Panjabrao Deshmukh Scholarship| डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2023 मराठी: MahaDBT ऑनलाइन अर्ज, पात्रता, कागदपत्र

0
87
Panjabrao Deshmukh Scholarship
Panjabrao Deshmukh Scholarship

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2023 मराठी: MahaDBT ऑनलाइन अर्ज, पात्रता, कागदपत्र

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम :- 

ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये पेक्षा जास्त नाही अशा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2000/- 10 महिन्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता असेल Panjabrao Deshmukh Scholarship

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना Key Highlights

योजनेचे नावडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
अंतर्गत सुरुवातमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीअल्प भूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत कामगार कुटुंबातील विद्यार्थी
उद्देश्यप्रतिभावान व गुणवंत ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांचे शक्षण पूर्ण करता यावे यासाठी आर्थिक सहाय्य
अधिकृत वेबसाईटhttps://mahadbtmahait.gov.in
आर्थिक सहाय्यदरमहा 3000/- रुपये पर्यंत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
श्रेणीशिष्यवृत्ती योजना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2023 उद्देश

राज्यातील अल्पभूधारक शेतकरी तसेच नोंदणीकृत कामगार त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी बऱ्याच अडचणींना समोर जावे लागते, ग्रामीण भागातील अशा विद्यार्थ्यांना शहरामध्ये व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश घेतल्यानंतर त्यांचे शिक्षण अबाधित पूर्ण व्हावे, आणि प्रतिभावान व गुणवंत ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांचे शक्षण पूर्ण करता यावे आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील अल्पभूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत कामगार त्याचबरोबर ज्यांच्ये उत्पन्न एक लाखापर्यंत आहे असे नागरिक त्यांच्या मुलांना त्यांचे व्यावसायिक उच्च शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राज्यात राबविण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र सरकारचा उद्देश आहे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राज्याच्या प्रत्येक पात्र गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी या साठी शासनाने या योजनेचे वेब आधारित पोर्टल विकसित केले आहे, पात्र विद्यार्थी शासनाच्या आपले सरकार महाDBT या पोर्टवर जाऊन योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात, या योजनेच्या अंतर्गत मिळणारि आर्थिक सहाय्याची रक्कम / शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.

  • शासनाचा उद्देश आहे ग्रामीण भागामधील कृषी पार्श्वभूमीवर असलेल्या कमी उत्पन्न गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे जेणेकरून त्यांना आयुष्यात मोठी उंची गाठता यावी
  • उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन शिक्षण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर संघर्ष करतांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
  • तसेच शासनाचा उद्देश आहे ग्रामीण भागातील कृषी आधारित कुटुंबामधील मुलांना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षांबद्दल जागरुकता निर्माण करणे Panjabrao Deshmukh Scholarship

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आवशयक पात्रता

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरवातीला केवळ राज्यातील कृषी आधारित गरीब परिवारातील विद्यार्थी मुलांवर केंद्रित होती, त्यानंतर शासनाने या योजनेचा विस्तार करून हि योजना समाजातील सर्व आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी मुलांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काही पात्रता निकष आहेत, पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.

  • या योजनेंतर्गत अर्जदार विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे, योजनेसाठी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी या सबंधित कागदपत्र जसे कामगार नोंदणी प्रमाणपत्र, जमीन नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील
  • या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये ते 8 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे, अर्ज करतांना कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्नाचे अधिकृत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे  
  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे, तसे रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
  • या योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयाप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे तेच विद्यार्थी या योजनेसाठी / शिष्यवृत्ती अनुदान साठी पात्र असतील.
  • शासन निर्णयाप्रमाणे या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील दोन मुले या वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदानासाठी अर्ज करू शकतात
  • असा विद्यार्थी ज्याला अन्य कोणत्याही दुसऱ्या निर्वाह भत्ता योजनेंतर्गत निर्वाह भत्ता मिळत असेल तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही
  • एखादा विद्यार्थ्याने सामान्य रहिवासी असलेल्या त्याच्या गावातील किंवा शहरातील शिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्या विद्यार्थ्याला हा वसतिगृह निर्वाह भत्ता देय राहणार नाही
  • या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठीच हा वसतिगृह निर्वाह भत्ता देय असणार आहे, जर एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा काही कारणांमुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश न मिळाल्यास त्या विद्यार्थ्यास वसतिगृह निर्वाह भत्ता त्या वर्षापुरता देय राहणार नाही
  • या योजनेमध्ये 1 लाख रुपयाच्या आत कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदान देण्यासाठी संख्रची कोणतीही मर्यादा राहणार नाही, तसेच परंतू 1 लाख ते 8 लाख पर्यंत कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे लाभार्थी विद्यार्थ्यांची कमाल संख्या 500 इतकी शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे, त्यापैकी 33 टक्के जागा विद्यार्थांनीकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहे, त्यापैकी पूर्ण जागा न भरल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणल्या जाईल
  • या योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार जे विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यामधून व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवितात त्याचप्रमाणे जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाला खाजगी अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना हा वसतिगृह निर्वाह भत्ता लागू राहणार नाही
  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेच्या अंतर्गत महानगरासाठी या प्रमाणे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे प्रती विद्यार्थी दरवर्षी प्रमाणे 10,000/- रुपये आणि ग्रामीणभागासाठी प्रती विद्यार्थी प्रतीवर्षी 8,000/- रुपये इतका वसतिगृह निर्वाह भत्ता देय राहील
  • एखाद्या विद्यार्थ्याने शासकीय / निमशासकीय किंवा खाजगी वसतिगृहांमध्ये प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्यांनी त्या विषयीचा योग्य पुरावा सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याने जर स्वतःची राहण्याची व्यवस्था खजगी मालकीच्या घरामध्ये केली असेल तर अशा विद्यार्थाला नोंदणीकृत किंवा नोटराईज्ड भाडे कराराची प्रत सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक राहील
  • या योजनेच्या अंतर्गत लाभाच्या पात्रतेसाठी इतर अटी आणि शर्ती तसेच वसतिगृह निर्वाह भत्त्याच्या वितरणाची कार्यपद्धती शासनाचे निर्णय आणि उच्च तंत्रशिक्षण विभागने निर्धारित केल्या प्रमाणे राहील
  • या योजनेंतर्गत वसतिगृहात राहण्यासाठी विद्यार्थ्याच्या इच्छेला प्रधान्य देण्यात यावे, म्हणजेच ज्या पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहण्याची इच्छा नाही अशा वद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या निर्वाहभत्ता देण्यात यावा व निर्वाहभत्त्याची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात प्रत्यक्ष DBT व्दारे थेट जमा करण्यात यावी
  • राज्यामध्ये अंमलात असलेली राजश्री शाहूमहाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेमध्ये पात्र असलेले विद्यार्थी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत म्हणजेच ते विद्यार्थी वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदान मिळविण्यास पात्र आहेत
  • राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थी संख्येचा कोटा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निश्चित करण्यात येतो
  • या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमामध्ये दोन वर्षाची गॅप घेऊन पुढील अभ्यासक्रम करत आहे ते विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
  • या योजनेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी सामान्य श्रेणीतून त्याचप्रमाणे SEBC श्रेणी अंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षात त्यांची उपस्थिती 50 टक्के किंवा त्याहून अधिक असल्याची खात्री करून द्यावी लागेल  

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आवश्यक कागदपत्र

  • पात्र अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार असेल अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि अल्पभूधारक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना कुटुंबाच्या एकूण वार्षिक उत्पन्नाचा दाखला, सबंधित तहसीलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांनी CAP प्रणालीतून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल त्या विद्यार्थ्यांनी CAP सबंधित कागदपत्र अर्ज करतांना सादर करणे आवश्यक राहील.
  • या योजनेंतर्गत प्रत्येक घरातील दोन विद्यार्थी मुले या वसतिगृह निर्वाह अनुदानास पात्र आहे तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांना खाजगी वसतिगृहत राहत असल्यास किंवा खाजगी मालकीच्या घरात भाड्याने राहत असल्यास तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • गॅप असल्यास गॅप सबंधित कागदपत्र सादर करावे .Panjabrao Deshmukh Scholarship

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना Mahadbt ऑनलाइन अर्ज 

वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदान योजनेचा लाभ ज्या पात्र विद्यार्थ्यांना मिळवायचा असेल त्यांना सर्व प्रथम शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल, या योजनेच्या अंतर्गत अर्ज आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे राहील

  • या योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
  • वेबसाईटवर भेट दिल्यावर तुमच्यासमोर होम पेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला New Registration हा पर्याय निवडावा लागेल
  • आता या नंतर तुमची नोंदणी आधार कार्डव्दारे करा, यानंतर अर्जदाराला ‘’तुमच्याकडे आधार क्रमांक आहे काय’’ या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, या प्रश्नाच्या खाली तुम्हाला दोन पर्याय दिसतील
  • यानंतर अर्जदाराने होय या पर्याय निवडून क्लिक करावे, आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल
  • त्यानंतर तुम्हाला ऑथेंटीकेशन प्रकार निवडावा लागेल, ऑथेंटीकेशन करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधारकार्ड बरोबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, तुमचा मोबाइल नंबर आधार कार्ड बरोबर नोंदणीकृत असेल तर OTP निवडा आणि मोबाइल नंबर आधार कार्ड बरोबर सलग्न नसेल तर बायोमेट्रिक पद्धत निवडा
  • तुम्हाला तुमची सर्व माहिती पोर्टलवर प्रविष्ट करावी लागेल यासाठी घोषणा बॉक्सवर क्लिक करा, यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक OTP प्राप्त होईल
  • तुम्हाला प्राप्त झालेला OTP नोंदणी फॉर्म मध्ये प्रविष्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला सुरु ठेवा बटनावर क्लिक करावे लागेल
  • यानंतर तुम्हाला तुमचे युजरनेम प्रविष्ट करावे लागेल आणि त्यानंतर पासवर्ड तयार करावा लागेल आता पासवर्डची पुष्टी करून तुम्हाला कॅप्चा कोड भरून नोंदणी बटनावर क्लिक करा
  • अशा प्रकारे पूर्ण प्रक्रिया केल्यावर तुमची या पोर्टलवर नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण होईल, आणि या पोर्टवर तुमचे नवीन प्रोफाईल तयार होईल
  • शासनाच्या या पोर्टलवर नोंदणी झाल्यावर तुम्ही कोणत्याही योजनेविषयी माहिती मिळवून योजनेसाठी अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला पोर्टलवर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागे, पोर्टवर जाऊन तुम्हाला तुमचे प्रोफाईल कधीही अपडेट करता येईल.
  • आता यानंतर तुम्ही प्रत्यक्ष अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करू शकता, यासाठी नोंदणीकृत अर्जदाराला ‘’अर्जदार लॉगिन’’ वर क्लिक करावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
  • या नवीन पेजवर तुम्हाला लॉगिन विभाग दिसेल, यामध्ये तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल आता तुम्हाला कॅप्चा कोड प्रविष्ट करून हि प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, यानंतर तुम्हाला ‘’Login Here’’ या बटनावर क्लिक करणे आवशयक आहे
  • पोर्टवर अधिकृतपणे लॉगिन झाल्यावर तुम्हाला ‘’योजना माहिती’’ या पर्यायावर क्लिक करून पुढे विभाग या पर्यायावर क्लिक करावे, यानंतर तुम्हाला ‘’उच्च आणि तांत्रिक शिक्षण’’ या पर्याय दिसेल यावर क्लिक करा
  • हि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्यासमोर शिष्यवृत्ती योजनांची लिस्ट उघडेल यातील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करून, अर्जदाराला डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेमध्ये प्रविष्ट होता येईल, आता योजन पाहण्यासाठी ‘’पहा’’ या बटनावर क्लिक करा
  • तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल यामध्ये तुम्हाला ‘’अर्ज करा’’ हा पर्याय दिसेल या पायायाव्र क्लिक करा, यानंतर ‘’अर्ज तपशील’’ विभागामध्ये अर्जदाराला स्वतः बद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती भरावी लागेल
  • त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र जसे की कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र इत्यादी माहिती अपलोड करावी लागेल, यानंतर तुम्हाला तुमचा घराचा कायमचा पत्ता भरून ‘’सेव्ह आणि नेक्स्ट’’ वर क्लिक करा आणि पुढील भागात जावे
  • हा अर्जाचा पुढील विभाग अभ्यासक्रम आणि शिक्षणा सबंधित आहे या विभागामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती भरणे आवशयक आहे. यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना FAQ

Q. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे ?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल आणि कृषी पार्श्वभूमी असलेल्या गरीब नागरिकांच्या विद्यार्थी मुलांना ग्रामीण भागातून येऊन, वसतिगृहात राहून त्यांचे व्यावसायिक उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्कासाठी आर्थिक मदत दिली जाते.

Q. डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती मध्ये किती रक्कम मिळते ?

शासनाच्या निर्णयानुसार या योजनेचे आर्थिक पात्रता निकष आहेत याबद्दल संपूर्ण माहिती वरील लेखामध्ये दिल्यागेली आहे, जसे अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत मजूर आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार शिष्यवृत्ती लागू होते

Q. अभ्यासक्रमामध्ये 2 वर्षाची गॅप असल्यास आपण डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज करू शकतो काय ?

या योजनेंतर्गत जर अभ्यासक्रमामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाचे अंतर असल्यास डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ मिळत नाही  

Q. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अंतर्गत बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना किती शिष्यवृत्ती मिळते ?

या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे एकूण कौटुंबिक उत्पन्न एक लाख रुपया पर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांना बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 2000/- रुपये 10 महिन्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यात येतो.

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना 2023
महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here