PCMC Admit Card Download 2023 | PCMC प्रवेशपत्र- हॉलतिकीट उपलब्ध झाले, डाउनलोड करा!

0
23
PCMC Admit Card Download 2023
PCMC Admit Card Download 2023

PCMC Admit Card Download 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ नुसार अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २६/०५/२०२३, दिनांक २७/०५/२०२३ व दिनांक २८-०५-२०२३ रोजी तीन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. तथापि दिनांक २८/०५/२०२३ रोजी संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरिक्षा आहे. त्यामुळे काही उमेदवारांना दिनांक २८-०५-२०२३ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची परिक्षा देणे शक्य होणार नाही, त्यामुळे दिनांक २८-०५-२०२३ रोजीची परिक्षा पर्यायी दिवशी देणेची सुविधा उपलब्ध करुन देणे मनपाच्या विचाराधीन आहे, तरी या जाहिर प्रकटनाद्वारे उमेदवारांना कळविण्यात येत आहे की, ज्या उमेदवारांची संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरिक्षा आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या recruitment@ pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२-०५-२०२३ रोजी सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरिक्षा प्रवेशपत्राच्या (Hall Ticket) प्रतीसह लेखी विनंती अर्ज करण्याचे आवाहन या जाहिर प्रकटनाद्वारे करण्यात येत आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

 राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील १६ पदांच्या ३८७ जागांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीख ठरली असून, मे महिन्यामध्ये २६, २७ व २८ तारखेला ही परीक्षा होणार आहे. संपूर्ण माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ही परीक्षा कोणत्या केंद्रांवर होणार याबाबत उमेदवारांना १२ मे पासून समजेल. ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी पालिका वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत आहे. राज्य सरकारने जून महिन्यामध्ये नोकर भरतीवरील निर्बंध उठवले. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी वैद्यकीय विभागातील स्टाफ नर्स, एएनएमसह इतर तांत्रिक अशा १३१ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, नर्स भरती प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील ३८७ रिक्त जागांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

उमेदवारांना १२ मे पासून परीक्षेसाठी हॉल तिकीट संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. त्यामध्ये उमेदवारांना केंद्राबाबतची माहिती मिळेल. तसेच ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. त्यामध्ये १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ याप्रमाणे २०० गुण असतील. परीक्षेसाठी १२० मिनिटांचा कालावधी असेल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४ / २०२२ नुसार अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत आले होते. ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची दिनांक २६/०५/२०२३ दिनांक २७/०५/२०२३ व दिनांक २८/०५/२०२३ रोजी तीन सत्रात ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) उमेदवारांना दिनांक १२/०५/२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

PCMC Bharti Helpline Number

ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करण्याबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत Hepldesk Number +91 7353293111 संपर्क साधावा. या क्रमांकावर तसेच Helpdesk Email – pcmchelpdesk2022@gmail.com या ई-मेलवर
ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे. संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली, इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्रिशियन, फार्मासिस्ट व ए.एन.एम. अभिनामाची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी, वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. उपरोक्त पदांकरीता शनिवार दिनांक २५/०६/२०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये सकाळी ९.०० ते १०.३० व दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) उमेदवारांना दिनांक ११/०६/२०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोडबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत फक्त Help Line Contact number +91 7353293111 (Toll number) या क्रमांकावर तसेच helpdesk.pcmcrecruitment@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन घेणे,परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे. संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली,इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

प्रवेशपत्र डाउनलोड  करण्यासाठी येथे क्लिक करा

Download Admit Cards 

 

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

 

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ