Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana: महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना !!

0
35
Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana
Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana

Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana

Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना,महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील महिलांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक योजना ज्या योजनेचे नाव Mahila Samruddhi Karj Yojana आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी कमी व्याज दरात तसेच कमी अटी शर्तींचा वापर करून कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून महिला स्वतःचा उद्योग सुरु करतील वर स्वतःचा आर्थिक विकास करू शकतील.

राज्यात बहुतांश महिला शिक्षित आहेत व रोजगाराच्या शोधात असतात परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगार उपलब्ध होत नाही त्यामुळे ते स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यास इच्छुक असतात परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे त्यांच्या जवळ उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते व ते स्वतःचा एखाद लघु उद्योग सुरु करण्यासाठी असमर्थ ठरतात तसेच बहुतांश बँका व वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था महिला उद्योजकांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात कारण महिला कर्जाची रक्कम परत फेडू शकतील याची त्यांना शाश्वती नसते त्यामुळे महिलांचे स्वतःचा उद्योग सुरु करण्याचे स्वप्न अपूर्ण राहते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

आम्ही महिला बचत गट योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात ज्या कोणी महिला असतील त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नाव महिला बचत गट कर्ज योजना 2023
राज्य महाराष्ट्र
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थी बचत गटातील महिला
लाभ कर्ज उपलब्ध करून दिले जाते
उद्देश्य महिलांना रोजगार सुरु करण्यासाठी

आर्थिक सहाय्य करणे

व्याजदर 4 टक्के
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेचा उद्देश

Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana Purpose

 1. राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्ये उद्दिष्ट्य आहे.
 2. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे
 3. ज्या महिला बचत गटांनी, गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने व्यवसाय सुरु केला आहे, अशा व्यवसाय करत असलेल्या महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे व त्यांना सक्षम करण्याकरिता या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 4. योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे
 5. महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्या सक्षम व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे.
 6. राज्यातील बचत गटातील गरीब,होतकरू,परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे.
 7. महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे हे या योजनेमागचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
 8. राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील व राज्यातील इतर तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करतील या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 9. या योजनेअंतर्गत राज्यातील महिला उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 10. राज्यातील लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
 11. राज्यातील होतकरू व कष्टाळू महिलांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची वैशिष्ट्ये

Mahila Bachat Gat Karj Yojana Features

 • महिला समृद्धी कर्ज योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेली आहे.
 • स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील पुष्कळ महिलांची सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल.
 • बचत गटातील महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हि योजना महत्वपूर्ण ठरेल.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे तसेच कमी कागदपत्रांची आवश्यकता ठेवण्यात आलेली आहे.
 • महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
 • महिलांचा या योजनेअंतर्गत आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होईल.
 • महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त व्याज दराने कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत महिलांना अत्यंत कमी व्याज दरात म्हणजेच 4% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत प्राप्त कर्ज परतफेडीचा कालावधी 3 वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे.
 • या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
 • महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

बचत गट योजना लाभार्थी

Mahila Samruddhi Karj Yojana Beneficiary

 • राज्यातील महिला बचत गटातील महिला या योजनेचे लाभार्थी आहेत

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज

Mahila Bachat Gat Samruddhi Loan Scheme

 • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत व्याज दर

Mahila Bachat Gat Loan Interest Rate

 • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेवर 4 टक्के व्याज दर आकारला जातो.

महिला बचत गटाचे फायदे

Mahila Bachat Gat Karj Yojana Benefits

 • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो.
 • राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
 • आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदर योजना महत्वाची भूमिका बजावते.
 • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःचे तसेच स्वतःच्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करू शकतील तसेच राज्यात नवीन उद्योग सुरु झाल्यामुळे इतर बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
 • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करतील व राज्यात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील त्यामुळे बेरोजगार नागरिकांना रोजगारासाठी आपल्या घरापासून दूर शहरात तसेच इतर राज्यात जाण्याची गरज भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या घराजवळच उद्योग सुरु करण्याची संधी उपलब्ध होईल.
 • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे महिलांमधील उद्योजकास प्रोत्साहन मिळेल.
 • या योजनेच्या सहाय्याने महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होईल.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेची पात्रता

Mahila Samruddhi Karj Yojana Eligibility

 • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ निवासी असणे आवश्यक आहे.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेच्या अटी

Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana Terms & Condition

 • केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातील.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो परंतु काही वेळेस राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेस स्वतःकडील 5% रक्कम भरावी लागेल.
 • ज्या महिलांना बचतगट सुरु केला असेल व असा बचतगट स्थापन होऊन किमान 02 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल महिला बचत गटास या योजनेचा लाभ देण्यात येईल.
 • कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेला कर्जाचा उपयोग 4 महिन्याच्या आत करणे अनिवार्य आहे.
 • महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 20 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्यावरील रक्कम लाभार्थी महिलेस स्वतःकडील भरावी लागेल.
 • अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिला दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत फक्त महिलांना लाभ दिला जाईल
 • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
 • अर्जदार महिलेला स्वतःच्या बँकेचा तपशील देणे गरजेचे आहे कुटुंबातील इतर कोणत्या सदस्यांच्या बँक खात्याचा तपशील चालणार नाही.
 • अर्जदार महिला कुठल्याही बँकेची किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची थकबाकीदार असता कामा नये.
 • अर्जदार महिलेने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर 4% दराने व्याज दर आकारला जातो.
 • महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ३ वर्षाच्या आत परत करणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिलेने अर्जात खोटी माहिती भरून सदर योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेवर दंडात्मक कारवाई करून योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल.
 • महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्थसहाय्य किमान 5,3,2 वर्षे पूर्ण झालेल्या व नियमित मासिक बचत असणाऱ्या महिला बचत गटास दिले जाईल
 • अर्थसहाय्य गट स्थापन करुन किमान 4 वर्षे पूर्ण झालेल्या व नियमित मासिक बचत असणाऱ्या व सामुदायिक व्यवसाय अथवा गटातील किमान 50% सदस्या व्यवसाय करत असणा-या महिला बचत गटास मिळू शकेल.
 • महिला बचत गटांनी त्यांचे बचतीच्या संबंधात लेख्यांच्या नोंदी अद्यावत ठेवलेल्या असाव्यात.
 • महिला बचत गटांची मासिक बैठक नियमीत व बचतीसाठी जमा करण्यात येणाऱ्या बचतीची मासिक वर्गणी नियमीत भरणा केलेली असावी. याबाबत ठरावाच्या नोंदीची छायाप्रत सादर करणे बंधनकारक राहील.
 • महिला बचत गटामधील सर्व महिलांची यादी सोबत जोडणे आवश्यक राहील.
 • बचत गटाच्या पॅनकार्डची प्रत जोडणे आवश्यक राहील.
 • बचत गटामार्फत करत असलेल्या व्यवसायाचा तसेच त्यापासून मिळत असलेल्या मासिक उत्पन्नाचा तपशिल सोबत जोडणे आवश्यक राहील.
 • व्यवसायासाठी वापरात असलेल्या जागेबाबतचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक राहील.
 • बचत गटाच्या बँक पासबुकची खाते सुरु केल्यापासून आजतागायत प्रती सोबत जोडणे आवश्यक राहील,
 • अर्जासोबत तिन्ही पदाधिका-यांचे अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज आकाराचे फोटो लावणे आवश्यक राहील.
 • महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये किमान 10,000/- रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे तसेच रक्कम कर्ज स्वरुपात दिली असल्यास किंवा ठेवीच्या स्वरुपात गुंतवणूक केली असल्यास त्याबाबतचा पुरावा सादर करणे बंधनकारक राहील.
 • या निधीचा उपयोग महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या उद्योगाच्या/व्यवसाच्या सक्षमीकरणाकरीता करण्यात यावे.
 • बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बैंक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक (गव्हर्नमेंट अंडरटेकींग) यामध्ये असेल त्या बचत गटांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
 • अशा प्रकारचे अर्थसहाय्य एकदाच गटाला मिळू शकेल.
 • सदर योजनेचा लाभ गटामार्फत सुरु असलेल्या व्यवसाय तसेच त्यांच्या बचतीच्या लेख्याची तपासणी केल्यानंतर पात्र ठरेलल्या महिला बचत गटास देण्यात येईल.
 • अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिका-याने प्रमाणित केलेली असावीत.
 • दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजुर करणे अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार मा.आयुक्त यांना राहील,

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

Mahila Samruddhi Karj Yojana Documents

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी पुरावा
 • जन्म प्रमाण पत्र
 • उत्पन्नाचा दाखला
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • बँकेचा तपशील
 • पासपोर्ट साईज फोटो
 • व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

Mahila Bachat Gat Samruddhi Karj Yojana Rejection

 • अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जात चुकीची खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
 • अर्जात कुटुंबातील इतर कोणत्या सदस्याचा बँक खात्याचा तपशील दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
 • एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास दोन्ही अर्ज रद्द करण्यात येईल.
 • अर्जदार महिलेने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर अर्ज रद्द करण्यात येईल.

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Bachat Gat Registration Process In Marathi

 • अर्जदार महिलेला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे किंवा आम्ही खाली अर्ज डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे तेथून अर्ज डाउनलोड करायचा आहे.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे.
 • अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यायची आहे.

Mahila Bachat Gat Karj Yojana

Application Form

Download
महिला बचत गट नोंदणी अर्ज Download
बचत गट कर्ज मागणी अर्ज नमुना Download
स्वयंसहाय्यता बचत गट pdf Download
Bachat Gat Loan Application Form In Marathi Download
Bachat Gat Registration Form PDF Download

महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

महिला बचत गट कर्ज योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

महिला बचत गट कर्ज योजना चे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटातील महिला या योजनेचे लाभार्थी आहेत.

महिला बचत गट कर्ज योजनेचा फायदा काय आहे?

महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत महिला बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महिला बचत गट कर्ज योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्ये उद्दिष्ट्य आहे.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत व्याज दर किती आहे?

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत 4% व्याज दर आकारला जातो.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी किती आहे?

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्ग प्राप्त कर्जाची 3 वर्षाच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे.

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते?

महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो.

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ