IT Professional After 12th : १२ वीचे विद्यार्थी आता होणार IT professional सोबतच मिळणार १० हजार रुपये विद्यावेतन!
IT Professional After 12th
IT Professional : इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात प्रोफेशनल मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे, राज्य सरकारने ‘HCL Tech’ कंपनीसोबत महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सहा महिने मोफत प्रशिक्षण व सहा महिने लाइव्ह प्रोजेक्टस् वर काम करण्याची संधी मिळणार आहे. तर या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये 10 हजार रुपये प्रशिक्षण भत्ता (Stipend) मिळणार आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना IT Professional होण्याची सुवर्णसंधी
आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य असणाऱ्या ‘HCL Tech’ कंपनीसोबत महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्य शासनातर्फे Maharashtra Young Leader Aspiration Development Program (MYLAP) राबविला जात आहे. ‘HCL Tech’ कंपनीच्या ‘HCL Tech-B’ या उपक्रमांतर्गत 38 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 20 हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.IT Professional After 12th
दरमहा मिळणार 10 हजार रुपये विद्यावेतन
‘HCL Tech-B’ या उपक्रमांतर्गत बारावी गणित विषय असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच 6 महिने मोफत प्रशिक्षण व 6 महिने Live Projects वर काम करण्याची संधी मिळणार आहे. या सहा महिन्यांच्या Internship कालावधीमध्ये 10 हजार रुपये प्रशिक्षण भत्ता (Stipend) मिळणार आहे.
एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना IT Professionals म्हणून पूर्णवेळ नोकरी, पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील नियोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांचे BITS Pilani, Shastra, Amity, IIM-Nagpur and KL. अशा नामवंत विद्यापीठांमधूनच उच्च शिक्षण पूर्ण केले जाणार आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात HCL कंपनी शिष्यवृत्ती (Scholarship) स्वरूपात देणार आहे.IT Professional After 12th
या उपक्रमासाठी सन 2023 मध्ये बारावी Science शाखेमधून किमान 60% व गणित विषयात 60 गुण मिळविलेले विद्यार्थी www.hcltechbee.com या संकेतस्थळावर मोफत नोंदणी करू शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 7020637271 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ‘समग्र शिक्षा’ चे राज्य प्रकल्प समन्वयक यांनी केले आहे.IT Professional After 12th
