Lek Ladki Yojana Maharashtra | शासनाचा नवा उपक्रम! आता घरात मुलगी असेल, तर या योजनेअंतर्गत मिळणार ९८ हजार रुपये! पहा संपूर्ण माहिती !!
Lek Ladki Yojana Maharashtra!
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक पात्रता
- लाभार्थी मुलगी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलीच्या कुटुंबातील रेशनकार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचा असावा.
- फक्त दुर्बल वंचित घटकातील लाभार्थी मुलींनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शासनाकडील 75 हजार रुपये मिळवायचे असल्यास, सर्व शैक्षणिक कागदपत्रं असणे अनिवार्य आहे.
योजनेअंतर्गत देण्यात येणारी आर्थिक सहायता
लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींना सशक्त व आत्मनिर्भर करण्यासाठी लहानपणापासून ते वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत शासनाकडून खालीलप्रमाणे आर्थिक मदत करण्यात येते.
1) मुलीच्या जन्मानंतर पात्र कुटुंबाला 5,000 रु. इतकी मदत आर्थिक सहाय्य म्हणून करण्यात येईल.
2) मुलगी मोठी झाल्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये (वर्ग ०१) शिक्षणासाठी जायला लागल्यानंतर शासनाकडून 5,000 रु. आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
3) यानंतर मुलगी इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असल्यास शासनाकडून 6,000 रु. देण्यात येतील.
4) जर मुलगी इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असेल, तर त्यासाठी शासनाकडून 8,000 रु. देण्यात येतील.
5) मुलीच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मुलीच्या शिक्षणासाठी 75,000 रु. देण्यात येतील.
लेक लाडकी योजनासाठी लागणारी कागदपत्र
- मुलीचा आधारकार्ड
- मुलीचा जन्माचा पुरावा
- रहिवाशी प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रं
- कौटुंबिक रेशनकार्ड (पिवळा किंवा केशरी)
- उत्पन्नाचा दाखला
लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा ?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची माहिती दिली; परंतु अद्याप या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिकृत पोर्टल अथवा वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा ऑफलाईन अर्जाची पद्धत सुरू झाल्यानंतर आमच्या वेबसाईटवरती याची माहिती देण्यात येईल.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.