Maharashtra Police Bharti
Maharashtra Police Bharti 2023
मुंबई पोलीस दलात शिपाई पदासाठी पात्र असलेल्या 7076 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी कागदपत्रे, मैदानी चाचणी, आणि लेखी परीक्षेदरम्यानची सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गृह विभागाने मुंबई पोलीस दलात 7076 शिपाई पदासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पोलीस शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. महागाई, बेरोजगारी यामुळे मोठय़ा प्रमाणात राज्यभरातून उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला होता. त्यात डॉक्टर, वकील, मास्टर डिग्री असलेले अनेक उमेदवार होते. 31 जानेवारीपासून मुंबईतील विविध मैदानांत चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. पाच लाख 81 हजार उमेदवारांतून सुमारे 2 लाखांहून अधिक उमेदवार हे मैदानी चाचणीसाठी पात्र झाले होते. मैदानी चाचणीदरम्यान उमेदवार जखमी झाल्याच्या घटना मुंबईत घडल्या होत्या. तसेच काही डमी उमेदवारदेखील मैदानी परीक्षेसाठी आले होते. अशा डमी उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मैदानी परीक्षेनंतर उपलब्ध पदे आणि एकूण उमेदवार यांच्या संख्येनुसार प्रमाण ठरवण्यात आले. त्यानुसार लेखी परीक्षेसाठी 83 हजार 743 उमेदवार हे पात्र झाले. 7 मे रोजी मुंबईतील 215 सेंटरवर लेखी परीक्षा घेण्यात आली. चार ठिकाणी कॉपी, ब्लू टूथ बटणाचा वापर झाल्याने पोलिसांनी गुन्हे नोंद केले होते. लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. पात्र असलेल्या 7076 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. काही उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील सहा हजार ७४० जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवारांचे अर्ज आहेत. अजूनही मैदानीच चाचणी संपलेली नाही. तत्पूर्वी, सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा संपली आहे. चालक पदांचा निकाल देखील जाहीर झाला असून आता काही दिवसांत शिपायांचीही निकाल लागेल. त्यांचे प्रशिक्षण १ जुलैपासून राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांवर सुरु होईल. नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या उमेदवार त्याठिकाणी जातील. तत्पूर्वी, पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता साडेसहा हजारांवरून आठ हजारांपर्यंत वाढवली आहे. त्यात सोलापूर, नाशिकसह इतर पोलिस प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.
महिला पोलिसांना आठ तास ड्यूटी नाही.
कुटुंब आणि नोकरी, अशा दुहेरी भूमिकेतील महिला पोलिस अंमलदारांना आठ तासांची ड्यूटी करण्याचा निर्णय सव्वावर्षापूर्वी झाला. पण, अजूनही निम्म्यापेक्षा जास्त शहर-जिल्ह्यात तो लागू झालेला नाही. त्याला प्रमुख अडथळा म्हणजे अपुरे मनुष्यबळ हेच आहे. राज्यातील बहुतेक शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्या देखील वाढली आहे. गुन्ह्यांची संख्या दरवर्षी सरासरी ९ ते १० टक्क्यांनी वाढत आहे. तरीपण त्यांचे वर्षातील ३६५पैकी दोनशेहून अधिक दिवस बंदोबस्तातच जातात. रिक्तपदांमुळे ताण वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सद्य:स्थितीत ३० टक्क्यांपेक्षा जास्त पोलिस अधिकारी, अंमलदारांना बीपी, शुगरचा त्रास आहे. आता पोलिस भरती झालेले उमेदवार दाखल झाल्यावर थोडा ताण कमी होईल.
मुंबईतील पोलिस भरती होणाऱ्या उमेदवारांचे प्रशिक्षण दुसऱ्या टप्प्यात होईल. तत्पूर्वी, राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवारांचे प्रशिक्षण १ जुलैपासून सुरु करण्याचे नियोजन आहे. राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये आठ हजार उमेदवार प्रशिक्षण पूर्ण करतील, अशी व्यवस्था केली आहे.
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.