भारताची राष्ट्रीय सन्मानचिन्हे – National Insignia of India Notes Marathi

0
760

भारताची राष्ट्रीय सन्मानचिन्हे – National Insignia of India Notes Marathi

राष्ट्रध्वज

  • आपल्या देशाचा राष्ट्रध्वज हा अशोक चक्रांकित तिरंगा आहे.
  • राष्ट्रध्वज हे भारताचे पहिले राष्ट्रीय सन्मानचिन्ह आहे.
  • राष्ट्रध्वजात केशरी (वरच्या बाजूला), पांढरा (मध्ये) आणि हिरवा (खालील बाजूस) असे तीन रंगांचे समान पट्टे असतात.
  • राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी ही ३:२ प्रमाणात असते.
  • राष्ट्रध्वजाच्या मध्ये पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र असून त्याला 24 आरे आहेत.
  • केशरी रंग- त्याग, बलिदान, तपस्या, धैर्य यांचे प्रतीक
  • पांढरा रंग- सत्य, शांतता, पावित्र्य यांचे प्रतीक
  • हिरवा रंग- समृद्धीचे प्रतीक
  • अशोक चक्र- निळ्या रंगाचे धर्मचक्र. सत्य धर्माचे आचरण करणारा संदेश.
  • 24 आरे- चोवीस तास सतत धर्मानुसार गतिमान
  • राष्ट्रध्वज रचना समिती – पंडित नेहरू, सरदार पटेल असे एकूण 7 सदस्य
  • घटना समितीने राष्ट्रध्वजास 22 जुलै 1947 रोजी संमती दिली.

राष्ट्रगीत

  • “जन- गण- मन… ” हे भारताचे राष्ट्रगीत आहे.
  • राष्ट्रगीतात 55 शब्द आहेत.
  • हे राष्ट्रगीत नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी असणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले आहे.
  • राष्ट्रगीत हे 52 सेकंदात गायला हवे.
  • 1911 साली काँग्रेसच्या कोलकत्ता येथील अधिवेशनात राष्ट्रगीत प्रथम गायिले गेले.
  • राष्ट्रगीत हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे.

राजमुद्रा

  • राजमुद्रा हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे.
  • सम्राट अशोकाने सांची येथे उभारलेला चार सिंहांनी युक्त स्तूप ही भारताची राजमुद्रा आहे.
  • या चार सिंहांपैकी एक सिंह दिसत नाही.
  • राजमुद्रेच्या खाली डाव्या बाजूस घोडा तर उजव्या बाजूस बैल आहे. मधोमध अशोक चक्र आहे.
  • राजमुद्रेच्या खालील सत्यमेव जयते हे वाक्य देवनागरी लिपीत कोरलेले आहे.
  • राजमुद्रा भारताच्या सर्व कागदपत्रांवर उमटवलेली असते. (उदा. नोटा, नाणी, स्टॅम्प इत्यादी)

राष्ट्रगीत

  • बंकिमचंद्र पाल यांनी लिहिलेल्या ‘ वंदे मातरम’ या गीताला देखील राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त आहे.
  • वंदे मातरम हे 1882 साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत प्रसिद्ध झाले.

राष्ट्रीय कालगणना

  • आपली राष्ट्रीय कालगणना ही सौर वर्षाशी निगडित आहे.
  • 22 मार्च 1957 रोजी राष्ट्रीय कालगणनेचा स्वीकार करण्यात आला.
  • भारतीय सौर वर्षाचा पहिला महिना चैत्र असून शेवटचा महिना फाल्गुन आहे.

राष्ट्रीय प्राणी

  • वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे.
  • ‘पँथेरा टायग्रीस’ असे त्या वाघाचे शास्त्रीय नाव आहे.
  • वाघ हा प्राणी शौर्य, साहस अंडी धैर्य यांचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय पक्षी

  • मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे.
  • पॅओ क्रिस्टॅट्स असे मोराचे शास्त्रीय नाव आहे.
  • मोर हा पक्षी सौंदर्याचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय फुल

  • कमळ हे आपले राष्ट्रीय फुल आहे.
  • ‘नेल्युम्बा न्यूसीफेरा’ हे कमळाचे राष्ट्रीय नाव आहे.
  • कमळ हे फुल समृद्धी, विकास आणि भरभराटीचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय खेळ

  • हॉकी

राष्ट्रीय फळ

  • आंबा

राष्ट्रीय बोधवाक्य

  • सत्यमेव जयते

राष्ट्रीय जलचर प्राणी

  • डॉल्फिन

राष्ट्रीय दिन

  • स्वातंत्र्य दिन- 15 ऑगस्ट
  • प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here