9
8पितळ85008.5
9पोलाद78007.8
10कथिल73007.3
11जस्त71307.1
12ओतीव लोखंड70007
13एल्युमिनियम27002.7
14संगमरवर27002.7
15ग्रॅनाईट26002.6
16काच25002.5
17चिनीमाती23002.3
18सल्फ्युरिक ऍसिड18001.8
19समुद्राचे पाणी 10301.03
20मलई काढलेले दूध10321.032
21मलई न काढलेले दूध10281.028
22शुद्ध पाणी10001
23मशीनचे तेल9000.9
24मेण9000.9
25बर्फ9000.9
26अल्कोहोल8000.8
27पेट्रोल7100.71

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here