Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सरकारचा मोठा निर्णय!!
Old Pension Scheme 2023!!
जर आपण केंद्र सरकारचेकर्मचारी असाल अथवा आपल्या कुटुंबातील कुणी केंद्रीय कर्मचारी असेल, तर जुन्या पेन्शनसंदर्भात आपल्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. या बातमीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन मिळू लागेल. सरकारने एक मोठे पाऊल उचलत, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवडक समूहाला जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) निवडण्याचा पर्याय दिला आहे. यासंदर्भात कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हणण्यात आले आहे की, 22 डिसेंबर, 2003 पूर्वी अधिसूचित केलेल्या पदांसाठी केंद्रीय सेवांमध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकदा जुन्या पेन्शनचा पर्याय दिला जाईल.

या योजनेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी ईथे क्लिक करा.
कर्मचाऱ्यांकडे 31 ऑगस्टपर्यंतचा वेळ :-
22 डिसेंबर, 2003 पासूनच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अधिसूचित करण्यात आली होती. असे कर्मचारी केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1972 (आता 2021) अंतर्गत जुन्या पेन्शनसाठी पात्र आहेत. या पर्यायाच्या माध्यमाने ओपीएस निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे 31 ऑगस्ट पर्यंतचा वेळ आहे
हा आदेश केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) कर्मचारी आणि अशा इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. जे 2004 मध्ये सेवेत रुजू झाले होते. कारण, भर्ती प्रक्रियेत प्रशासकीय कारणांमुळे उशीर झाला होता.
सरकारवरील अनावश्यक आर्थिक तारण वाढेल :-
सरकारच्या या निर्मयानंतर, कर्मचाऱ्यांचे एनपीएसमधील योगदार सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) मध्ये जमा केला जाईल. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडून सांगण्यात आले आहे की, जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू केल्यानंतर सरकारवरील अनावश्यक आर्थिक ताण वाढेल. यापूर्वी छत्तीसगड, राजस्थान, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेस शासित राज्यांनी यापूर्वीच ओपीएस लागू करण्याची घोषणा केली आहे.
महत्वाचे म्हणाजे, पात्र कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पर्याय निवडता येईल, असे सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. मात्र अखेरच्या तारखेपर्यंत अर्थात 31 ऑगस्टपर्यंत ही निवड केली गेली नाही, तर उरलेल्या कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत कायम राहतील. तसेच एकदा वापरलेला पर्याय अंतिम असेल, असेही या आदेशात म्हणण्यात आले आहे.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.