महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार- Maharashtra Forest and Forest Types Notes MPSC

0
2259

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार- Maharashtra Forest and Forest Types Notes MPSC

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार – 

1. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने 

2. उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने 

3. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने 

4. उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने / मान्सून वने 

5 . उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने 

6. उष्ण कटिबंधीय काटेरी वने 

7. किनारपट्टीवरील खारफुटीची वने 

1. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने 

वार्षिक पर्जन्यमान 200 सेंमी पेक्षा जास्त असलेल्या भागात ही वने आढळतात . 

महाराष्ट्रात सह्याद्रीचा घाटमाथा , माथेरान , महाबळेश्वर , पाचगणी , कोयना , दक्षिण कोकणात राधानगरी , आंबोली या ठिकाणी हि वने आढळतात . 

वैशिष्ठ्य-

घनदाट वनांचे आच्छादन वृक्षांची उंची साधारण 45 ते 60 मी . 

हि बने नेहमी सदाहरित व अतिशय घनदाट असतात . 

हि वृक्षे दाटीवाटीने व सलग वाढलेली असतात . 

वृक्षांचा प्रकार – 

जांभूळ , फणस , नागचंपा , कळब , कावसी , पांढरासिडार , शिसव , ओक , जंगली आंबा व तेल्या ताड इ . 

वेल व झुडपी वेत करवंद , बामणी , निर्गुडी , रानकेळी , व बांबू . 

आर्थिक महत्व-

या वनस्पती आर्थिकदृष्ट्या फार महत्वाची नसतात . या वनातील लाकूड कठीण असते . 

2. उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने 

वार्षिक पर्जन्यमान 150 ते 200 सेंमी असते त्या प्रदेशात हे वने आढळतात . 

कोकण किनारपट्टीच्या भागात व घाटमाथ्यावर हि वने आढळतात . 

महाराष्ट्रातील 8 % वने या प्रकारात मोडतात .

वैशिष्ठ्ये-

सदाहरित वनापेक्षा कमी उंचीची म्हणजे 20 ते 30 मी एवढी उंची असते . 

हि वने सलग पट्ट्यात न वाढता तुटक स्वरूपात वाढतात . 

सर्व वृक्षांची पाने हि एकाच वेळी गळून पडत नाहीत . 

विशिष्ट कालावधीने ती गळतात म्हणून ती वने हिरवीगार असतात . 

वृक्षांचा प्रकार-

नारळ , सुपारी , आंबा , कदंब , शिसव , बेहडा , केन , किंजल , फणस , बिबळा , शेवरी , ऐन , व किंजल इ . 

आर्थिक महत्व-

हि वने आर्थिकदृष्ट्या महत्वाची असतात . 

वृक्षांचा वापर इमारत व फर्निचरसाठी केला जातो . 

महाबळेश्वर , माथेरान , भिमाशंकर परिसरात मध गोळा करण्याचा व्यवसाय चालतो . 

3. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने 

हि वने सह्याद्री पर्वतरांगांच्या 1200 मी . पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात आढळतात . 

उन्हाळा कडक व हिवाळा थंड अशा प्रदेशात हि वने आढळतात . 

पर्जन्यमान 350 सेंमी ते 400 सेंमी पेक्षा अधिक . 

वैशिष्ट्ये- 

वृक्षांचे लाकूड मऊ असते . 

अनेक प्रकारची वृक्ष , वेली , झुडपी या भागात असतात . 

त्यामुळे ती हिरवी दिसतात . 

वृक्षांची विविधता या ठिकाणी जास्त असते . 

वृक्ष-

अंजन , जांभूळ , बेहडा , हिरडा , आंबा , बकुळ , कारवी , शेंदरी , काटेकवट , तेजपान , लव्हेंडर इ . 

प्रदेश- 

अस्तभा डोंगर , सातपुडा ( नंदुरबार ) , गाविलगड टेकड्या ( अमरावती ) , भिमाशंकर , महाबळेश्वर , पाचगणी .

आर्थिक महत्व- 

वन औषधी तयार करणे व तिचा विक्रीचा व्यवसाय करणे . 

मध गोळा करणे व मधुमक्षिका पालन केंद्र चालवणे . 

विविध प्रकारची फुले गोळा करून वनौषधी , पेय तयार करणे . 

4 . उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी / मान्सून वने 

हि वने जास्त उंच व मध्यम पावसाच्या प्रदेशात आढळतात . 

पर्जन्यमान 100 सेंमी ते 150 सेंमी . 

महाराष्ट्रातील 30 % वने या प्रकारात मोडतात . 

वैशिष्टये-

हि वने पावसाळ्यात वाढतात , तर उन्हाळ्याच्या सुरवातीला यांची पाने गळतात . 

झाडाची उंची -30 ते 40 मी 

पावसाळा सुरू झाल्यावर वृक्षांना नवीन पालवी फुटतात . 

या प्रकारची वने जास्त घनदाट नसतात . 

वृक्ष – 

पिंपळ , तेंदू , महू , साग , साल , चंदन , पळस , कांचन , अर्जुन , आवळा , खैर , शिसव . 

प्रदेश-

पूर्व महाराष्ट्रात भंडारा , चंद्रपूर , गडचिरोली , तसेच सह्याद्रीचा पर्जन्यछायेचा प्रदेश , सातमाळा , हरिशचंद्र , बालाघाट , महादेव डोंगररांगा , धुळे , नाशिक , पुणे , ठाणे , कोल्हापूर या जिल्ह्यात हि वने आढळतात . 

आर्थिक महत्व-

सागाच्या लाकडाचा वापर इमारत व फर्निचरसाठी होतो . 

डिंक , लाख , मध गोळा करणे , तेंदूची पाने गोळा करणे , मोहाची फुले गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतात . 

वनौषधी , वनफुले इ . विक्री व्यवसाय या वन प्रकारात चालतो .

5 . उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने 

तीव्र उन्हाळा असणाऱ्या व जास्त तापमानाच्या व कमी पर्जन्याच्या प्रदेशात हि वने आढळतात . 

पर्जन्यमान 80 ते 120 सेंमी . 

महाराष्ट्रातील 60 % वने या प्रकारात मोडतात . 

वैशिष्ट्ये- 

हि वने अतिशय विरळ असतात , वृक्षांना काटे असतात . 

मध्यम उंचीची व झुडपांची स्वरूपात आढळतात . वनातील वृक्षांची पाने हि उन्हाळ्याच्या सुरवातीला गळतात . 

वृक्ष- 

बोर बेल पळस , अंजन , आवळा , साग , खैर , तेंदू हे वृक्ष आढळतात . 

प्रदेश-

सह्याद्रीचा पूर्व उतार , सातपुडा , अजिंठा डोंगररांगा , मराठवाडा , विदर्भ या प्रदेशात तसेच जळगाव , बुलढाणा , अमरावती , नागपूर , भंडारा , गोंदिया या जिल्ह्यात आढळतात . 

आर्थिक महत्व-

सागवान लाकडाचा समावेश असल्यामुळे आर्थिकदृष्टया महत्वाची . 

मध , डिंक , लाख , व कात तयार करण्याचा व्यवसाय या वन प्रकारात चालतो . 

तेंदूची पाने गोळा करून विडी उद्योग चालतो . 

6 . उष्ण कटिबंधीय काटेरी वने 

महाराष्ट्र पठारावरील कमी पावसाच्या व कायम अवर्षणग्रस्त प्रदेशात हि वने आढळतात . 

पर्जन्यमान 80 सेंमी पेक्षा कमी या वनस्पतींना पोषक हवामान नसल्यामुळे त्याची पुरेशी वाढ होत नाही . 

वनस्पती खुरट्या व काटेरी असतात . 

महाराष्ट्रातील 1 % वने या प्रकारात मोडतात .

वैशिष्ट्ये-

या वनातील वृक्षांच्या फांद्यांना काटे असतात . 

पानाच्या टोकावर शेवटी काटे असतात . 

पाण्याच्या शोधार्थ वृक्षांची मुळे जमिनीत खूप खोलवर गेलेली असतात .

वृक्षांच्या पानाचा आकार लहान असतो .

वृक्षांचे लाकूड टणक असते व वृक्षांची साल जाड असते . 

वृक्ष-

बोर , कोरफड , धामण , सालाई , बाभूळ , निंब , हिरडा , निवडुंग , हिवर , घायपात , इ . 

प्रदेश- 

जळगाव , धुळे , अहमदनगर , सातारा , सांगली , पुणे , कोल्हापूर , सोलापूर या जिल्ह्यात तसेच मराठवाडा , विदर्भ भागातही हि वने आढळतात . 

7. किनारपट्टीवरील खारफुटीची वने 

पश्चिम किनारपत्तीलगत नद्यांच्या मुखाशी भरती- अहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान खड्यांची निर्मिती झाली आहे . 

या प्रदेशात या वनस्पती आढळतात . 

या वनांचे महाराष्ट्रात नगण्य म्हणजे 0.1 % आहे . 

या वनाना कांदळवने म्हणतात . 

वैशिष्ट्ये-

हि वने दाट व एकमेकांत वाढलेली असतात , दलदलयुक्त प्रदेशातून वर आलेली असतात . 

वृक्षांची उंची फार नसते . 

या वनातील वृक्षांना सुंद्री असे म्हणतात . 

ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी या झाडांची मुळे जमिनीमधून वर अशी उलटी वाढतात .

वृक्ष-

चिपी , आंबेटी , काजळा , मरांडी , कांदळ व तिवरी . 

प्रदेश-

आचरा , रत्नागिरी , देवगड , वैतरणा , मुंब्रा , श्रीवर्धन , कुंडलिका , वसा या प्रदेशात आढळतात . 

आर्थिक महत्व-

लाकूड हलके असल्यामुळे व पाण्याच्या संपर्कात वाढल्यामुळे होड्या व बोटी तयार करण्यासाठी लाकडाचा वापर होतो . 

या वनांमुळे सागरकिनारपट्टीचे विनाशकारी लाटांपासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here