MPSC prelims exam syllabus | Mpsc syllabus 2021

0
751

MPSC prelims exam syllabus | Mpsc syllabus 2021

नुकत्याच झालेल्या अधिसूचनेनुसार एमपीएससीने MPSC Mains Syllabus 2020 मध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. हे बदल जनरल स्टडीज पेपर I-IV मध्ये करण्यात आले आहे. पेपर १ (मराठी आणि इंग्रजी – निबंध / अनुवाद) आणि पेपर २ (मराठी आणि इंग्रजी – व्याकरण / आकलन) मध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत. उमेदवार खाली दिलेल्या लेखात एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा MPSC Prelims साठी सुधारित अभ्यासक्रम  Mpsc syllabus तपासू शकतात. 

ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्नपत्रिकांमधील नकारात्मक गुणांकडे कमिशनने MPSC  परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केले आहेत. यापूर्वी प्रत्येक चुकीच्या उत्तराला देण्यात आलेल्या १/ 3 नकारात्मक गुण दिले जात. आयोगाने आता प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकूण गुणांपैकी २५%  marks किंवा १/4 नकारात्मक गुण देणार  आहे. 

राज्यसेवा पूर्व परीक्षा  MPSC Prelims महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) घेते  आणि देखरेख ठेवते. एमपीएससी परीक्षा व्यतिरिक्त, आयोग अधीनस्थ सेवा, वर्ग सी सेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, न्यायिक सेवा इत्यादी सारख्या इतर परीक्षा घेतो. या लेखात तुम्हाला नवीनतम एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम MPSC prelims exam syllabus व स्वरुप याविषयी माहिती मिळू शकेल.mpsc syllabus in marathi in MPSC world.in

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच एमपीएससी राज्य सेवा परीक्षा देखील तीन टप्प्यात घेण्यात येते:

  1. प्रिलिम्स ( MPSC Prelims)
  2. मुख्य ( MPSC Mains)
  3. मुलाखत ( MPSC interview)

उमेदवाराला त्यानंतरच्या टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी एका टप्प्यात क्लिअर करावे लागेल, म्हणजेच, जर ती / ती प्रीलिम क्लिअर करते, तर तो / ती अंतिम टप्प्यात (मुलाखत)  MPSC interview बोलावण्यात येईल, हे स्पष्ट करते. एमपीएससी परीक्षेची.

एमपीएससी परीक्षेची पात्रता येथे तपासा .MPSC exam eligibility here.

पहिला टप्पा: एमपीएससी प्रारंभिक परीक्षा ( mpsc exam pattern )

या परीक्षेत दोन पेपर असतात, प्रिलिम्सच्या परीक्षेच्या तपशिलासाठी खालील तकत्याकडे लक्ष द्या. कृपया लक्षात घ्या की दोन्ही पेपर  अनिवार्य आहेत.

पेपर  क्रमांकप्रश्नांची संख्याएकूण गुणमानकमध्यमकालावधीपेपरचे स्वरूप
पेपर I100200पदवीइंग्रजी आणि मराठी2 तासवस्तुनिष्ठ
पेपर II80200डिग्री आणि शालेय अभ्यासक्रम यांचे मिश्रण (विषयावर अवलंबून – सविस्तर माहितीसाठी खाली पहा)इंग्रजी आणि मराठी2 तासवस्तुनिष्ठ
MPSC Prelims paper pattern MPSC world.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता चार चुकीच्या उत्तराबददल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मक गुणांची पध्दत सन २००९ मध्ये प्रथमतः लागू करण्यात आली.

तदनंतर राज्य सेवा परीक्षेच्या संदर्भात नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपध्दती काही बदलासह अवलंबिवण्यात आली. सदर कार्यध्दतीचा आढावा घेण्यात आला. वस्तुनिष्ठ बहुपर्यायो परीक्षांकरीता यापूर्वी अवलंबविण्यात येत असलेल्या सर्व कार्यपध्दती अधिक्रमित करुन 

यापुढे सर्व वस्तूनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता खालीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात येत आहे :- MPSC exam negative marking system 

(१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.

(२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकोचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या

उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.

(३) वरीलप्रमाणे कार्यपथ्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.

(४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

उपरोक्त कार्यपध्दत आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरीता लागू राहील,

सदर कार्यपध्दत यापुढे जाहिर होणाच्या सर्व लेखी परीक्षांच्या निकालाकरीता लागू राहील.

आयोगाच्या संकेतस्थळावरील संबंधित परीक्षांच्या परीक्षा योजनांमध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील. तोपर्यंत उपरोक्त कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

(५) अंतिम गुणवत्ता यादीसाठी पूर्वपरीक्षेचे ( MPSC Prelims) गुण मोजले जात नाहीत.

एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने नुकताच त्यांच्या पूर्व परीक्षेचा  पॅटर्न ( mpsc exam pattern ) बदललाय. हा पॅटर्न ब‍-याच अंशी यूपीएससीसारखा आहे. 

नवा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :

नव्या पॅटर्ननुसार प्रीलियमसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील. 

पेपर- १ GS(गुण २०० – कालावधी २ तास) 

– राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. 

– भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ 

– महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक. 

महाराष्ट्र व भारत – राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय धोरणं , हक्कविषयक घडामोडी आदी

आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता , हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे , सामान्य विज्ञान

1) वस्तुनिष्ठ माहिती – यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल.

2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न  

आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या.

3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न 

नुसताच नियम वा कायदा माहीती असणं महत्त्वाचं नाही तर त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे.

4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासा. रोजचा पेपर वाचा. इतिहास , भूगोल , राज्य शास्त्र , विज्ञान यांच्या मूलभूत अभ्यासासाठी आठवी ते बारावीची पुस्तकं वाचा. 

पेपर- २ CSAT (गुण २०० – कालावधी २ तास) 

आकलन (कॉम्प्रिहेन्शन) 

  • इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)
  • तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)
  • निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)
  • सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)
  • बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)
  • इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता – कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)

कॉम्प्रिहेन्शन :

यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उता‍ऱ्यावर प्रश्न , पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं , वाक्यरचना ओळखणं , योग्य शब्दाची निवड करणं , समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात. 

लॉजिकल रिझनिंग आणि अ‍ॅनॅलॅटिकल अ‍ॅबिलिटी

यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध , त्यावरचं अनुमान काढावं लागंत. 

डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग :

प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना- समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य , अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल , असा निर्णय घ्यावा लागतो. प्रीलियमचे काही प्रश्न हे या क्षमतेची चाचपणी करणारे असतील. 

जनरल मेंटल एबिलिटी :

आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ , काम , वेग , गुणोत्तर , कोडिंग , डिकोडिंग , प्रोबॅबिलिटी , घड्याळ , कॅलेंडर , दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात. 

बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन :

यात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं , लसावि/ मसाविवर आधारित प्रश्न , सरासरी , वयांचे गुणोत्तर नफा-तोटा , क्षेत्रफळ , आकारमान , प्रोबॅबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती , ग्राफ , टेबल्स याचं आकलन करणं अपेक्षित असतं.

कॉम्प्रिहेन्शन तसंच न्यूमरसीचे प्रश्न हे दहावीस्तराचे असणार आहेत , असंही जाहीर केलं गेलंय. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल. 

इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) :

सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करत असताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी , अधिकारी , कर्मचारी आदींशी नियमित संपर्क येत असतो. त्यावेळी तुमची इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स कामाला येतात.

अशा प्रकारे MPSC prelims exam syllabus व  MPSC prelims exam pattern आहे . वेळोवेळी होणार्‍या बदला करीता शासनाच्या MPSC website ला अवश्य भेट द्या . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here