महात्मा ज्योतीबा फुले ( १८२७-१८९० )
जन्म : ११ एप्रिल १८२७ , पुणे
मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०
नाव : ज्योतीबा गोविंदराव फुले
मुळ गाव : कटगुण , ता . सटाव , जि . सातारा
आई : चिमणाबाई
वडिल : गोविंदराव
• मुळ नाव गोव्हे होते , परंतु वडिलांच्या फूलांच्या व्यवसायावरून फुले पडले .
• एक वर्षाचे असताना आईचे निधन . १८३४ वडिल गोविंदरावांनी ज्योतीबांना मराठी शाळेत घातले .
• १८३८ ब्राह्मणांच्या सल्ल्यावरून गोविंदरावांनी बागकाम शिकवण्यासाठी ज्योतीबांना शाळेतून काढले . ( ४ वर्षात मराठी शिक्षण पूर्ण केले )
• ज्योतीबांचे शिक्षण परत सुरु करण्यास आग्रह करणारे दोन व्यक्ती – १ ) गफ्फार बेग मुन्शी २ ) खिस्ती धर्मोपदेशक मि . लिजिट साहेब .
• १८४० वयाच्या १३ व्या वर्षी ७ वर्षाच्या सावित्रीबाईशी विवाह . १८४१-४७ स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण .
• १८४८ लहुजीबूवा साळवे ( मांग ) यांकडे दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण ,
• सगूणाबाई ( गोविंदरावांची मानलेली बहीण ) आई वारल्यानंतर त्यांचा सांभाळ केला .
• ज्योतीबांच्या विचारावर प्रभाव पाडणारे ग्रंथ : १ ) राईट ऑफ द मॅन – थॉमस पेन २ ) वस्रसूची – संस्कृत ३ ) विप्रमती – कबीर
सामाजिक कार्य :
• ३ जुलै १८४८ मूलींची पहिली शाळा , बुधवारपेठ – पुणे ( तात्यासाहेब भीडेंचा वाडा )
• मूलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी मिस फरार यांच्याकडून प्रेरणा .
• शाळेतील पहिल्या ६ विद्यार्थिनी १ ) सूमती मोकाशी २ ) दूर्गा देशमूख ३ ) माधवी थत्ते ४ ) सोनू पवार ५ ) जनी करडीले .
• १८४९ सावित्रीबाईंना शिकवल्याबद्दल घराबाहेर काढले . ३ जुलै १८५१ परत शाळा सुरु केली , बुधवारपेठ – पुणे ( अण्णासाहेब चिपळूणकर वाडा )
• १८५१ अस्पृश्यांसाठी पहिली शाळा – नानासाहेब पेठेत
• १७ सप्टेंबर १८५१ रास्तापेठेत मूलींची दूसरी शाळा
• १५ मार्च १८५२ वेताळ पेठेत मूलींची तिसरी शाळा ,
• १९ मे १८५२ अस्पृश्यांसाठी शाळा , वेताळपेठ – पुणे ( सदाशिव बल्लाळ गोवंडे यांचा वाडा )
• १८४८ मराठी जातींच्या मूलांसाठी स्वतंत्र शाळा – बुधवारपेठ ( जगन्नाथ सदाशिव हाटे व सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने )
• १८४ ९ अल्हादाचे घर , नायगाव , शिरवळ , तळेगाव , शिरुर येथे शाळा .
• १६ नोव्हेंबर १८५२ मुंबई प्रांत गव्हर्नर मेजर कॅन्डीतर्फे पुरस्कार विश्रामबाग वाडा . ( स्त्री शिक्षणाच्या कार्याबद्दल )
• १८५२ दलितांसाठी पहिले वाचनालय सुरू केले .
• १० सप्टेंबर १८५३ महार , मांग लोकास विद्या शिकवण्याकरिता मंडळी संस्था काढली .
• १८५४ स्कॉटीश मिशनऱ्यांच्या शाळेत अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणुन नोकरी .
• १८५५ तुकाराम तात्या पडवळ यांच्या जातीभेद विवेकसाराच्या द्वितीय आवृत्तीचे उद्घाटन केले .
• १८५५ प्रौढ स्त्री – पुरुषांसाठी रात्रीची शाळा सुरू केली .
• १८५५ तृतीय रत्न – पहिले नाटक लिहीले .
• १८५६ सनातनी ब्राह्मणांनी धोंडीराम महादेव कुंभार व सज्जन रोडे यांना फूलेंना मारण्याची १००० / – सुपारी दिली .
• १८५६ फूलेंना संपविण्याची सुपारी घेतलेले रोडे हे अंगरक्षक बनले तर धोंडीबा कुंभार सत्यशोधक समाजाचे आधरस्तंभ बनले .
• १८५७ च्या उठावास – १ ) भट पंडयांचे बंड २ ) फोर्तृशी चपाती बंड अशा शब्दात गौरव केला .
• १८६३ बालहत्त्या प्रतिबंधक गृह स्थापना – पंढरपूर
• १८६४ पहिला पूनर्विवाह -८ मार्च १८६४ गोखलेंच्या बागेत शेणवी जातीतील १८ वर्षाच्या विधवेचा पूनर्विवाह झाला .
• १८६५ केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी नाव्यांचा संप – तळेगाव , ढमढेरे
• १८६७ रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जीर्णोद्धार केले व समाधीची व्यवस्था सरकारने स्वत : कडे घ्यावी असा अर्ज .
• १८६८ अस्पृश्यांसाठी स्वत : ची विहीर दिली . गोंविदराव यांचे निधन झाले . ( १८६८ )
• १८६९ : १ ) ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिला . प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी लिहिली . २ ) शिवाजी महाराजांचा पोवाडा – यात स्वत : चा उल्लेख कूळवाडी भूषण असा केला . ३ ) अखंडवादी काव्यरचना . १८७३ गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला ( प्रश्नोत्तराच्या स्वरूपात )
• २४ सप्टेंबर १८७३ – सत्यशोधक समाजाची स्थापना – पुणे ब्रिद वाक्य – सर्वसाक्ष जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी ।
• या समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह – २५ डिसेंबर १८७३ ( सिताराम आल्हाट व राधाबाई निंबकर )
• १८७३ : १ ) मजुरांना बोनस मिळण्याची प्रथा सुरू २ ) अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध ३ ) काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेची १८६५ मध्ये प्रसूती झाली , तिच्या मुलाला १८७३ मध्ये दत्तक घेतले . ५ जून १८७५ न्या . रानडे यांनी ज्योतीबा फुलेंच्या सहकार्याने पुण्यात स्वामी दयानंद यांची हत्तीवरून मिरवणूक काढली .
• १८७७ सक्तीच्या शिक्षणाचा ठराव मांडला . व्हिक्टोरिया अनाथ आश्रम सुरू केले . दिनबंधू वृत्त सुरू केले . दुष्काळ पिडीतांना मदत करण्यास पुढाकार , १८ जुलै १८८० : मद्यपानास विरोध पुण्यातील मद्यपानगृहात वाढ करण्याच्या सरकारी धोरणास विरोध करणारे पत्र पुणे नगर पालिकेच्या कार्यकारी मंडळ अध्यक्षाला लिहिले . – पालिकेला दारू गुत्त्यांवर कर बसविण्यास सांगितले .
• १८८० नारायण मे . लोखंडे यांनी बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केली .
• १६ नोव्हेंबर १८८२ स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने गौरव केला . १८७६-१८८२ पुणे नगरपालिकेचे सदस्य होते .
• ३ फेब्रुवारी १८८२ विल्यम हंटर अध्यक्षतेत आयोग नियुक्त केला .
• १९ ऑक्टोबर १८८२ हंटर आयोगाला शिक्षणाच्या बाबतीत सविस्तर निवेदन .
• जुलै १८८८ अर्धांगवायूचा झटका आला . ( डॉ.विश्राम रामजी घोले यांनी उपचार केला ) . १८८३ : १ ) अस्पृश्यांची कैफीयत ग्रंथ लिहिला २ ) शेतकऱ्यांचा असूड
• १८८५ सुधारणेचे झाड हे चित्र तयार करून हजारो प्रती शेतकऱ्यांना फूकट वाटल्या .
• १८८५ : १ ) इशारा पुस्तक लिहिले . २ ) सत्सार १ , २ – ब्राह्मो व प्रार्थना समाजावरील टिका
• १९ जुलै १८८७ स्वत : चे मृत्यूपत्र तयार केले .
• २ मार्च १८८८ व्हिक्टोरिया राणीचा पूत्र ड्यूक कॅनॉट यांना प्राथमिक शिक्षण देण्याची मागणी . दिनबंधू – वृत्तपत्र मे १८८८ मुंबई मांडवी , कोळीवाडा हॉलमध्ये त्यांना लोकांनी महात्मा पदवी दिली .
• १ एप्रिल १८८९ खतपोडीचे बंड हा ग्रंथ पूर्ण केला .
• १८८९ पोवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी चे प्रकाशन केले .
• मुंबई काँग्रेसच्या ५ व्या अधिवेशनात सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर ३० फूट गवताचा शेतकऱ्याचा पूतळा तयार केला .
• १८८९ राष्ट्रीय सभेत शेतकऱ्यांना समावून घेण्याचा अधिकार मागितला .
• १८८९ सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला .
• २८ नोव्हेंबर १८९० मृत्यू झाला .
• ३ डिसेंबर २००३ संसदेच्या प्रारंगणात फूलेंच्या पूर्णाकृती पूतळ्याचे अनावरण करण्यात आले .
• फूलेंच्या मते शेतकऱ्यांचे ३ शत्रू – १ ) भिक्षुकशाही , २ ) नोकरशाही , ३ ) सावकारशाही
ज्योतिबांविषयीचे गौरव :
१ ) राजर्षी शाहू – महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग
२ ) महर्षी वि . रा . शिंदे – १ ) पतितांचा पालनवाला २ ) अद्य दलितोद्धारक
३ ) सयाजीराव गायकवाड – हिंदूस्थानचा वॉशिंग्टन
४ ) लक्ष्मणशास्त्री जोशी – महात्मा फूले हे सामाजिक गुलामगिरी विरूद्ध बंड करणारे पहिले पुरुष .
५ ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर – त्यांना Who were the Shudras ? हा ग्रंथ फूलेंना अर्पण केला .
६ ) रा . पंढरीनाथ पाटील – महाराष्ट्रातील पहिला सोशलिस्ट
७ ) महर्षी शिंदे – रानफळाची उपमा
८ ) माधव बागल – कार्लमार्क्स महाराष्ट्राचे
९ ) महात्मा गांधी खरे महात्मा ज्योतीबा फूले आहेत .
१० ) वि . रा . शिंदे – ज्योतीबा फूले हे रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्यूनिस्ट होते . रशियन क्रांतीकारक व ज्योतीबांत फरक एवढाच की , एकात अंत : श्रद्धा होती तर एकीकडे बाह्यभूक होती .
११ ) लक्ष्मणशास्त्री जोशी – हिंदू समाजातील बहूजन समाजाला जागृत व आत्मावलोकन करायला लागणारा पहिला माणूस .
१२ ) धनंजय किर – ( म . फूलेंचे परिपत्रकार ) ज्योतीबांचे नाव ज्योती आणि ज्योती म्हणजे ज्या ज्योतीने समता , मानवता , विवेकवाद यावर प्रकाश टाकून राष्ट्रास खरा मार्ग दाखविला .
१३ ) धनंजय किर व स . ग . मालशे
१ ) महात्मा फूले समग्र वाङमय
२ ) भारतीय समाजक्रांतीचे जनक
३ ) भारतीय सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेशीत सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे सत्यशोधक समाजाचे बायबल होय .
• महात्मा फूलेंचे संदेश – –
१ ) ज्योतीने ज्योत लावा , एक निरक्षर साक्षर करा .
२ ) श्वान हिच शक्ती , शहाणपणाचे अंती सर्व आहे .
सरकारवर टिका करताना : प्रजेचे हीत पहात नाही तो राजा कसला ? पंडिता रमाबाईंचा गौरव :
१ ) सत्शील २ ) सत्याशोधक साध्विनी फूलचे समकालीन टिकाकार : विष्णुशास्त्री चिपळूनकर – शूद्र जगद्गुरू व क्षुद्र धर्मसंस्थापक
ब्रिटीश सरकारने दक्षिणा प्राईज फंडद्वारे म . फुलेंच्या शिक्षण कार्यासाठी मदत केली