शेतकऱ्यांना आयुष्यभर दरमहा 3,000 रु. पेन्शन मिळणार; अशी करा ऑनलाईन नोंदणी : PMKMY

0
80
PM Kisan Mandhan Yojana in Marathi
PM Kisan Mandhan Yojana in Marathi

शेतकऱ्यांना आयुष्यभर दरमहा 3,000 रु. पेन्शन मिळणार; अशी करा ऑनलाईन नोंदणी : PMKMY

पीएम किसान मानधन योजना पात्रता (Eligibility)

 • अर्जदार शेतकरी हा भारतीय नागरिक असावा.
 • देशातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र धरण्यात येईल.
 • अर्जदार शेतकऱ्यांकडे 2 हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन नसावी.
 • अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष यादरम्यान असावी.
 • योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल निवृत्तीवेतन फक्त कुटुंबातील पती किंवा पत्नीला लागू असेल.
 • जर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर जोडीदार पती किंवा पत्नीला 50% पेन्शन देण्यात येईल.
 • शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांची अपत्य म्हणजेच मुलगा किंवा मुलगी या योजनेसाठी लाभार्थी असणार नाहीत.

PM किसान मानधन योजना कागदपत्रं (Documents)

 • शेतकऱ्यांचा आधारकार्ड
 • आधार सलग्न मोबाईल क्रमांक
 • बँक पासबुक
 • उत्पन्न दाखला
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • ओळखपत्र
 • वयाचा दाखला.

PMKMY अंतर्गत लाभ ?

 • पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत नियमित हप्ते भरल्यास शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षापासून दर महिन्याला 3,000 रु. आयुष्यभर पेन्शन दिलं जातं.
 • हप्त्याची 50 टक्के रक्कम केंद्र शासनाकडून देण्यात येते.
 • खूपच कमी रक्कम भरून शेतकरी आपल्या उतारवयातील भविष्य सुखरूप करू शकतात.
 • दुर्दैवाने अर्जदार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास, मृत्युपश्चात 1,500 रुपयांचा लाभ त्यांच्या वारस पत्नीला देण्यात येईल.

प्रधानमंत्री मानधन योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Online Registration Through CSC)

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यावयाचा असेल त्यांना जवळील संबंधित सीएससी केंद्रामध्ये संपर्क साधावा लागेल. जर शेतकरी सुशिक्षित असतील, तर ते स्वतःहून स्व:नोंदणीसुद्धा करू शकतात.

 • सर्वप्रथम शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रासह जवळील सीएससी केंद्र म्हणजेच लोकसेवा केंद्रात भेट द्यावी लागेल.
 • लोकसेवा केंद्रातील कर्मचाऱ्यामार्फत तुमची कागदपत्र पडताळली जातील. पीएम किसान मानधन योजनेची वेबसाईट जनसेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यामार्फत उघडली जाईल.
 • त्यानंतर तुमची सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून तुम्हाला तुमचा प्रीमियम किती भरावा लागेल, ती माहिती सांगितली जाईल.
 • तुमचा फोटो, सही वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल.
 • अर्ज पूर्ण भरणा झाल्यानंतर सबमिट करून तुम्हाला अर्जाची प्रिंट काढून देण्यात येईल.
 • जनसेवा केंद्राचा जो काही शुल्क असेल, तो तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल.

पीएम मानधन योजना स्व:नोंदणी (Online Self Registration)

 • सर्वप्रथम अर्जदाराला मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 • वेबसाईटवर आल्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक लिंक दिसेल, Click Here to apply now यावरती क्लिक करा.
 • त्यानंतर सेल्फ एनरोलमेंट हा पर्याय निवडून सबमिट करा.
 • पुढे तुम्हाला आवश्यक माहिती विचारण्यात येईल सर्व माहिती काळजीपूर्वक टाकून तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा.
 • माहिती टाकताना तुमचा मोबाईल क्रमांक, युजरनेम पासवर्ड, बँक तपशील इत्यादी माहिती काळजीपूर्वक टाका.
 • संपूर्ण माहिती भरणा झाल्यानंतर शेवटी तुमचा अर्ज सबमिट करा.
 • अर्ज सबमिशन केल्यानंतर, अर्जाची प्रिंट आऊट घ्या भविष्यकाळात याची तुम्हाला गरज पडू शकते.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना संपर्क क्रमांक (Helpline Number)

मित्रांनो, या ठिकाणी आमच्यामार्फत तुम्हाला पीएम किसान मानधन योजनेची संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तर तुम्ही केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या संपर्क क्रमांक, ई-मेल आयडीवरती कॉल करून अधिकची माहिती मिळवू शकता.

PM पेन्शन योजना वेबसाईटयेथे क्लिक करा
हेल्पलाईन नंबर (Helpline Number)1800-3000-3468
ई-मेल आयडी (E-Mail)support@csc.gov.in
विविध सरकारी योजनांसाठीयेथे क्लिक करा

1) पीएम किसान मानधन योजनेत पेन्शन केव्हापासून मिळण्यास सुरुवात होईल ?
वयाच्या 60 वर्षानंतर पीएम किसान मानधन योजनेत शासनाकडून निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल.

2) किसान मानधन योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे ?
किसान मानधन योजनेसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे इतकी आहे.

3)पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती पेन्शन देण्यात येईल ?
वयाच्या 60 वर्षानंतर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 3,000 रुपये दरमहा पेन्शन देण्यात येईल.

4)PM किसान मानधन योजनेसाठी सहभाग कसा नोंदवावा ?
PM किसान मानधन योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी जवळील सीएससी केंद्रामध्ये संपर्क साधा किंवा स्वतःहूनसुद्धा नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

5)PM किसान पेन्शन मानधन योजनांचा लाभ मिळवण्यासाठी काही रक्कम भरावी लागते का ?
हो, तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला प्रीमियम आकारला जातो, त्यानंतरच वयाची 60 ओलांडल्यानंतर पेन्शन सुरू करण्यात येत.

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ