शेकडेवारी – Percentage
शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी पद्धती होय. यात आपल्याला त्या संख्येचे विभाजन हे टक्क्यांमध्ये करायचे असते.
पट पद्धतीने टक्केवारी काढणे
दिलेल्या संख्येचा 1% आणि 10% काढून घ्यावेत. त्यानंतर पट पद्धतीने आपण सहज टक्के काढता येतात.
- उदा: 400 चे 10% = 40 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करावा)
- 225 चे 10% हे 22.5 असतात. म्हणजे इथे एकक स्थानी 0 नसल्यास एक स्थळानंतर दशांश चिन्ह द्यावे.
- 400 चे 30% = 120
- 400 चे 10% हे 40 असतात
- 30% = 10% × 3
- त्यामुळे =40×3 = 120
- आता 400 चे 1% काढायचे आहेत. शेवटी शून्य असेल तर ते 2 शून्य काढावेत किंवा 0 नसतील तर दोन स्थानानंतर दशांश चिन्ह द्यावे.
- म्हणजे 225 चे 1 % हे 2.25 होतात
- आता 400 चे 8% काढताना 4×8 = 32 होतात.
संख्येचा 12.5% काढणे
कोणत्याही संख्येचा 12.5 % आपल्याला काढायचे असतील तेव्हा त्या संख्येला ⅛ ने गुणायचे आहे.
- उदा: 376 चे 12.5% किती?
- 376 × 12.5/100
- = 376 × ⅛
- = 47
संख्येचा 20% काढणे
कोणत्याही संख्येचा 20% आपल्याला काढायचे आहेत तेव्हा आपल्याला त्या संख्येला ⅕ ने किंवा 0.2 ने गुणायचे आहे.
- उदा : 225 चे 20% ?
- 225 × 20/ 100
- = 225 × ⅕
- = 45
संख्येचे 25% काढणे
कोणत्याही संख्येचा 25% आपल्याला काढायचे आहेत तेव्हा आपल्याला ¼ ने किंवा 0.25 ने गुणायचे आहे.
- उदा: 44 चे 25% ?
- 44 × 25/100
- = 44 × ¼
- = 11
संख्येचे 37.5% काढणे
संख्येच्या 37.5% किंवा 37 ½ % काढण्यासाठी त्या संख्येला आपल्याला ⅜ ने गुणायचे आहे.
- उदा : 123 चे 37.5% ?
- 123 × 37.5/100
- = 123 × ⅜
- = 46.125
संख्येचे 50% काढणे
दिलेल्या संख्येचे 50% काढण्यासाठी आपल्याला त्या संख्येला ½ ने किंवा 0.5 ने गुणायचे आहे.
- उदा : 90 चे 50% ?
- 90 × 50/100
- = 90 × ½
- = 45
संख्येचे 62 ½ % किंवा 62.5% काढणे
दिलेल्या संख्येचे 62 ½% किंवा 62.5% काढायचे असल्यास त्या संख्येला ⅝ ने गुणायचे आहे.
- उदा : 400 चे 62.5% काढणे
- 400 × 62.5/ 100
- = 400 × ⅝
- = 250
संख्येचे 75% काढणे
दिलेल्या संख्येचे 75% काढायचे असल्यास आपल्याला त्या संख्येला ¾ ने गुणायचे आहे.
- उदा : 188 चे 75% काढणे
- 188 ×75 /100
- = 188 × ¾
- = 141
संख्येचे 87 ½ % किंवा 87.5% काढणे
दिलेल्या संख्येचे 87 ½ % किंवा 87.5% काढण्यासाठी आपल्याला त्या संख्येला ⅞ ने गुणायचे आहे.
- उदा: 88 चे 87.5% काढणे
- 88 × 87.5/100
- = 88 × ⅞
- = 77
X चे X% काढणे
कोणत्याही संख्येचे त्याच संख्ये इतके टक्के काढायचे असल्यास त्या संख्येला त्याच संख्येने गुणून म्हणजे वर्ग करून, येणाऱ्या संख्येत दोन दशांश स्थळा नंतर दशांश चिन्ह द्यावे.
- उदा : 20 चे 20% काढणे
- 20 × 20/100
- = 400/100
- = 4.00
स्पर्धा परीक्षेतील प्रश्नांमधून समजून घेऊयात
उदा : 1200 पैकी 144 म्हणजे किती टक्के?
- 12%
- 6%
- 5%
- 4%
उत्तर : 12%
इथे टक्के (%) = 144 × 100/1200
= 12
उदा : X चे 7% हे 63 आहेत तर X= ?
- 600
- 900
- 500
- 1400
उत्तर : 900
इथे आपण X × 7/100 = 63 घेऊयात
त्यामुळे X = 63 × 100/7
= 900
उदा : 150 चे 40% = X चे 8% तर X=?
- 600
- 900
- 750
- 850
उत्तर : 7500
जर 150 × 40/100 = X × 8/100
:: 150 × 40 = X × 8
:: X = 150 × 40/ 8
= 150 × 5
= 750
जर तोंडी काढायचे असेल तर आपल्याला लक्षात येईल की 8 ची 5 पट 40 होते तर मग 150 चे पाच पट आपल्याला 750 मिळतील.
उदा: अ ला ब पेक्षा 10% गुण जास्त मिळाले, तर ब ला अ पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले?
- 10%
- 9%
- 9 1/11%
- 11 1/11%
उत्तर : 9 1/11%
यात ब ला अ पेक्षा टक्के कमी गुण = 100× टक्के / 100 + टक्के
= 100 × 10 / 100 + 10
= 1000 / 110
= 9 1/11 %
जास्त गुणांसाठी गणिती सूत्र खालील प्रमाणे
ब ला अ पेक्षा टक्के जास्त गुण = 100 × टक्के / 100 – टक्के
उदा : एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. 10 % विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले तर दोन विषयांच्या घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
- 40%
- 30%
- 70%
- 60%
उत्तर : 60%
परिक्षेत नापास झालेले टक्केवारी = गणितात नापास + इंग्रजीत नापास – दोन्ही विषयांत नापास
= 30% + 20% -10%
= 40%
फक्त गणितात नापास विद्यार्थी टक्के = 30 – 10 = 20%
इंग्रजीत नापास असलेले विद्यार्थी टक्के = 20 – 10= 10%
दोन्ही विषयांत मिळून नापास टक्के = 10%
परीक्षेत नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी = 40%
त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 60% असेल.
उदा : एक संख्या 12.5% ने वाढवल्यास 81 होते तर ती संख्या कोणती?
- 70
- 72
- 68.5
- 65
उत्तर : 72
गणितात मानायला खूप महत्व आहे त्यामुळे आपण ती संख्या X होती असे मानू
त्यामुळे
X + (X चे 12.5%) = X + (X⅛ ) = 81
X × 9/8 = 81
म्हणून मग
X = 81 × 8/9
X = 72
उदा : 7/12 चे 6% किती?
- 0.35
- 0.035
- 3.5
- 0.0035
उत्तर : 0.035
(7/12) × (6/100)
= (7/2) × (1/100)
= 0.035
उदा: ⅗% हे अपूर्णांकात कसे लिहायचे?
- 0.6
- 0.006
- 0.06
- 60.0
उत्तर : 0.006
प्रथम आपण ⅗ काढुन घेऊ. आपल्याला हा आकडा 0.6 मिळतो. त्यानंतर याला 100 ने भागले म्हणजे आपल्याला % टक्के मिळतील. म्हणजे मग आपल्याला दोन दशांश सरकावे लागतील. त्यामुळे आपले उत्तर हे 0.006 इतके असेल.
उदा : साखरेची किंमत शे. 30 रुपयांनी वाढली तर मग घरात किती कमी साखर वापरावी जेणेकरून घरातील खर्च वाढणार नाही?
- 2.30%
- 2.60%
- 2.40%
- 2.00%
उत्तर : 2.30%
सूत्र : 100 × टक्के / 100 + टक्के
100 × 30 / 100 + 30
= 300 / 130
= 2.30 %
उदा : एक गावाची लोकसंख्या ही 6,000 आहे. ती दरवर्षी 20% ने वाढते तर 3 वर्षानंतर ती किती होईल?
- 10836
- 10638
- 10386
- 10368
उत्तर : 10368
आपल्याला यात वर्ष, मुद्दल, दर, व्यास, रास हे काढावे लागतील.
वर्ष (n) | मुद्दल (P) | दर (R) | व्याज (I) | रास (A) |
1 | 6,000 | 20% | 1200 | 7200 |
2 | 7200 | 20% | 1440 | 8640 |
3 | 8640 | 20% | 1728 | 10368 |
इथे A = P × (1+R/100)n हे सूत्र वापरून देखील आपण हे गणिती क्रिया करू शकता.