Maharashtra Shikshak Bharti 2023: ५० हजार शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक जाहीर!!
Maharashtra Shikshak Recruitment 2023
Maharashtra Shikshak Bharti Update 2023
Maharashtra Shikshak Bharti 2023:Maharashtra Shikshak Recruitment 2023:Maharashtra Shikshak 2023 apply online :Maharashtra Shikshak Recruitment 2023-2024:Maharashtra Shikshak 2023: upcoming Maharashtra Shikshak recruitment 2023-24:Maharashtra Shikshak Job 2023
Maharashtra Shikshak Bharti 2023:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भरती,राज्य शासन गेल्या काही दिवसांपासून माेठा गाजावाजा करून शिक्षक भरती सुरू हाेणार असल्याच्या घाेषणा करीत आहे. त्यातच शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रकच जाहीर केले आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांची नाेंदणी केव्हा सुरू हाेईल, याविषयी कुठलीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. १ ऑगस्टपासून नाेंदणी सुरू झाली तरच हे वेळापत्रक लागू हाेण्याची शक्यता आहे.
राज्यभरात शिक्षकांच्या ६० हजारापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, ८० टक्के रिक्त जागा भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिल्यानंतरही ३० हजार शिक्षकांचीच भरती करण्यासाठी शिक्षणमंत्री ठाम आहे. त्यातच शिक्षण विभागाने कुठलेही नियाेजन न करता आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचे चित्र आहे, त्यातच शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाचे असलेले विद्यार्थ्यांची नाेंदणी केव्हा सुरू हाेईल याचा उल्लेखच नाही, १५ ऑगस्टपासून पाेर्टलवर जाहिराती येतील, त्यानंतर विद्यार्थी थेट प्राधान्यक्रम देणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र नाेंदणीच नसताना विद्यार्थ्यांना शाळा कशा येतील असा प्रश्न आता उमेदवारांकडून उपस्थित केल्या जात आहेत, त्यातच पाेर्टलवर ३१ जुलैपर्यंत नाेंदणी विषयी कुठल्याही सूचना आल्या नसल्याने संभ्रम वाढला आहे.
शासनाने पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून सुरू केलेली २०१७ शिक्षक भरती अद्यापही पूर्ण झालेली नाही, त्यातच घाेषणा १२ हजार रिक्त पदे भरण्याची करण्यात आली हाेती, मात्र प्रत्यक्षात १९६ व्यवस्थापनाच्या जागांची अजूनही प्रक्रिया सुरू आहे, यावर्षी ३० हजार जागा भरण्याची घाेषणा करण्यात आली, प्रत्यक्षात किती जागा भरणार हे पवित्र पाेर्टलवर आलेल्या जाहिरातीनंतर स्पष्ट हाेणार आहे. जागा कमी आल्यास कटऑफही वाढणार आहे.Maharashtra Shikshak Bharti 2023
नाेंदणी सुरू करण्याची मागणी
शिक्षक भरतीसाठी लाखाे विद्यार्थी नाेंदणी करणार आहेत, त्यासाठी जवळपास १० ते १५ दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे जाहिराती येण्यापूर्वी पवित्र पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणी झालेली असणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पवित्र पाेर्टलवर कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत, त्यामुळे शिक्षक भरतीची घाेषणा केवळ घाेषणाच ठरू नये, अशी भीती आता उमेदवारांमधून व्यक्त हाेत आहे.
नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही, असेही केसरकर यांनी म्हटले आहे. सध्या राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी संस्थांमधील मिळून एकूण ६० हजार जागा रिक्त आहेत. यापैकी १८ हजार फक्त जिल्हा परिषदांमधील आहेत.Maharashtra Shikshak Bharti 2023
केसरकर म्हणाले, राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच राज्यातील शिक्षकांच्या सगळ्या बदल्या रद्द केल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत देखील केसरकर यांनी भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत केसरकर यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे असं केसरकरांनी यावेळी स्पष्ट केलं.Maharashtra Shikshak Bharti 2023
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.