Nipun Bharat Mission: निपुण भारत योजना संपूर्ण माहिती!!

0
26
Nipun Bharat Mission
Nipun Bharat Mission

Nipun Bharat Mission

निपुण भारत अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी

भाषिक कौशल्ये :- 3 ते 9 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकास होण्यासाठी मातृभाषेमध्ये मौखिक भाषा ज्ञान, समजपूर्वक एकने आणि त्याचे आकलन, मुद्रणशास्त्र व उच्चारशास्त्र यांच्या विकासाची जाणीव व लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे. भाषिक कौशल्ये प्राप्त होण्यासाठी भाषेचे पूर्वज्ञान मदतगार ठरेल, ज्या विद्यार्थ्यांचा भाषेचा पाया मजबूत असतो, ते विद्यार्थी इंग्रजी आणि इतर भाषा सहजतेने शिकू शकतात.

मुलभूत साक्षरतेचे घटक :-

  • मौखिक भाषा विकास :- लेखन आणि वाचांची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास होणे गरजेचे आहे.
  • उच्चार शास्त्राची जाणीव :- शब्दाची लय आणि ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.
  • सांकेतिक भाषा / लिपी समजून घेणे :- यामध्ये छापील मजकुरांचे आकलन करण्यासाठी क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे.
  • शब्द संग्रह :- मौखिक शब्द संग्रह, वाचन / लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा
  • वाचन व आकलन :- मजकुरांचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकुरांचे स्पष्टीकरण करणे.
  • वाचनातील ओघवतेपणा :- मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन.
  • लेखन :- अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिण्याची क्षमता
  • आकलन :- छापील मजकूर / पुस्तके यामुळे आकलन कौशल्ये विकसित होण्यास मदत.
  • वाचन संस्कृती आणि वाचनाकडे कल:- यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचनाकडे कल असणे

पायाभूत संख्या साक्षरता,संख्याज्ञान आणि गणितीय कौशल्ये 

मुलभूत संख्या साक्षरता याचा अर्थ असा होतो कि दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी सध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करणे आणि संख्या व संख्या कल्पनेचा विकास, तसेच तुलना करण्याचे ज्ञान, व कौशल्य, क्रमश मांडणी करणे, आकृती / संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात.

प्रारंभिक गणिताचे दृष्टीकोन  :-

  • संख्या पूर्व :- गणन आणि संख्या ज्ञान
  • संख्या व संख्येवरील क्रिया :- दशमान पद्धतीचा वापर, संख्येवरील प्रभुत्व संपादन करणे,
  • गणना करणे :- तीन अंकी संख्येची बेरीज करणे, वजाबाकी करणे, गुणाकार करणे, भागाकार करणे, या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजून घेणे आणि त्याचा उपयोग करणे.
  • आकार व अवकाश या बाबत समजून घेणे :- या मध्ये तीन अंकी संख्यापर्यंतची सोपी आकडेमोड करून त्यांचा विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे.
  • नमुना /संरचना :- आकार आणि अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे.

निपुण भारत 2023 च्या भागधारकांची यादी 

  • CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)
  • राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश
  • राज्य शिक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
  • केंद्रीय शाळा संघटना
  • राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
  • मुख्य शिक्षक
  • समुदाय आणि पालक
  • जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था
  • ब्लॉक रिसर्च सेंटर आणि क्लस्टर रिसोर्स सेंटर
  • जिल्हा शिक्षण अधिकारी व गट शिक्षणअधिकारी
  • नागरी समाज संघटना
  • खाजगी शाळा
  • गैर-सरकारी संस्था 

निपुण भारत अभियानाचे महत्त्वपूर्ण भाग  

  • निपुण भारत योजना अभियानचे शासनाने सतरा भागांमध्ये विभागणी केली आहे, ती माहिती खालीलप्रमाणे असेल

परिचय

मुलभूत संख्या आणि गणित कौशल्ये

मुलभूत भाषा आणि साक्षरता समजून घेणे

शिक्षण आणि शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या क्षमता आणि विकासावर लक्ष केंद्रित करणे

सक्षमतेवर आधारित शिक्षणाकडे वळणे

शिकण्याचे मुल्यांकन

अध्यापन – अध्ययन प्रक्रिया यामध्ये शिक्षकांची भूमिका

राष्ट्रीय मिशन: पैलू आणि दृष्टीकोन

शाळेची तयारी

अभियानाची धोरणात्मक योजना

अभियानाच्या अंमलबजावणी मध्ये विविध भागधारकांची भूमिका

SCERT आणि DIET व्दारे शैक्षणिक साहित्य

DIKSHA/NDEAR चा लाभ घेणे, डिजिटल संसाधनांचे भंडारा

देखरेख आणि माहिती तंत्रज्ञान फ्रेमवर्क

मोहीम अनंतकाळ

पालक आणि समुदाय प्रतिबद्धता

संशोधन, मूल्यमापन आणि दस्तऐजीकरण गरज

शाळा आधारित मूल्यांकनाचे उद्दिष्ट्ये 

  • मुलांचे  आरोग्य
  • शारीरिक विकास
  • व्यायाम आणि खेळ
  • स्वच्छतेचे पैलू
  • वस्तू, खेळणी इत्यादी व्यवस्थित करणे
  • मुलांची सामाजिक आणि भावनिक प्रगती इत्यादी
  • मुलांना प्रभावी संवादक बनविणे
  • शाळा आधारित मूल्यमापन अंतर्गत, मुलांची मातृभाषा हि संभाषणकर्त्याची भाषा बनविणे जेणेकरून ते संभाषका समोर आपले मुद्दे मांडू शकतील.
  • भाषा आणि मुलभूत साक्षरता प्र्त्याक्षिक उपायुक्त
  • हास्याचा विकास
  • गैर-मौखिक संवादाचे महत्त्व
  • मुलांना सहभागी करून शिकणारे बनविणे
  • कथा तयार करून प्रोत्साहित करणे
  • मुलांना विविध प्रकारचे प्रकल्प आणि कार्य देणे
  • भौतिक वातावरण समजून घेण्याची संधी प्रदान करणे
  • पोर्टफोलिओ
  • मूल्यांकनासाठी दृकश्राव्य साधनांची निर्मिती करणे
  • प्रश्न बँकेचा विकास इत्यादी 

निपुण भारत अभियाना अंतर्गत 3 ते 9 वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे, सन 2026, 2027 पर्यंत शैक्षणिक लक्ष निर्धारित करण्यात येत आहे. 

a क्र. अंगणवाडी /बालवाडी अखेर इयत्ता पहिली अखेर इयत्ता दुसरी अखेर इयत्ता तिसरी अखेर
भाषा साक्षरता अक्षरे व त्या सबंधी आवाज ओळखतो किमान दोन-तीन अक्षरे असलेले साधे शब्द वाचतो अपठीत मजकूर असलेली किमान चार -पाच साधे शब्द असलेली छोटी वाक्य वाचतो अपठीत मजकूर चाळीस ते पन्नास शब्द प्रती मिनिट अर्था सकट वाचतो अपठीत मजकूर साठ शब्द प्रती मिनिट अर्था सकट वाचतो
संख्या साक्षरता दहा पर्यंत अंक ज्ञान (ओळखणे व वाचणे) नव्यानव पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन. साधी बेरीज व वजाबाकी करतो. नवशे नव्यानव पर्यंतचे संख्यांचे वाचन, लेखन. नव्यानव पर्यंत संख्यांची वजाबाकी करतो नव हजार नवशे नव्यानव पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन. सोपी गुणाकाराची उदाहरणे सोडवतो

 मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानचे आधारस्तंभ 

निपुण भारत अभियाना अंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी प्रामुख्याने सहा आधारस्तंभ ठरविण्यात आले आहे, प्रत्येक विद्यार्थ्यास इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत लेखन आणि वाचन व गणितीय कौशल्य प्राप्त होतील, हे लक्ष 26 – 27 पर्यंत साध्य करण्यात येईल. कोणताही विद्यार्थी त्याच्या शैक्षणिक प्रवासात मागे राहणार नाही व पुढील आयुष्यात त्याच्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होणार नाही, यासाठी प्रत्येक आधारस्तंभ संयुक्त भूमिका पार पाडेल.

निपुण भारत अभियानाचे आधारस्तंभ संपूर्ण तपशील
संबंधित घटकांचे निदान राज्यातील सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीचे मुलभूत निदान करून पुढील कृती कार्यक्रमाचे नियोजन करणे, सध्याचे धोरण, क्षमता व अंदाजपत्रक. व्यवस्थापकीय : सध्याची उद्दिष्ट्ये, शैक्षणिक सहाय्य, सनियंत्रण व पालकांची प्रतिबद्धता. वर्ग अध्ययनाचा परिणाम विद्यार्थ्यांची पूर्व तयारी, सूचना देण्याची वेळ, बालमानसशास्त्र व संसाधने
सर्व स्तरांवर उद्दिष्ट्ये व लक्ष्य यांचे निर्धारण या अभियानाशी संबंधित सर्व संबंधितांचे स्पष्ट व मापनयोग्य उद्दिष्ट्ये निश्चित करणे गरजेचे आहे, हे उद्दिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या संपादणूकीशी व सध्याच्या अध्ययन स्तरांशी सुसंगत व शिक्षकांना सहाय्यभूत असावीत.यामध्ये 3 ते 5 वर्षे वयोगटातील व 1 ली ते 3 री इयत्तेतील उद्दिष्ट्ये स्पष्ट झाल्यास विचारांची देवाण घेवाण सुलभ होऊन संबंधित घटकांची जबाबदारी निश्चित होईल.
उच्च दर्जाचे अध्ययन व अध्यापन साहित्य विद्यार्थी व शिक्षकांसाठी आवश्यक अध्ययन – अध्यापन साहित्य उपलब्ध करण्यात येईल
शिक्षकांचा व्यावसायिक विकास अंगणवाडी / बालवाडी आणि शाळेतील शिक्षकांनी या अभियानाला यशस्वी करण्यासाठी नवनवीन अध्यापन तंत्रे व त्याचा परिणामकारकरीत्या वापर करण्याचे आवश्यक कौशल्ये प्राप्त करण्यासाठी शिक्षकांचा व्यावसायिक विकासाचे उपक्रम आयोजित करण्यात येईल
शिक्षकांच्या मदतीसाठी यंत्रणा शिक्षकांना मदत करण्यासाठी, जिल्हा, गट व समूह साधन स्तरांवरील पर्यवेक्षीय यंत्रणांनी वर्ग निरक्षण, पर्यवेक्षण, प्रशिक्षण, पाठपुरावा, आढावा अभियानाचे उद्दिष्ट व अध्यापनशास्त्र याबाबतीत अद्यावत असले पाहिजे
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अध्यापनात सुधारणा करण्यासाठी, ठराविक कालावधीने विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर शिक्षकाला व शाळा व्यवस्थापनाला समजण्यासाठी मुलांच्या प्रगतीचे मापन करण्यासाठी मूल्यमापनाची गरज आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला पायाभूत चाचणी तर वर्ष अखेरीस चाचणी यातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करता येईल

निपुण भारत कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये 

निपुण भारत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे खालीलप्रमाणे परिणाम अपेक्षित असेल

  • प्राथमिक कौशल्ये मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळे शाळा मध्येच सोडून जाणाऱ्या मुलांची संख्या कमी होते, त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांवर शाळा सोडणाऱ्या मुलांची संख्या कमी होते.
  • क्रियाकलाप आधारित शिक्षण आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते
  • खेळण्यांवर आधारित आणि अनुभवात्मक शिक्षण यासारख्या नाविन्यपूर्ण अध्ययनशास्त्राचा उपयोग वर्गात शिकणे आनंददायक आणि आकार्षक क्रियाकलाप करण्यासाठी केला जाईल.
  • शिक्षकांची सखोल क्षमता निर्माण त्यांना सक्षम करेल आणि त्यांना अध्यापनशास्त्राची कला निवडण्यासाठी अधिक स्वायत्तता देईल.
  • शारीरिक आणि समाजिक भावनिक विकास, साक्षरता आणि संख्यात्मक विकास, संज्ञानात्मक विकास, जीवन कौशल्ये इत्यादी परस्परसबंधीत आणि परस्परावलंबी विकासाच्या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून मुलांचा सर्वांगीण विकास प्रगती कार्डमध्ये दिसून येईल.
  • मुलांची शिकण्याची गती अधिक वागवण होईल ज्याचा नंतरच्या जीवनावरील परिणामांवर आणि रोजगारावर सकारत्मक परिणाम होऊ शकतो.
  • जवळजवळ प्रत्येक मुल प्राथमिक इयत्तांमध्ये उपस्थित राहतो त्यामुळे त्या स्तरांवर लक्ष केंद्रित केल्याने समाजिक आणि आर्थिक वंचित गटालाही फायदा होईल, त्यामुळे न्याय आणि सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित होईल. 
  • निपुण भारत अभियानाची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्थांची भूमिका व जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील 

समग्र शिक्षा, मुंबई :

  • राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करणे व अभियानाचे सनियंत्रण करणे
  • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाशी समन्वय अभियानासाठी तरतूद व खर्च यांचे व्यवस्थापन.
  • राज्य शैक्षणिक संशोधन व पशिक्षण परिषद व जिल्हा स्तरावर निधी वितरण.
  • जमा-खर्च व्यवस्थापन व त्यासंबंधित प्रशासकीय कार्यवाही
  • संपादणूकीचा दर्जा उंचावण्यासाठी अध्ययन –अध्यापन साहित्य विकसित, छापाई व वितरण
  • सनियंत्रणासाठी अप/पोर्टल यांची निर्मिती
  • विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करणारी साधने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या मदतीने विकसित करणे, राज्य स्तरांवर प्रगतीचा आढावा घेणे, सुकाणू समितीस अद्यावत माहिती देणे.
  • सदर अभियान एक चळवळ होण्यासाठी विविध घटकांचा प्रभावी सहभाग घेणे
  • सदर अभियानासाठी संबंधित यंत्रणांना वेळोवेळी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना, नियोजनासाठी नमुने उपलब्ध करणे 

राज्य शैक्षणिक पुनरावृत्ती आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र 

  • या अभियानाच्या विद्याविषयक अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी
  • राष्ट्रीय स्तरांवरील सदर अभियानास अनुसरून राज्याच्या गरजेनुसार सदर अभियानास जोडणे
  • या अभियाणाचा पाच वर्षासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करणे.
  • शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी अध्ययन – अध्यापन संदर्भ साहित्याचे व दीक्षा अॅपवर विद्यार्थ्यांसाठी इ – संदर्भ साहित्याचे विकसन आणि भाषांतर करणे.
  • यापूर्वी शाळांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या गणित पेटी, विज्ञान पेटी, भाषा पेटी, इत्यादी साहित्याचा परिणामकारक वापर होतो किंवा कसे, याची खात्री करणे.
  • विविध प्रशिक्षणांची अंमलबजावणी करणे
  • विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अध्ययन शैलीनुसार शिक्षक व विद्यार्थी यांचे करिता अध्ययन – अध्यापन साहित्याची निर्मिती
  • विध्यार्थ्यांचे मुलभुत सर्वेक्षण तसेच विविध चाचण्या. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) राज्य संपादणूक सर्वेक्षण यांनी अंमलबजावणी करणे. त्यातील निकालांचे जिल्हानिहाय व गटनिहाय विश्लेषण करून दर्जा उंचावण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करणे. इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती यांचे भाषांतर करून सर्व स्तरांवर क्षेत्रीय अधिकारी व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता, साधन व्यक्ती यांचे सक्षमीकरण करणे.
  • मुख्यध्यापक, शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचेसाठी जाणीव जागृती करणारे प्रशिक्षण विकसित करणे.
  • विद्याविषयक क्षेत्रनिहाय गरज ओळखून शिक्षकांना मदत करणे
  • या अभियानाच्या सनियंत्रण व मूल्यमापनासाठी समग्र शिक्षा कार्यालयाशी समन्वय ठेवणे.
  • अध्ययन निष्पत्तीशी सुसंगत विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध व प्रसारित शैक्षणिक साहित्य, हस्तपुस्तिका, गृहकार्याचे नियोजन व ई-साहित्य यांचे विकसन व वितरण करणे.

स्थानिक स्वराज्य संस्था

  • अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करणे व अभियानाचे सनियंत्रण करणे.
  • समग्र शिक्षा समन्वयाने या अभियानाचे जिल्हा स्तरांवर व्यवस्थापन, सनियंत्रण
  • प्रशिक्षण, अध्ययन – अध्यापन सामुग्री यासाठी अंदाज पत्रकिय तरतूद व खर्चाचे व्यवस्थापन
  • शाळा स्तरांवर निधी वितरण व उपयोगिता
  • अभियानाची परिणामकारकता दरमहा तपासून माहितीचे संकलन, विश्लेषण व त्यानुसार कृती कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी
  • वेळोवेळी प्रगतीसाठी आढावा बैठका
  • इयत्ता 1 ली ते 3 री साठी 100 टक्के शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे यांची खात्री करणे
  • यापूर्वी जिल्हा गुणवत्ता कक्ष या शासन निर्णयाने व्यपगत करण्यात येत आहे 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था  

  • शाळा व शिक्षक यांना प्रशिक्षण व विद्याविषयक मदत
  • गट व समूह साधन स्तरांवर शिक्षकांचे प्रशिक्षण व प्रशिक्षणाचा परीणाम तपासणे
  • वर्ग व शाळा भेटीसाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि साधन व्यक्ती यांना व्यावसायीक विकासासाठी प्रशिक्षण व सक्षमीकरण
  • पालक सहभागासाठी जागरुकता निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करणे
  • प्रशिक्षणातून learing loss टाळण्यासाठी नियोजन करणे    
  • अभियांशी संबंधित सर्व घटकांशी समन्वय व सहकार्य करणे
  • यशोगाथांचे संकलन आणि दस्तेवाजीकरण करणे 

गट व साधन स्तर 

  • गट व समूह स्तरांवर अंमलबजावणी
  • या अभियानाच्या यशस्वितेसाठी शिक्षकांना मदत, सनियंत्रण, माहितीचे संकलन करणे
  • विशेष गरजा असलेली व संथ गतीने शिकणारी मुले यांना वैयक्तिक मार्गदर्शन व मदत करणे
  • वर्ग निरक्षण व मार्गदर्शन करणे
  • या अभियानातील यशस्वी ठरलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांचे परस्पर आदान प्रदान करणे 

महिला व बालविकास/एकात्मिक बालविकास योजना

  • अंगणवाडी/बालवाडी सेविका व मदतनीस यांना मदत
  • बालसंगोपन व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान यांची सांगड घालणे
  • शिक्षण विभागाच्या समन्वय या विभागाशी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी/बालवाडी सेविका, एकात्मिक बालविकास योजना पर्यवेक्षक, प्रकाशक पालक इत्यादी मध्ये जागरुकता व सक्षमीकरण यासाठी उपक्रमांचे आयोजन करणे.
  • अंगणवाडी/बालवाडी सेविकांसाठी त्यांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम आयोजित करणे .
  • अंगणवाडी/बालवाडी स्तरांवर मार्गदर्शनपर पुस्तके, अध्ययन-अध्यापन सामुग्री, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने तयार करणे. साहित्याचे अंगणवाडी स्तरांवर वितरण व वापर याची खात्री करणे.

ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समिती 

  • स्थानिक पातळीवर शाळा आणि शिक्षक यांना मदत
  • या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग तसेच वित्त आयोगाच्या तरतुदीतून शाळांना आर्थिक मदत
  • शंभर टक्के पटनोंदणी करणे आणि उपस्थिती कायम राखणे
  • 3-4 मुलांच्या गटामध्ये मोहल्ला /वस्ती स्तरांवर वर्ग घेणे, सहाध्यायींबरोबर अभ्यासास चालना देणे
  • या अभियानाचे महत्व सर्व पालकांना पटवून देणे
  • विद्यार्थी आणि पालकांशी सत्यात्यपूर्ण संवाद, अध्ययनातील प्रगती समजावून घेणे, अभ्यासात मागे राहिलेल्या आणि शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करणे.

निपुण भारत अभियानाविषयी जाणीव आणि जागृती 

निपुण भारत अभियानाच्या अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान संबंधित अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी खालीलप्रमाणे बाबी केल्या जाईल

  • मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानाबाबत माहिती आणि निकालांचा आलेख सर्व शाळा ठळकपणे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करतील.
  • सदर अभियानातून शाळेतील शिक्षणाव्दारे विषयवार व इयत्तावार प्राप्त करावयाची अध्ययन निष्पत्ती शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना अवगत केल्या जातील.
  • राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून शाळा, शिक्षक व पालक यांचेकरिता भित्तीपत्रके, पत्रे, समाजिक माध्यम संदेश, आकाशवाणी व दूरदर्शन वरील भाषणे इत्यादी संपर्क सामग्री तयार करून प्रसारित करेल
  • मुलांना घरी शिकण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित सोपी सामुग्री, गमतीदार अशा कृती व कृतीपुस्तिका उपलब्ध करण्यात येतील.
  • निपुण भारत अभियान हि एक लोकचळवळ होण्यासाठी वेळोवेळी ग्राम जागरुकता बैठक/सभा, शालेय मेळा, पुस्तक जत्रा, वाचनाचे कार्यक्रम, गोष्टींचा मेळा, गणित मेळा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये ग्रामपंचायत/शाळा व्यवस्थापन समिती यांची भूमिका महत्वाची असेल.

SCERT आणि DIET व्दारे शैक्षणिक समर्थन 

FLN मिशन अंतर्गत, शिक्षक प्रशिक्षण मॉड्युल विकसित करण्याची जबाबदारी SCERT व्दारे घेतली जाईल. याशिवाय सर्व शिक्षक प्रशिक्षण मॉड्युल स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिले जाईल. इयत्ता 1 ली ते 5 वी साठी इतर काही शैक्षणिक साहित्य दिले जाईल जे मुलांना आनंददायक असेल. दुसरीकडे, प्रत्येक DIET एक शैक्षणिक संसाधन पूल विकसित करेल ज्यामध्ये शिक्षक, जिल्हा शिक्षण नियोजन आणि विद्यापीठांच्या शिक्षण विभागातील प्राध्यापक असतील. या योजनेंतर्गत इतर अनेक पावले उचलली जातील ज्याद्वारे शैक्षणिक मदत दिली जाईल.

डिजिटल सामुग्री

निपुण भारत योजनेंतर्गत दीक्षा पोर्टल सुरु करण्यात आले आहे, दीक्षा पोर्टल व्दारे ई-सामुग्री उपलब्ध करून दिली जाईल. जे स्थानिक भाषेत असेल. हि ई-सामुग्री शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाहि उपलब्ध असेल. DIKSHA पोर्टलवर उपलब्ध असलेली सामुग्री NCERT व्दारे तयार केली जाईल, शिक्षकांसाठी अनेक प्रकारच्या शिक्षक प्रशिक्षण संस्थाही दीक्षा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील, याप्रमाणे प्रशिक्षण मॉड्युल, प्रशिक्षण सत्रांसाठी सहाय्य, व्हिडीओ, वाचन संसाधने, शिक्षक पुस्तिका इत्यादी दीक्षा प्लॅटफॉर्म अॅपव्दारे देखील ऑ परेट केले जाऊ शकते. शिक्षण विभाग लवकरच गुगल प्ले स्टोर आणि एपल स्टोर वर दीक्षा अॅप्लिकेशन लॉच करणार आहे.

योजना संशोधन, मूल्यमापन आणि दस्तऐवजीकरणाची आवश्यकता 

निपुण भारत योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संशोधन, मूल्यमापन आणि दस्तऐवजीकरण या प्रक्रिया प्रमुख भूमिका बजावणार आहेत, शिक्षण सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे संशोधनाव्दारे कळते. त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी उचलेली पावले कितपत यशस्वी ठरलेली आहे हे मुल्यमापनाव्दारे कळते. तसेच सर्व पुरावे कागदपत्रांवरून नोंदवले जातात. संशोधन, मूल्यमापन, आणि दस्तऐवजीकरण हा निपुण भारत अभियानाचा अविभाज्य भाग आहे, संशोधन, मूल्यमापन राष्ट्रीय, राज्य,जिल्हा, ब्लॉक, आणि शालेय स्तरावर केले जाऊ शकते, ज्यासाठी सक्रीय संशोधन, प्रक्रिया मूल्यमापन, प्रभाव मूल्यमापन इत्यादि सारख्या विविध प्रकारच्या तंत्रांचा वापर केला जाऊ शकतो.

देशात शिक्षण क्षेत्रातील विकास हा राष्ट्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण विकास असतो, त्यामुळे देशातील शिक्षण क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण सुरु केले आहे, या नवीन शिक्षणिक धोरणांतर्ग शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारत सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. जेणेकरून या अभियानाच्या माध्यमातून शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधता यावा, अशा प्रकारे निपुण भारत अभियान आपल्या शाळा, शिक्षक, आणि समुदाय तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येक संभाव्य मार्गाने मुलांची खरी क्षमता साध्य करण्यासाठी आणि राष्ट्राला नवीन उंची गाठण्यासाठी मदत आणि प्रोत्साहित करेल. वाचक मित्रहो, निपुण भारत योजना 2022 या योजने संबंधित आपण संपूर्ण माहिती पाहीली आहे. हि पोस्ट आपल्याला उपयुक्त वाटली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता.

  1. निपुण भारत मिशन काय आहे ?

निपुण भारत मिशन या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे कि देशातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे जेणेकरून त्यांना पुढील भविष्यात स्वतः च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होऊन, आयुष्यात प्रगतीचे शिखर गाठणे शक्य होईल, या योजनेच्या अंतर्गत 2026 ते 2027 पर्यंत विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरीच्या अखेरीस वाचन, लेखन आणि सामन्य अंकगणित समजण्याची क्षमता मिळेल, मुलांच्या विकासाच्या दृष्टीने निपुण भारत योजना अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.

  1. निपुण भारत योजनेची उद्दिष्ट्ये काय आहे ?

शिक्षण मंत्री श्री पोखारीयाल यांनी या योजनेच्या संबंधित माहिती दिली कि या योजनेचे मुख्य उद्देश्य म्हणजे देशातील 3 ते 9 वयोगटातील मुलांच्या शिक्षणा संबंधित संपूर्ण गरजा या निपुण भारत योजनेच्या माध्यमातून पूर्ण करणे, तसेच मुलभूत  भाषेच्या विकासासाठी शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या साक्षरता आणि संख्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पुढील जीवनात त्यांना चांगले वाचक आणि लेखक बनण्यास मदत होईल. त्याचबरोबर मुलांना डिजिटल शिक्षणही दिले जाईल.

  1. निपुण भारत योजनेचे मुख्य घटक काय आहे ?

या योजनेचे मुख्य घटक खालीलप्रमाणे आहे, मुलभूत साक्षरता आणि मौखिक भाषा आणि मुलभूत अंकगणितचे ज्ञान, लेखन आणि वाचनाचा विकास, आकार आणि स्थानिक समज, मोजमाप, नमुना, नंबर आणि नंबर ऑपरेशन, वाचन आकलन, मुद्रण संकल्पना, शब्दकोश, डिकोडिंग, वाचन संस्कृती हे या निपुण भारत अभियानाचे मुख्य घटक आहे.

  1. निपुण भारत योजना केव्हा सुरु करण्यात आली ?

देशातील शिक्षण क्षेत्राचा संपूर्णपणे विकास करण्यासाठी भारत सरकार कडून हि योजना संपूर्ण देशात राबविण्यात आली आहे, या योजनेमध्ये मुलांचे प्राथमिक शिक्षण, तसेच अध्ययन आणि अध्यापन आणि शिक्षणा संबंधित साहित्य यांचा विविध घटकांच्या अंतर्गत विकास करण्यात येणार आहे. निपुण भारत योजना भारत सरकार आणि शिक्षण मंत्रालयाने 5 जुलै 2021 रोजी सुरु केली.

  1. निपुण भारत फुल फॉर्म काय आहे ?

हि योजना National Initiative For Proficiency In Reading With Understanding And Numeracy, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी, भारत सरकारची हि तीन ते नव वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना आहे.         

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ