Maharashtra Kishori Shakti Yojana 2023| किशोरी शक्ती योजना 2023

0
117
Maharashtra Kishori Shakti Yojana 2023
Maharashtra Kishori Shakti Yojana 2023

Maharashtra Kishori Shakti Yojana 2023| किशोरी शक्ती योजना 2023

 

किशोरी शक्ती योजना 2023 मराठी:आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर महिलांना  त्यांचे हक्क मिळण्यासाठी भारत सरकारने विविध योजना तसेच कायदे तयार केले आहेत.तसेच भारत सरकारने विविध योजना सुरू करून महिलांना पुरुषांसोबत  आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक महिला  घरातील कामासोबतच विविध क्षेत्रांमध्ये  करिअरमध्ये भरारी घेत आहेत. महिलांना व मुलींना सक्षम बनवण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी  भारत सरकारने विविध योजना आयोजित केल्या आहेत. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुलींना  अर्धवट शिक्षण सोडावे लागते व त्यांना पुढील उच्च शिक्षण घेता येत नाही किंवा  लहानपणीच  डोक्यावरील आई बाबांचे छत्र गमावल्यामुळे गमावल्यामुळे त्यांच्यावर येणाऱ्या घराच्या जबाबदाऱ्यांमुळे  मुलींना पुढे  जाता येत नाही.

 मुलींना  अडचणींना सामोरे जावे लागत आहे . मुलींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्रात किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये राबविण्यात येत आहे.आपण या योजनेतून जाणून घेणार आहोत की मुलींना ह्या योजनेचा कसा फायदा होईल व कोणत्या प्रकारे लाभ घेता येईल?

 चला तर आज मी तुम्हाला या योजनेविषयी  माहिती देणार आहे.kishori shakti yojana

किशोरी शक्ती योजना 2023 संपूर्ण माहिती

राज्य सरकारने महाराष्ट्रात किशोरी शक्ती योजना kishori shakti yojana ही मुलींना  सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी  तयार केली आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये राबविण्यात येत आहे. ही योजना किशोरवयीन  म्हणजेच 11 ते 18 वयोगटातील मुलींसाठी तयार केली आहे.किशोरी शक्ती योजनाही एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेचा एक घटक आहे.Maharashtra Kishori Shakti Yojana 2023

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र सरकारने 15 मे 2004 रोजी  सुरू केली. ही योजना महाराष्ट्रातील 11 ते 18 या किशोरवयीन मुलींसाठी आहे.या योजनेचा उद्देश आपल्या राज्यातील किशोरवयीन म्हणजे11-18 वयोगटातील मुलींना स्वावलंबी व सक्षम बनवणे हा आहे

 किशोरी शक्ती योजना  उद्देश

 • किशोरी शक्ती योजना या योजनेचा मुख्य उद्देश आहे की महिलांना व मुलींना        स्वावलंबी व सक्षम बनवणे
 • तसेच त्यांना सक्षम बनवण्यासाठी विविध प्रकारचे साधने उपलब्ध करून देणे
 • तसेच मुलींना  त्यांची कार्यक्षमता ओळखण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
 • किशोरी शक्ती योजनाही एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेचा एक घटक आहे.
 • या योजनेमध्ये 11 ते 18 वयोगटातील मुलींना त्यांची  आर्थिक व आरोग्य स्थिती सुधारावी म्हणून त्यांना  विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन  स्वतःच्या पायावर उभे  केले तर  बालविवाह या  प्रकाराला आळा घालता येईल.kishori shakti yojana
 • मुलींची निर्णय क्षमता वाढावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचे प्रशिक्षण मुलींना आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये देण्यात येणार आहे.
 • या योजनेचा उद्देश आपल्या राज्यातील किशोरवयीन म्हणजे 11 -18 वयोगटातील मुलींना स्वावलंबी व सक्षम बनवणे हा आहे.
 • महाराष्ट्र सरकारची किशोरी शक्ती योजना ही गरीब  कुटुंबातील मुलींना मानसिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या निरोगी बनवते.
 • ही योजना मुलींना आपल्या कुटुंबासमवेत आपल्या देशाला  विकसनशील बनवतात.
 • या योजनेमध्ये मुलींना  कौटुंबिक कल्याण अतिपरिचित स्वच्छता आरोग्य गृह व्यवस्थापन मुलांची काळजी आणि वैयक्तिक स्वच्छता इत्यादी शिकवले जाते.
 • मुली  स्वतःच्या पायावर उभ्या असल्यामुळे बालविवाह ही पद्धत रोखली जाते.Maharashtra Kishori Shakti Yojana 2023

 किशोरी शक्ती योजना या योजनेअंतर्गत मुलींना कोणकोणत्या गोष्टी पुरवल्या जातात.

 • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात.
 •  या योजनेमध्ये किशोरवयीन मुलींचे वजन दर महिन्याला  चेक केले जाते.
 •  या योजनेतील मुलींना सहा महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात.
 •  या योजनेतील किशोरवयीन मुलींचे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण चेक केले जाते.
 •  15 ते 18 वयोगटातील तीन मुलींना बीट्सवर प्रशिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यानंतर त्या तीन मुली अंगणवाडीमध्ये इतर किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण देतात.
 •  या योजनेतील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता सामुदायिक पोषण पर्यावरण स्वच्छता आरोग्य पोषण, मासिक पाळी  गैरसमज ,बालविवाहाचे परिणाम गर्भनिरोधक ,गर्भधारणा शरीरशास्त्र, लैंगिक अत्याचार याविषयी माहिती दिली जाते.Maharashtra Kishori Shakti Yojana 2023
 • या योजनेमध्ये मुलींना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना विविध  प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये  टाकाऊतून टिकाऊ तसेच सेंद्रिय शेती गांडूळ खत मेहेंदी काढणे , केक बनवणे गृहपयोगी उपकरणे दुरुस्त करणे. यासारख्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.
 • सारखे सारखे होणारे बाळंतपणाचे आरोग्यावर होणारे  परिणाम समजून सांगितले जातात.
 • तसेच त्यांना  पालेभाज्या व कडधान्य खाण्याचे महत्त्व समजून सांगितले जातात.
 • अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलींना  शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन पुन्हा शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करतात.
 •  या योजनेत  मुलींना पोषक आहार दिला जातो.
 • मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी राज्य सरकार एक लाखापर्यंतचा खर्च  देत आहे.
 •  या योजनेअंतर्गत मुलींसाठी किशोरी कार्ड तयार करून  त्यांना विविध प्रकारच्या योजनांचा व सुविधांचा लाभ देण्यात येत आहे.
 •  18 वर्षानंतर मुलींना   प्रशिक्षणामुळे  स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जातो.kishori shakti yojana

किशोरी शक्ती योजना : इथे क्लिक करा