Maharashtra Govt Schemes For Women:महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना!!

0
56
Maharashtra Govt Schemes For Women
Maharashtra Govt Schemes For Women

Maharashtra Govt Schemes For Women

Maharashtra Govt Schemes For Women:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भरती,केंद्रशासन व राज्यशासनाकडून देशातील गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. यापैकी काही योजना फक्त महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या असून त्यामध्ये महिला कर्ज, बचतगट, गृहउद्योग, स्वयंरोजगार इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना बद्दलची माहिती सविस्तर पाहणार आहोत. महिलांच्या सबलीकरणासाठी, व्यवसायात पुढाकार घेण्यासाठी व आर्थिक दर्जा वाढवण्यासाठी महिलांना या विविध योजनांचा नक्कीच फायदा होणार आहे.

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना

राज्य किंवा केंद्रशासनाकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांना त्यांच्या पायावरती उभा राहता यावं, जेणेकरून कुटुंबाची जबाबदारी व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येतील. या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडित जसे भरतकाम, शिवणकाम, विणकाम, पिठाची गिरणी अशा विविध योजनांचा समावेश शासनाकडून करण्यात आला आहे.

महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनवणे, सक्षमीकरणाला चालना देणे हा शासनाचा विविध योजना राबविण्या मागचा मुख्य हेतू आहे. पारंपारिक विचार केला, तर मुलींना समाजात कमी मान दिला जातो. लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकलं जातं, घराबाहेर पाठवले जात नाही. त्यांना सुद्धा पुरुषांइतकाच सन्मान मिळावा; म्हणून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात.

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणत्या ?

महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येतात. ज्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या योजना, महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देणाऱ्या योजना, महिलांना प्रवासात सूट देणाऱ्या योजना, महिलांना प्रसूतीपश्चात लाभ देणाऱ्या योजना, मुलींना लाभ देणाऱ्या योजना, गर्भवती महिलांसाठी योजना इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे. आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठीच्या विशेष 11 विविध योजनांची माहिती पाहणार आहोत.

1) लेक लाडकी योजना

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व त्यांना सशक्त, प्रबळ व आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 सादर करताना लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील म्हणजेच पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत 1 लाख 1 हजार रु. देण्यात येतात.

योजना संपूर्ण माहिती : लेक लाडकी योजना

2) महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना !!

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील महिलांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक योजना ज्या योजनेचे नाव Mahila Samruddhi Karj Yojana आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी कमी व्याज दरात तसेच कमी अटी शर्तींचा वापर करून कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून महिला स्वतःचा उद्योग सुरु करतील वर स्वतःचा आर्थिक विकास करू शकतील.

 योजना संपूर्ण माहिती : महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना !!

3) महिलांसाठी स्वर्णिमा योजना

स्वर्णिमा योजना महिला स्वयंरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्त्वकांक्षी योजना असून सदरची योजना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC) यांच्याद्वारे खूपच कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.

 योजना संपूर्ण माहिती : महिलांसाठी स्वर्णिमा योजना

4) लखपती दीदी योजना

लखपती दीदी योजना आहे एक अत्यंत महत्त्वाची योजना ज्याने महिलांसाठी आपल्याला आपल्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मदतीच्या संरक्षणात येईल. या योजनेच्या माध्यमातून, 2 कोटींच्या अधिक महिलांना अपने आपल्या आर्थिक भविष्याच्या स्वप्नांच्या आकलनात येणार आहे.भारतात बेरोजगारांना आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून विविध योजनांची सुरुवात झाली आहे. यात्रेकार्यालयांच्या माध्यमातून, बेरोजगारांना उद्योजकीय क्षेत्रातील संधी, प्रशिक्षण, आणि आर्थिक सहाय्य तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यात मदतीच्या हाताची आपली ताकद आहे.

योजना संपूर्ण माहिती : लखपती दीदी योजना

5) किशोरी शक्ती योजना 2023

आपल्या राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींच्या हितासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना आखण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली ज्यांनी शाळा किंवा महाविद्यालय सोडले आहे त्यांना लाभ मिळेल. या योजनेद्वारे किशोरवयीन मुलींचा शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक विकास केला जाईल. ज्यासाठी राज्य सरकार प्रत्येक किशोरवयीन मुलावर दरवर्षी 1 लाख खर्च करणार आहे. या योजनेचे संपूर्ण कामकाज राज्य शासनाच्या देखरेखीखालील महिला व बालविकास विभागामार्फत केले जाणार आहे.

योजना संपूर्ण माहिती :किशोरी शक्ती योजना 2023 

6) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

एखाद्या महिलेचा पती अकस्मात किंवा अन्यकारणामुळे मृत्यू पावल्यास, अशा महिलांना समाजात वावरताना खूप अडचणीना सामोर जाव लागत. हीच बाब लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व स्वबळावर आपला आयुष्य जगण्यासाठी राज्यशासनाच्या महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दरमहा 1,000 रु. पेन्शन राज्य शासनाकडून देण्यात येतं.

 योजना संपूर्ण माहिती : विधवा पेन्शन योजना

7) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) मुख्यत्व केंद्रशासनाची योजना असून ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत चालविण्यात येते. लाभार्थी गरोदर महिलांना योजनेची रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. उर्वरित 1,000 रु. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलांना प्रसूतीनंतर दिले जातात. म्हणजेच एकंदरीत महिलांना सरासरी 6,000 रुपये सदर योजनेच्या माध्यमातून मिळतात.

योजना संपूर्ण माहिती : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

8) माझी कन्या भाग्यश्री योजना

मुलींचा जन्मदर प्रमाण सुधारण्यासाठी, स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 1 एप्रिल 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत, जर पालकांनी नसबंदी केली किंवा दुसरी मुलगी जन्मल्यापासून 6 महिन्याच्या आत पालकांनी नस बंदी केल्यास त्यांना 50,000 रुपयांची रक्कम शासनाकडून मुलीच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येते.

 योजना संपूर्ण माहिती : माझी कन्या भाग्यश्री योजना

9) SBI स्त्री शक्ती योजना 2023

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आता महिलांना विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून सुरक्षित आर्थिक मदत मिळू शकते. आज या लेखात आम्ही योजनेबद्दलचे पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, उद्दिष्टे, फायदे, महत्त्वाची ठळक मुद्दे, अर्ज प्रक्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत.

 योजना संपूर्ण माहिती :SBI स्त्री शक्ती योजना 2023

10) जननी सुरक्षा योजना

देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील महिलांना शासनाकडून रु. 1400 इतकी आर्थिक मदत करण्यात येते. याशिवाय गर्भवती महिलांना मदत करणाऱ्या आशा सहयोगीना प्रसूती प्रोत्साहनासाठी रु. 300 आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी रु. 300 इतकी रक्कम देण्यात येते.

योजना संपूर्ण माहिती : जननी सुरक्षा योजना

FAQ

1) महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणत्या आहेत ?

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना शासनांकडून राबविण्यात येतात, त्याबद्दची संपूर्ण माहिती वरील लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

2) दोन मुलींसाठी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या योजना आहेत ?

सुकन्या समृद्धी योजना व माझी कन्या भाग्यश्री योजना या दोन्ही योजना विशेषता दोन मुलींसाठी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत.

3) फक्त महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत ?

वरील लेखातील नमूद सर्व योजना महाराष्ट्र शासनाकडून फक्त महिलांसाठी राबविण्यात येतात.

4) शासनाच्या महिलांसाठी कर्ज योजना कोणकोणत्या आहेत ?

शासनाकडून महिलांसाठी महिला उद्योजनी योजना, स्वर्णिमा योजना, महिला समृद्धी कर्ज योजना, महिला उद्योजक धोरण योजना इत्यादी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ