Maharashtra FYJC Admission 2023 Pune, Mumbai, Nagpur, Amravati & Maharashtra
दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला जर पुणे-मुंबई सारख्या महानगरांतील शाळांमध्ये अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आत्ताच तयारीला लागावे लागेल.कारण, अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून, विद्यार्थ्यांना येत्या २५ मे पासून ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत असणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील महानगर पालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यासाठी राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे (Pune News) व पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात. २०२३-२४ या वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक राज्याचे नवनियुक्त माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी येत्या २० ते २४ मे या कालावधीत प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करू शकतात, असे देखील राज्य माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे. प्रवेशाची पहिली फेरी निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबविली जाईल. दुसरी व तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस आणि विशेष प्रवेश फेरी १ सात ते आठ दिवस राबविण्यात येईल, असे राज्य मंडळातर्फे नमूद करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक विद्यालयांना २० मे ते इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत नोंदणी करता येणार आहे. इयत्ता अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर उपलब्ध करून दिला जाईल. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.