स्पर्धा परीक्षा मुलाखतीविषयीचे पुर्वग्रह / गैरसमज Mpsc / Upsc interview 7+ myths

0
361

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) होणाऱ्या मुलाखतींविषयी Mpsc / Upsc interview विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचदा गैरसमज आढळतात. त्याचा आपल्या मुलाखतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून ते गैरसमज / पुर्वग्रह myths कोणते आहेत हे समजून घेतले पाहिजेत व त्यातील काही गैरसमज आपल्यात असतील तर ताबडतोब ते दूर केले पाहिजेत.

Mpsc / Upsc interview myths

१. मुलाखतीची सर्वच्या सर्व उत्तरे बरोबर आली पाहिजे हा भ्रम चूकीचा आहे. अथवा जास्त उत्तरे बरोबर म्हणजे जास्त गुण हे चूकीचे समीकरण आहे. मुलाखतीचा मुख्य उद्देश उमेदवाराचे फक्त बौद्धिक ज्ञान तपासणे नसून त्याचे व्यक्तीमत्त्व तपासणे हा आहे. म्हणून काही प्रश्नांची उत्तरे न आल्यामुळे घाबरण्याचे व उर्वरित Interview खराब देण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर (भले ते नाही असेल) आत्मविश्वासपूर्वक द्यावे.

२. मुलाखत जास्त वेळ चालली म्हणजे जास्त गुण हा देखील चूकीचा भ्रम आहे.

३. श्रीमंत, शहरी उमेदवारांना जास्त गुण असा विचार देखील चूकीचा आहे.

४. तसेच एखाद्या पॅनेलविषयी देखील कोणताही पुर्वग्रह नसावा. कोणतेही पॅनल असले तरी उमेदवाराने आत्मविश्वासपूर्वक/प्रसन्नतेने मुलाखत द्यावी.

५. मुलाखत मंडळ Mpsc /Upsc interview panel members तुम्हाला नाकारण्यासाठी नूसन तुमची निवड करण्यासाठी असते म्हणून ताणविरहीत मुलाखतद्यावी.

६. मुलाखत interview panel मंडळाची ओढून ताणून सहानुभूती मिळविण्याची गरज नाही. उमेदवार बऱ्याचदा आपल्या गरीबीचे भांडवल यासाठी फाटलेले कपडे, बूट ऐवजी चप्पल परीधान करतात. परंतु हे चूकीचे आहे.

७. बऱ्याच जणांना वाटते की मुलाखत सकाळी लवकर झाली म्हणजे चांगले गुण व उशीरा झाली म्हणजे कमी गुण मिळतात. परंतु यात काही तथ्य नसून मुलाखत केव्हाही झाली तरी तेवढ्याच तळमळीने/ प्रसन्नतेने आपण मंडळाला interview panel सामोरे जावे.

८. सूट-टायसह गेल्यास चांगले गुण मिळतात, असं नक्कीच नाही.

९. शैक्षणिक कारकीर्द चांगली असल्यासच चांगले गुण मिळतात. हा सुद्धा भ्रम आहे.

आपणास हे देखील आवडेल

राज्यसेवा पूर्व परीक्षा माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here