Jivhala Karj Yojana:जिव्हाळा कर्ज योजना !!

0
28
Jivhala Karj Yojana
Jivhala Karj Yojana

Jivhala Karj Yojana

Jivhala Karj Yojana:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना,महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते. त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव जिव्हाळा कर्ज योजना आहे. 

महाराष्ट्र राज्यात शिक्षा भोगत असणारे लाखो कैदी आहेत परंतु त्यातील बहुतांश कैदी हे कौटुंबिक वादातून तसेच छोट्या छोट्या वादातून शिक्षा भोगत आहेत हे कैदी त्यांच्या कुटुंबातील एक कमावता व्यक्ती असल्यामुळे त्यांना कारागृहात टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहात होते व त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जसे की त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च, दवाखान्याचा खर्च तसेच दैनंदिन जीवनाचा खर्च व इतर समस्यांना तोंड द्यावे लागते.या सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहाय्याने jivhala karj yojana सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना 7 टक्के व्याज दराने 50,000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. जेणेकरून या कर्जाच्या सहाय्याने ते आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाची तसेच व्याजाची परतफेड कैद्यांना कारागृहात कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नातून करण्यात येईल.
लाभार्थी कैद्यांची बँक खाती राज्य बँकेत उघडण्यात येणार आहेत.त्यामध्ये कैद्यांचे उत्पन्न जमा करण्याची जबाबदारी कारागृहातील प्रशासनाची असून त्यातून कर्जाची परतफेड करून घेण्यात येईल.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आहे.

आम्ही जिव्हाळा योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जिव्हाळा योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नाव जिव्हाळा योजना
विभाग समाज कल्याण विभाग
राज्य महाराष्ट्र
योजनेची सुरुवात 1 मे 2022
लाभार्थी दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेले कैदी
लाभ 50,000/- रुपयांचे कर्ज
उद्देश्य कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करने

जिव्हाळा कर्ज योजनेचा उद्देश्य

Jivhala Yojana Purpose

  • कुटुंबातील कर्ता व्यक्ती कारागृहात शिक्षा भोगत असल्या कारणामुळे त्यांच्या कुटुंबांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने जिव्हाळा कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • वर्षानुवर्षे विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने jivhala karj yojana सुरु करण्यात आली.
  • कैद्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारणे.
  • कैद्यांच्या कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • कैद्यांच्या कुटुंबांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासू नये.

जिव्हाळा योजना वैशिष्ट्ये

Jivhala Karj Yojana Features

  • जिव्हाळा कर्ज योजना महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.
  • कैद्यांची मानसिकता बदलण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी जिव्हाळा कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • प्रायोगिक तत्वावर या योजनेची सुरुवात येरवडा कारागृहातून करण्यात आली आहे.
  • जिव्हाळा कर्ज योजनेची सुरुवात राज्यातील सर्व कारागृहात करण्यात आली आहे.
  • कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ही देशातील पहिलीच योजना आहे.
  • जिव्हाळा कर्ज योजना ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे.
  • जिव्हाळा कर्ज योजनेच्या सहाय्याने कैद्यांमध्ये आपलेपणची भावना वाढण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज कैद्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

जिव्हाला योजना चे लाभार्थी

Jivala Yojana Maharashtra Beneficiary

  • जिव्हाळा कर्ज योजना एखाद्या गुन्ह्यात दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.

जिव्हाळा कर्ज योजनेचे फायदे

Jivhala Karj Yojana Benefits

  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत राज्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मुलांचे शिक्षण,आरोग्य,दैनंदिन गरजांसाठी कमी व्याज दरात 5000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाला कोणत्याही प्रकारचे तारण अथवा जामीनदाराची आवश्यकता नाही.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जाणार नाही.
  • कर्ज परतफेड रकमेच्या 1 टक्का निधी कैद्यांच्या कल्याण निधीला देण्यात येते.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज

Jivhala Yojana Maharashtra

  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थी कैद्यांच्या कुटुंबांना 50,000/- रुपयांचे कर्ज दिले जाते.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत आकारण्यात येणारा व्याजदर

Jivhala Scheme In Marathi Interest Rate

  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत 7 टक्के व्याजदर आकारला जाईल.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता

Jivhala Yojana Maharashtra In Marathi Eligibility

  • शिक्षा भोगत असलेला कैदी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेले कैदी जिव्हाळा कर्ज योजनेसाठी पात्र असतील.

जिव्हाळा योजना महाराष्ट्र अटी

Jivhala Yojna Terms & Condition

  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कैद्यांना जिव्हाळा कर्ज योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • प्रथमच गुन्हा भोगत असलेल्या कैद्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • लाभार्थ्याला देण्यात येणाऱ्या कर्ज रकमेवर 7 टक्के दराने व्याज आकारला जाईल.
  • कैद्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची कोणतीही जबाबदारी राज्य शासनाची असणार नाही.
  • कैद्यांचे कारागृहातील उत्पन्न बघुनच जिव्हाळा कर्ज योजनेचा लाभ दिला जाईल.
  • दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज रद्द होण्याची कारणे

Jivala Karj Yojana

  • कैदी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • कैदी दीर्घकालीन शिक्षा भोगत नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • कैद्यांचे कारागृहात उत्पन्न नसेल तर अर्ज रद्द केला जाईल.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Jivhala Loan Scheme Maharashtra Registration Process

जिव्हाळा कर्ज योजना ही फक्त शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांसाठी सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे कैद्यांच्या कुटुंबांना कारागृहाशी संपर्क साधावा लागेल आणि योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज कारागृहातील प्रशासनाकडे जमा करावा.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

जिव्हाळा कर्ज योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे? 

जिव्हाळा कर्ज योजना महाराष्ट्र राज्यातील कैद्यांसाठी लागू आहे.

जिव्हाळा कर्ज योजनेचा अर्ज कोठे मिळेल? 

जिव्हाळा कर्ज योजनेचा अर्ज कारागृहातील प्रशासनांकडे मिळेल.

जिव्हाळा कर्ज योजनेचा लाभ कोणत्या कैद्यांना देण्यात येईल? 

जिव्हाळा कर्ज योजनेचा लाभ दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना देण्यात येईल.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्ग किती कर्ज दिले जाते?

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कैद्यांच्या कुटुंबांना 50000 /- रुपयांचे कर्ज दिले जाते.

 

Madh Kendra Yojana
Madh Kendra Yojana
Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana
Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana
Annasaheb Patil Loan Scheme
Annasaheb Patil Loan Scheme

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ