आता गर्भवती महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा ! महिलांसाठी शासनाचा महत्त्वकांक्षी निर्णय : जननी सुरक्षा योजना
राज्यातील महिलांसाठी राज्य शासनामार्फत नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून, आता जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा (Sonography Facility) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिलांच्या गरोदरपणात बाळाची योग्य वाढ होणं आई व बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. त्यासाठी वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक असते. खेड्यातील तसेच शहरातील महिला बऱ्याच वेळी पैशाअभावी सोनोग्राफी करून घेत नाहीत; परिणामी बाळाची गर्भात योग्य वाढ झाली आहे का नाही किंवा त्यात व्यंग आहे का ? याचे वेळीच निदान होत नाही.
Janani Suraksha Yojana काय आहे ?
वरील सर्व बाबींचा विचार करून जननी सुरक्षा योजना अंतर्गत महिलांना आता मोफत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जननी सुरक्षा योजना काय आहे ?

या योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देऊन आई व बाळाच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत 12 एप्रिल 2005 पासून जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना बाळाच्या गर्भापासून बाळाच्या जन्मापर्यंत विविध स्तरावर आर्थिक मदत (Financial) केली जाते. यामध्ये आता आणखी एक मोफत सोनोग्राफीची नवीन सुविधा जोडण्यात आली आहे.
मोफत सोनोग्राफी योजना सुरू
महानगरपालिका, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात गरोदर स्त्रियांची मोफत सोनोग्राफी केली जाते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात मातृत्व अभियानाअंतर्गत महिलांची तपासणी केल्यानंतर सलग्न खाजगी सेंटरमध्येसुद्धा एक वेळी मोफत सोनोग्राफी केली जाते.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.