Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Yojana | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी

0
82

  • शासन निर्णय दिनांक २७ मे, २०११ नुसार मनरेगाची विविध कामे करण्यासंदर्भात इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” मधील अनुक्रमांक ९ व १० नुसार कामाच्या ठिकाणी मजुरांना सोयी सुविधा पुरविणे व मजुरांची दैनंदिन हजेरी घेणे व इतर नोंदी घेणे इत्यादी कामे करण्यासंदर्भात जबाबदारी संबंधित यंत्रणातील क्षेत्रिय तांत्रिक संवर्ग व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर असून या कामात संबंधित ग्रामसेवक यांनी मदत करणे व मजुरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक यांनी नोंदविल्यावर त्याची खात्री/ पडताळणी संबंधित यंत्रणेचे तांत्रिक संवर्ग/ ग्रामसेवक करतील अशी तरतुद आहे.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी – आता ग्रामरोजगार सेवक लावणार मजुरांची हजेरी:

ग्रामसेवक संघटनेने त्यांच्या निवेदनाद्वारे ग्रामसेवकांना विविध कामे करावी लागतात. त्यात निवडणुक आयोगाची कामे / कृषि विभागाची कामे / सामाजिक न्याय विभागाची कामे या सर्व कामांमुळे ग्रामसेवकावर अतिरिक्त ताण व मानसिक तणावामुळे मनरेगा सारख्या अत्यंत व्यापक योजनेस ग्रामसेवक न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्चित करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून वेळोवेळी शासनास येत होती.

दि. ३०/११/२०२२ रोजी याबाबत मा. मंत्री (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ग्रामसेवक संघटनेची मागणी विचारात घेवून शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

ग्रामसेवक संघटनेची मागणी व एकंदरीत रोजगार हमी योजनेची व्याप्ती विचारात घेऊन शासनाने शासन निर्णय क्रमांक मग्रारोहयो-२०११/प्र.क्र.५४/रोहयो-१०-अ, दिनांक २७ मे, २०११ मध्ये सुधारणा करुन सदर शासन निर्णयातील परिशिष्ट अ मधील अ. क्र. ९ येथील रकान्यातील (ग्रामसेवक) हा शब्द वगळण्यात येत आहे.

अनुक्रमांक १० मधील हजेरीपटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक नोंदवू शकेल व याबाबत खात्री/ पडताळणी संबंधित यंत्रणेचे तांत्रिक संवर्ग (ग्रामसेवक) करून प्रमाणित करतील या ऐवजी “हजेरी पटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक नोंदवतील असे वाचावे.

शासन निर्णय: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी (Role and Responsibilities of Line Departments in MGNREGA). बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना:  इथे क्लिक करा.

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ