डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2023: MahaDBT ऑनलाइन अर्ज, पात्रता, कागदपत्र

0
45
Panjabrao Deshmukh Scholarship
Panjabrao Deshmukh Scholarship

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2023: MahaDBT ऑनलाइन अर्ज, पात्रता, कागदपत्र

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2023  Apply Online | डॉ. पंजाबराव देशमुख होस्टेल मेंटेनन्स अलाउंस | Maharashtra Dr. Panjabrao Deshmukh Hostel Maintenace Allowance Scheme 2023 Application Online at MahaDBT Portal | Maharashtra Sarkari Yojana 2023 | सरकारी योजना | Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana 2023 Apply Online

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2023:महाराष्ट्र शासन राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कामगार तसेच शेतमजूर आणि ग्रामीण भागामधील व शहरी भागामधील गरीब समान्य नागरीकांसाठी, अल्पभूधारक शेतकरी आणि आदिवासी नागरिक यांच्यासाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवीत असते, या योजनांव्दारे सरकार नागरीकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे त्याचबरोबर त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करणे, त्यांचे जीवनमान उंचावणे तसेच त्यात सुधारणा करणे तसेच या योजनांमधून अशा नागरिकांसाठी आरोग्य सुविधेचा निर्माण करणे असा या योजनांमधून शासनाचा उद्देश असत, याच धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्र शासनाने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच ग्रामीण भागामधील अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत मजूर अशा सर्व नागरिकांच्या गुणवंत विद्यार्थी मुलांसाठी ज्यांचा उद्देश पुढे शिकण्याचा आणि पुढे व्यावसायिक शक्षण घेऊन उच्च शिक्षित होण्याचा आणि आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न करण्याचा उद्देश आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शिक्षण अबाधित पूर्ण व्हावे त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करतांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनाव्दारे त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे ठरविले आहे त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2023 राज्यामध्ये राबविण्यात आली आहे. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण पाहणार आहोत डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती जसे कि या योजनेला लागणारी कागदपत्रे, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी पात्रता, योजनेमध्ये मिळणारा निर्वाह भत्ता त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि कुठे करावा अशा प्रकारची या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.Panjabrao Deshmukh Scholarship

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी

ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी किंवा शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नोंदणीकृत कामगार, मजूर यांच्या प्रतिभावान आणि गुणवंत विद्यार्थी मुलांना नेहमीच शिक्षण घेतांना त्यांच्या कमी उत्पन्न असण्याचा तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असण्याचा त्रास होतो, त्यामुळे बहुतेकवेळा त्यांना उच्च शिक्षणाला मुकावे लागते, आर्थिक अडचणीमुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत नाहि वाईट आर्थिक परिस्थितीमुळे प्रतिभावान व गुणवान असून सुद्धा त्यांना उच्च शिक्षण सोडून द्यावे लागते, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो शहरामध्ये वास्तव्याचा, काही व्यावसायिक महाविद्यालयात वसतिगृहची सुविधा उपलब्ध असते तर काही ठिकाणी विद्यार्थ्याना जागा भाड्याने घेऊन राहावे लागते.अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगार ज्यांच्या मुलांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाला शासकीय महाविद्यालयात किंवा तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अत्यंत मोलाची ठरणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शासकीय, शासन अनुदानित आणि विनानुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा तंत्रनिकेतन महाविद्यालयात अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता मिळेल, या योजनेच्या अंतर्गत महानगरात जसे मुंबई महानगर, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना तीन हजार रुपये ( 30,000/- रुपये दहा महिन्यासाठी) तसेच या शहरांव्यतिरिक्त दुसऱ्या शहरांमध्ये अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये दरमहिन्याला (20,000/- रुपये दहा महिन्यासाठी) वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यात येईल.Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2023

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना वैशिष्ट्ये (features)

महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या अतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राबविली जाते या योजनेच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांना शिष्यवृत्ती दिली जाते, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी अशासकीय अनुदानित / अंशत अनुदानित किंवा विना अनुदानित / कायम विना अनुदानित महाविद्यालये आणि बिगर कृषी विद्यापीठे आणि उपकेंद्रे (खाजगी विद्यापीठे वगळून / स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठे या शिष्यवृत्तीस पात्र आहे

महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतन महाविद्यालयात शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्र्मांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे दोन्ही पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांकारिता डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता विस्तारित योजनेला वर्ष 2018 पासून लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे 1 लाख रुपये ते 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांकारिता प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या 500 ठेवण्यात आली आहे, हि शासनाच्या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे राहील. तसेच राज्यात विविध मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता विविध वसतिगृहाच्या योजना राबविण्यात येत आहे. तथापि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता कोणतीही वसतिगृहाची योजना राबविण्यात येत नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची जागेअभावी गैरसोय होऊ नये, त्यांना शिक्षण पूर्ण करण्यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाने निर्णय घेऊन हि योजना सुरु केली आहे.Panjabrao Deshmukh Scholarship

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजना अंतर्गत निर्वाह भत्ता (लाभ)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च शिक्षण संचलनालयाच्या अंतर्गत राज्याच्या गुणवान आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी काही आर्थिक सहाय्य व शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात त्यापैकी हि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारा निर्वाह भत्ता पुढीलप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार राही.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2023 महाराष्ट्र, या योजनेंतर्गत राज्यात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार आहेत अशा विद्यार्थ्यांना महानगरासाठी निर्वाह भत्ता 3000/-रुपये दर महिन्याला या दराने जास्तीत जास्त 10 महिन्यांसाठी देय राहील, तसेच इतर शहरांसाठी 2000/- रुपये दर महिन्याला या दराने जास्तीत जास्त 10 महिन्यांसाठी निर्वाह भत्ता देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

तसेच या योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु अशा कुटुंबातील विद्यार्थी ज्या कुटुंबातील दोन्ही पालकांचे एकूण उत्पन्न 1 लाख किंवा त्या पेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शेक्षणिक वर्षातील 10 महिन्याकरिता 10,000/- रुपये इतका निर्वाह भत्ता देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांचे पालक जर अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार नाहीत, परंतु त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील दोन्ही पालकांचे उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना महानगर क्षेत्रासाठी 10,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि इतर शहरी क्षेत्रांसाठी व ग्रामीणभागांसाठी 8000/- रुपये 10 महिन्यांसाठी या प्रमाणे वसतिगृह निर्वाह भत्ता देय राहील.Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2023

योजनेच्या लाभाचे स्वरूप 

व्यावसायिक अभ्यासक्रम :- 

या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार यांच्या विद्यार्थी मुलांसाठी MMRDA / PMRDA / औरंगाबाद शहर किंवा नागपूर शहरामधील शिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 3000/- रुपये प्रतिमहिना असे 30,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि इतर क्षेत्रातील शिक्षण संस्थेमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2000/- रुपये प्रतीमहीना असे 20,000/- रुपये 10 महिन्यांसाठी (अमर्यादित कोटा)

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी MMRDA / PMRDA / औरंगाबाद शहर किंवा नागपूर शहरातील शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील शिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 8,000/- रुपये 10 महिन्यांसाठ (अमर्यादित कोटा)

योजनेंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख ते 8 लाख पर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी MMRDA / PMRDA / औरंगाबाद / नागपूर शहरातील शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि तसेच इतर क्षेत्रातील शिक्षण संस्थेमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 8000/- रुपये 10 महिन्यांसाठी (या मध्ये प्रती जिल्हा कोटा 500 ) प्राप्त झालेल्या अर्जाच्या संखेवरून प्रती जिल्हा कोट्याचे वाटप ठरवले जाते. या योजनेंतर्गत 33 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत, आणि जागा पूर्ण भरल्या गेल्या नसल्यास त्या जागा मुलांकडे वळविल्या जातील.

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here