
अवकाळी पाऊसाचा शासन निर्णय (GR) आला ! या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार | GR Update 2023
GR Update 2023
राज्यात मार्च, 2023 (दि. 04 ते 08 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च, 2023) या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. अवेळी पाऊस ही राज्य शासनाकडून आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली असल्यामुळे 33% टक्क्यापेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात भरपाई दिली जाते.

शासन निर्णय व 23 जिल्ह्याची यादी ! येथे पहा
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ अश्या नैसर्गिक संकटापासून शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे व आर्थिक मदत व्हावी, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून करण्यात आलेल्या विविध दराने मदत दिली जाते.
अवकाळी पाऊस नुकसान भरपाई मिळणार
शेतकऱ्यांच्या पिकाच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना किती प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी या संदर्भातील सुधारित दर व निकषाचा शासन निर्णय 01 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आलेला आहे.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
मार्च 2023 या कालावधीत झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीबाबत अनुज्ञेय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून 8 मार्च 2023 च्या पत्रान्वये मागण्यात आले होते.
एकूण इतकी मदत जाहीर
राज्यात माहे मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या व इतर नुकसानीसाठी बाधितांना आपत्ती प्रतिसाद निधीमधून 17780.61 लक्ष्य रु. (एकशे सत्याहत्तर कोटी ऐशी लाख एकसष्ठ हजार ) इतका निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णय व 23 जिल्ह्याची यादी ! येथे पहा
या 23 जिल्ह्यांनाच मदत
अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शासन निर्णयामध्ये नमूद फक्त 23 जिल्ह्यांनाच दिली जाणार आहे. कारण हवामान विभागामार्फत त्याचप्रमाणे इतर माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील फक्त 23 जिल्ह्यांमध्येच अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.