Kunbi Caste Certificate:कुणबी जात प्रमाणपत्र कुठे आणि कसे मिळणार ? 

0
33
Kunbi Caste Certificate
Kunbi Caste Certificate

Kunbi Caste Certificate:कुणबी जात प्रमाणपत्र कुठे आणि कसे मिळणार ? 

कुणबी नोंदीवरून ४५ दिवसांत जात प्रमाणपत्र

Kunbi Caste Certificate :महसूल, ग्रामपंचायत, शिक्षण, पोलिस अशा सर्वच शासकीय विभागाकडील १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत पाच कोटींपर्यंत दस्ताऐवज तपासून झाले असून त्यात चार लाखांवर नोंदी आढळल्या आहेत. वंशावळ जुळलेल्या अर्जदाराने कागदपत्रांसह तहसीलदारांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधिताला ४५ दिवसांत जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही देखील सुरु आहे.

अर्जासोबत जोडावीत ‘ही’ कागदपत्रे

  • वंशावळ (वडिल, आजोबा, पणजोबा) काढून त्याची पुराव्यानिशी जुळवावी लागणार
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड जन्म-मृत्यू नोंदीचा १९६७ पूर्वीचा पुरावा
  • कुटुंबातील व्यक्तीचे जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र (बंधनकारक नाही)
  • असल्याची स्थिती आहे. त्यात १९४८ ते १९६७ आणि १९४८ पूर्वीच्या नोंदींची पडताळणी केली जात आहे.

अर्ज कोठे करावा,

  • दाखला किती दिवसात मिळतो…..
  • सेतू बंद असल्याने महा-ई-सेवा केंद्रातून तहसीलदारांकडे करावा अर्ज
  • अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत दाखला देणे बंधनकारक
  • अर्ज करताना जात प्रमाणपत्रासाठी द्यावे लागेल ५३ रुपयांचे शासकीय शुल्क
  • अर्जातील त्रुटींची माहिती अर्जदाराला मोबाईलवर समजणार

कुणबी जात प्रमाणपत्र कुठे आणि कसे मिळणार ? कोण-कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील ? वाचा सविस्तर

Kunbi Caste Certificate :सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम आहे. Maratha Reservation या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे खरे शिल्पकार आहेत मनोज जरांगे पाटील. जरांगे यांनी जवळपास दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. मध्यंतरी शासनाला त्यांनी मराठा आरक्षण सरसकट लागू करण्यासाठी मुदत दिली होती. शासनाने मात्र दिलेल्या मुदतीत त्यांची मागणी पूर्ण केलेली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत.

  • संपूर्ण मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.विशेष म्हणजे जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला सत्ता पक्षातील आणि विपक्ष्यातील बड्या नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. अनेकांनी खासदारकी आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
  • या मुद्द्यावर नुकत्याच सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मराठ्यांना टिकाऊ आरक्षण देण्यासाठी सहमती झाली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्याकडे महसूल व इतर निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाईल अशी घोषणा केली आहे.
  • वंशावळीत कुणबी उल्लेख असलेल्या मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. याचा जीआर देखील निर्गमित करण्यात आला आहे. मात्र जरांगे पाटील सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या मागणीवर ठाम आहेत.
  • सरकारने घेतलेला हा निर्णय जरांगे पाटील यांना मान्य नाही. यामुळे सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणी सरकार दरबारी सुरू झाली आहे. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील सुमित माने या मराठा तरुणाला राज्यातील पहिले कुणबी मराठा प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
  • जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओमसे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र सुमित याला देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठीची प्रक्रिया काय असते. यासाठी कोणकोणते पुरावे सादर करावे लागणार आहेत. याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
  • खर तर शासनाच्या नव्या जीआर नुसार शिंदे सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली आहे. आता आपण या समितीच्या अहवालात कोणकोणत्या बाबींचा उल्लेख आहे हे जाणून घेऊया. या समितीने कुणबी नोंदी शोधण्यासाठी महसूल शैक्षणिक आणि संबंधित नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे.
  • या समितीने अवघ्या 45 दिवसांच्या काळात मराठवाड्यातील एक कोटी 72 लाख नोंदी तपासल्या असून यामध्ये जवळपास तेरा हजार पाचशे नोंदी अशा आढळून आल्या आहेत ज्यामध्ये कुणबी मराठा असा उल्लेख आहे. यामुळे या कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना आता कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

New GR for Kunbi caste certificate

कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारचा जीआर नेमका कसा आहे ?

आता आपण कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारने काढलेल्या नवीन जीआर मध्ये कोणकोणत्या बाबींचा उल्लेख आहे आणि यासाठी कोणकोणते पुरावे सादर करावे लागणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. शासनाने स्थापित केलेल्या शिंदे समितीने 12 विभागातील पुरावे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्राह्य धरले जातील असे स्पष्ट केले आहे.

  • पहिला पुरावा –- महसुली दस्तऐवज : खासरा पत्रक, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, पाहणी पत्रक, नमुना नंबर एक हक्क नोंद पत्रक, क पत्रक, नमुना नंबर दोन हक्क नोंद पत्रक, कुळ नोंदवही, सातबारा उतारा यांसारख्या महत्त्वाच्या नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख असेल तर कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हा पुरावा ग्राह्य धरला जाईल.
  • दुसरा पुरावा –- जन्म व मृत्यू रजिस्टर : रक्त संबंधातील नातेवाईकांचा जन्म व मृत्यू झालेल्या गावातील संबंधित तहसीलमध्ये अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नंबर 14 किंवा कोतवाल बुक नक्कल मध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी येणार आहे.
  • तिसरा पुरावा – – शैक्षणिक दस्तऐवज : रक्त संबंधामधील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा पुरावा देखील कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी येणार आहे.
  • चौथा पुरावा –- राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील दस्तऐवज : अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख यामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा देखील पुरावा प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

  • पाचवा पुरावा –- कारागृह विभागाचे दस्तऐवज : रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिजनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही यामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हे दस्तऐवज देखील प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

  • सहावा पुरावा –- पोलीस विभागाचे दस्तऐवज : गाववारी, गोपनीय रजिस्टर सी एक आणि सी दोन, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे आणि एफ आय आर रजिस्टर यामध्ये जर नोंद असेल तर हे पुरावे देखील कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरले जातील.

  • सातवा पुरावा –- सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील दस्तऐवज : खरेदीखत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करारखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिट्ठी, ठोकपत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्युपत्रक, इच्छापत्रक, तडजोड पत्रक तसेच या विभागातील इतरही अन्य जे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत त्यामध्ये जर नोंद असेल तर हे पुरावे देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी वैध घरातील.
  • आठवा पुरावा –- भूमी अभिलेख विभागाकडील महत्त्वाचे दस्तऐवज – पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रति बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक यामध्ये जर नोंद असेल तर हा पुरावा देखील यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

  • नववा पुरावा –- जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील दस्तऐवज : माजी सैनिकांच्या नोंदीमध्ये कुणबी नोंद आढळल्यास हा पुरावा देखील हे प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी ग्राह्य धरले जाणार आहे.
  • दहावा पुरावा –- जिल्हा वक्फ अधिकारी : यांच्याकडील मुंतखब या कागदपत्रात जर कुणबी नोंद असेल तर हा देखील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

  • अकरावा पुरावा –- शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील रेकॉर्ड : यामध्ये रक्त संबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्विस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. परंतु हे रेकॉर्ड 1967 पूर्वीचे असणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे.

  • बारावा पुरावा – – जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील दस्तऐवज : जर रक्तसंबंधांमधील नातेवाईकाचे आधीच कुणबी जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

Where to apply for Kunbi caste certificate

कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठं अर्ज करणार

  • खरंतर जात प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस ही एकच असते.
  • कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस देखील इतर समाजाचे जात प्रमाणपत्र काढण्यासारखीच आहे.
  • यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो.
  • वर दिलेल्या बारा पुराव्यांमध्ये जर कुणबी अशी नोंद असेल तर संबंधित व्यक्ती या पुराव्यानिशी त्यांच्या तहसील कार्यालयात अर्ज सादर करू शकतात.
  • तहसील कार्यालयात अर्ज सादर झाल्यानंतर सदर अर्जाची पडताळणी प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाते.
  • यानंतर मग प्रांत अधिकारी यांच्या सहीने कास्ट सर्टिफिकेट संबंधित व्यक्तीला दिले जाते.

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ