महत्त्वाचे – 100 पोलीस पाटलांची भरती लवकरच अपेक्षित!! Police Patil Bharti 2022
Police Patil Bharti 2022
Police Patil Bharti 2022
दापोलीतील पोलिस पाटील यांची १७७ मंजूर पदांपैकी ८९ पदे रिक्त आहे. व ८८ पदांवर पोलीस पाटील कार्यरत आहेत.
पनवेल आणि उरण तालुकयात पोलीस पाटील पदाच्या १०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ह्या तालुक्यांमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ह्या तालुकात म्हणजे पनवेल आणि उरणमधील १०० पोलीस पाटील पदाची भरती लवकरच केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅7 वी, 12 वी व इतर उमेदवारांना संधी; बाल संरक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | UT Administration Daman & Diu Bharti 2022
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती | SECR Nagpur Bharti 2022
✅खुशखबर!! भारतीय लष्कर अग्निवीर (जनरल ड्युटी) महिला भरती रॅली नोटिफिकेशन जाहीर!! Agniveer Women Bharti 2022
✅10 वी, ITI उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 1635 रिक्त पदांची भरती | BSF Bharti 2022
✅खुशखबर!! रेल्वेत लवकरच 1.4 लाख लोकांना रोजगार!! Indian Railways Bharti 2022
Police Patil Bharti 2022
गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहितीन पोलीस पाटील यांच्याकडून शासनाला दिली जाते. गावात शांतता राखण्याचे कामही याच पोलीस पाटलांच्या खांद्यावर असते. त्यामुळे पोलीस पाटलांच्या पदाला महत्त्व आहे. पनवेल व उरणमध्ये एकूण २०७ पोलीस पाटलांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी १०७ जागांवर पोलीस पाटलांची नियुक्ती यापूर्वी करण्यात आलेली आहे. १०० जागा रिक्त आहेत. यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. या १०० पैकी २९ ठिकाणी महिला पोलीस पाटील होणार आहेत. अनुसूचित जातीसाठी १२ पोलीस पाटील यापैकी ४ महिला, अनुसूचित जमातीसाठी १४ पोलीस पाटीलांपैकी ४ महिला, विमुक्त जाती अ साठी ६ पोलीस पाटील यापैकी ० महिला, भटक्या जमाती ब साठी ५ पोलीस पाटील यापैकी महिला २, भटक्या जमाती क साठी पोलीस पाटील ६ यापैकी महिला २, भटक्या जमाती ड साठी पोलीस पाटील ४ यापैकी महिला १, विशेष मागास प्रवर्गसाठी पोलीस पाटील १ यापैकी महिला ०, इतर मागासवर्गासाठी पोलीस पाटील ९,यापैकी महिला ३, तर खुल्या प्रवर्गसाठी पोलीस पाटील ४३ असून महिला १३ असणार आहेत.
- मंजूर पदे – १७७
- कार्यकर – ८८
- रिक्त पदे – ८९
पोलिसांनंतर गावात शांतता राखण्याचे काम करणाऱ्या पोलिस पाटलांची दापोली तालुक्यात ८९ पदे रिक्त असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना दाखल्यासाठी दुसऱ्या पोलिस पाटलांकडे पायपीट करत हेलपाटे मारावे लागत आहे.
- गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती पोलिस पाटील यांच्याकडून शासनाला दिली जाते.
- गावात शांतता राखण्याचे कामही याच पोलिस पाटलांच्या खांद्यावर असते.
- त्याचबरोबर शासकीय कामांसाठी पोलिस पाटलांकडून रहिवासी दाखला घ्यावा लागतो.
- दापोली तालुक्यात पोलिस पाटलांची १७७ पदे मंजूर असून, त्यातील ८८ पोलिस पाटील कार्यरत असून उर्वरित ८९ पदे रिक्त आहेत.
- दापोलीत काही महत्वपूर्ण गावे आहेत; मात्र या गावांमध्ये विशिष्ट समाजासाठी आरक्षण पडल्यामुळे उमेदवार न मिळाल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत.
तीन ते चार वर्षांपूर्वी पोलिस पाटील पदासाठी आरक्षणे जाहीर झाली; मात्र या समाजातील उमेदवार न मिळाल्याने त्या गावातील पदे अद्याप रिक्त आहेत. ज्या गावात पोलिस पाटील पद रिक्त आहे त्या ठिकाणी लगतच्या गावातील पोलिस पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस पाटील रिक्त असलेल्या गावातील नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी लगतच्या गावातील पोलिस पाटील यांना भेटण्यासाठी जावे. त्यामुळे पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.