Kusum Yojana Maharashtra 2023: ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ -संपूर्ण माहिती

0
17
Kusum Yojana Maharashtra 2023
Kusum Yojana Maharashtra 2023

Kusum Yojana Maharashtra 2023

Kusum Yojana Maharashtra 2023:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना,प्रधानमंत्री कुसुम योजना (PM KUSUM) ही महत्वाची कृषि योजना आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी बांधकाम, सिंचाई, आणि ऊर्जा संप्रेरणा बदलू शकतात. या योजनेमध्ये सौर ऊर्जेचा उत्पन्न वापर करून, शेतीसाठी तंत्रज्ञानाच्या उपयोगाने विद्यमान नियमित सिंचाई प्रक्रिया सुधारली जाऊ शकते. ह्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी सौरपंप्स खरेदी करून ती स्वच्छ ऊर्जेच्या स्रोतांना वापरू शकतात, ज्यामुळे त्यांच्या शेतीतल्या सिंचनाची किंमत कमी होईल आणि अधिक सुरक्षित वापरली जाईल.

पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत सौरपंपसाठी सब्सिडी प्रदान केली जाते, ज्यामुळे शेतकरी सुविधेचा अधिक लाभ घेऊ शकतो. ही योजना सौर ऊर्जेचा वापर करून अधिक ऊर्जा आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या मिशनच्या एक भागाची आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादनात वाढ देण्याचा प्रयत्न केला जाईल. या योजनेने शेतकर्यांना सोडलेल्या वीजदराच्या लोडशेडिंगमुळे होणाऱ्या नुकसानाच्या आणि ऊर्जा बचतीच्या माध्यमातून शेतकरींच्या आर्थिक आणि कृषि विकासात वाढ दिली पाहिजे.

महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यासंदर्भात घोषणा केली होती. महाराष्ट्र सरकार नवीन अपडेटनुसार केंद्राच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत पाच लाख शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे दुष्काळाचा सर्वाधिक फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे.

प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंपावर केंद्र सरकारकडून 30 टक्के, राज्य सरकारकडून 30  टक्के आणि इतर वित्तीय संस्थांकडून 30 टक्के अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च स्वतः भरावा लागणार आहे.

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती मराठी 

महाराष्ट्र राज्यात जवळपास संपूर्ण वीजनिर्मिती औष्णिक पद्धतीने निर्माण केली जात आहे, त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत असून हवामानावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, यासाठी वापरण्यात येणारी खनिज संपदा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे, या सर्व महत्वपूर्ण कारणांमुळे पर्यावरण पूरक तसेच दीर्घकालीन उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा उर्जा निर्मितीसाठी वापर करणे हि काळाची गरज झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा विकास घडून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक योजना सुरु केल्या आहेत. अपारंपरिक उर्जा स्त्रोतांमध्ये सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर स्वरूपाचा आणि महत्वपूर्ण आहे.

सौरऊर्जेद्वारे राज्यातील कृषी पंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एव उत्थान महाभियान (KUSUM) देशभरात राबविण्यात आले. केंद्र सरकारने 22 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या आणि वेळोवेळी दिलेल्या मोहिमेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या अभियानाच्या अंमलबजावणीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 

कुसुम सौर पंप योजना महाराष्ट्र 2023 अभियानांतर्गत, पुढील पाच वर्षात पाच लाख नॉन ट्रान्समिशन सौर कृषी पंप बसविण्यास आणि पहिल्या वर्षात एक लाख नॉन ट्रांसमिशन सौर कृषी पंप बसविण्यास मान्यता. ऊर्जा विकास एजन्सीमार्फत अर्जदारांच्या ऑनलाइन अर्जाद्वारे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ही योजना लागू केली जाईल.

यामध्ये 2.5 एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी 3 एचपी, 5 एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी 5 एचपी आणि अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी 7.5 एचपी डीसी पंप बसविण्यात येणार आहे.

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 Highlights 

योजना कुसुम योजना महाराष्ट्र
व्दारा सुरु महाराष्ट्र सरकार /केंद्र सरकार पुरस्कृत
योजना आरंभ 2020
लाभार्थी राज्यातील पात्र शेतकरी
अधिकृत वेबसाईट https://www.mahaurja.com/meda/
उद्देश्य पारंपारिक उर्जेवर अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
लाभ शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचनाची सुविधा
विभाग महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (MEDA) महाराष्ट्र शासन
श्रेणी राज्य सरकारी योजना/केंद्र सरकारी योजना
वर्ष 2023

कुसुम योजना महाराष्ट्र अंतर्गत सोलर पंपची किंमत आणि लाभार्थी हिस्सा  

सौर पंप क्षमता सौर पंप किंमत सामान्य श्रेणी (लाभार्थी हिस्सा) SC/ST श्रेणी (लाभार्थी हिस्सा)
3 HP Rs. 1,93,803 Rs. 19,380 Rs. 9,690
5 HP Rs. 2,69,746 Rs. 26,975 Rs. 13,488
7.5 HP Rs. 3,74,402 Rs. 37,440 Rs. 18,720

कुसुम योजना महाराष्ट्र राज्यस्तरीय सुकाणू समिती   

या अभियानाची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात येत आहे, या अभियानाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी व आवश्यकतेनुसार अभियानात सुधारणा आणि आवश्यक बदल करण्याचे अधिकार सदर समितीस राहतील.

मा. मंत्री (उर्जा) अध्यक्ष
प्रधान सचिव सदस्य स
अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण कंपनी सदस्य
महासंचालक, महाऊर्जा सदस्य सचिव (घटक ”ब” करिता)
संचालक, (वाणिज्य), महावितरण कंपनी सदस्य सचिव (घटक ”अ” करिता)
संचालक, (प्रकल्प), महावितरण कंपनी सदस्य सचिव (घटक ”क” करिता)

 

कुसुम सौर पंप योजनेची ही वैशिष्ट्ये आहेत

  • महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये 3814 विना पारेषण कृषी पंप आस्थापन केले जातील. ज्याच्यामुळे  शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना पाणी देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. 
  • याशिवाय शेतकरी स्वखर्चाने इतर उपकरण जोडू शकणार आहेत. 
  • कृषी पंपाच्या किमतीच्या 10 टक्के सर्वसाधारण वर्गातील शेतकर्‍यांना आणि 5 टक्के हिस्सा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना राहणार आहे.
  • शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीनुसार अर्ज केल्यानंतर 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सौरपंप उपलब्ध होतील.

अधिक महिती करिता येथे क्लिक करा

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ