मानवी हक्क – इतिहास, जाहीरनामा आणि वाटचाल

0
1129

मानवी हक्क – इतिहास, जाहीरनामा आणि वाटचाल

-प्रत्येक व्यक्तीस जन्मतः काही हक्क प्राप्त होतात.

-प्रत्येक व्यक्ती ही मानव आहे आणि मानव असल्यामुळे निसर्गतः जे अधिकार प्राप्त होतात त्यांना मानवी अधिकार असे म्हणतात.

हेरॉल्ड लास्की ची व्याख्या- ज्या परिस्थितीच्या घटकाशिवाय व्यक्तीला आपली सर्वांगीण परिस्थिती साध्य करता येत नाही, त्या परिस्थितीच्या घटकांना मानवी अधिकार म्हणतात.

बेन्थम ची व्याख्या- कायद्याने मान्य केलेली स्वीकृती दिलेली व्यक्तीची मागणी म्हणजे अधिकार होय.

1993 च्या मानवी अधिकार संरक्षण अधिनियमात केलेली व्याख्या-

“मानवी अधिकार म्हणजे व्यक्तीचे जीवित, स्वातंत्र्य, समता आणि प्रतिष्ठा या संबंधीचे संवैधानिक संरक्षण बहाल केलेले आणि मानवी अधिकाराच्या जागतिक जाहीरनाम्यात समाविष्ठ करण्यात आलेले आणि भारतीय न्यायव्यवस्थेद्वारा ज्यांची जोपासना करण्यात येते ते अधिकार होय.”

UNO च्या जाहीरनाम्यात असलेल्या कलम क्र. 2 नुसार व्याख्या-

वंश, वर्ण, भाषा, धर्म, राष्ट्र, लिंग, मालमत्ता, विशिष्ट क्षेत्रात जन्मल्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा व दर्जा इ. बाबतीत कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाला जे समान अधिकार व स्वातंत्र्य दिली जाते त्यास मानवी हक्क असे म्हणतात.

मानवी हक्कांचा जाहीरनामा

★ मॅग्ना कार्टा (श्रेष्ठ सनद) 1215

-इंगलंडचे राजे जॉन यांनी 15 जून 1215 रोजी मॅग्ना कार्टा लागू केला. 

-मॅग्ना कार्टा मुले ब्रिटन व अन्य ठिकाणी घटनात्मक कायद्याचा पाया घातला गेला.

-मॅग्ना कार्टा मध्ये 63 कलमे आहेत.

-यातून हक्कांचे अभिवचन देण्यात आले.

-मॅग्ना कार्टा मधील हक्क मुख्यतः उच्च वर्गातील लोकांसाठी होते.

-राज्यसत्ता निरंकुश नाही असे दाखवून दिले.

राज्याच्या निरंकुश सत्तेवर पहिला निर्बंध मॅग्ना कार्टाच्या स्वरूपात पुढे आला.

-लोकशाही शासनासाठी मॅग्ना कार्टा पथदर्शक

हक्कांचे विधेयक (बिल ऑफ राईट्स- 1689) 

★ हक्कांचे संयुक्त राष्ट्राचे विधेयक- 1776

-निश्चित स्वरूपातील हक्क सन 1776 च्या (व्हर्जिनिया जाहीरनामा) अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्रता जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले.

-संयुक्त राष्ट्राची घटना ही स्वायत्त स्वरूपाची आहे.

★ हक्कांचा फ्रेंच जाहीरनामा – 1789

-फ्रांस ने 1789 मध्ये मानवी व नागरी हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला.

-यात स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची व्याख्या.

-यात धार्मिक स्वातंत्र्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत सुरक्षिततेची हमी दिलेली आहे. 

★ हक्कांचा कॅनडा जाहीरनामा -1982

-या सनदेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य आणि अन्य मूलभूत हक्क यांची हमी देते.

-रंग, धर्म, वय, लिंग किंवा मानसिक तसेच शारीरिक अपंगत्व यावर आधारित भेदभावांवर बहिष्कार टाकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here