पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल, कोणती कागदपत्रे आवश्यक? | Prime Ministers Employment Generation Program

0
77
Prime Ministers Employment Generation Program
Prime Ministers Employment Generation Program

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल, कोणती कागदपत्रे आवश्यक? | Prime Ministers Employment Generation Program

Latest Update 2023 

कर्ज परतफेडीचा कालावधी

 • बँक कर्ज परतफेडीचा कालावधी ३ ते ७ वर्षापर्यंतचा असतो. बँक कर्जाचा व्याजदर प्रचलित दराप्रमाणे (Normal interest) असतो.
 • कर्ज मंजूरीनंतर व वाटपापूर्वी लाभार्थ्याने संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण (EDP Training) घेतलेले असणे अनिर्वाय आहे.
 • लाभार्थ्यास कर्जाचा पहिला हप्ता वाटप केल्यानंतर नोडल बँकेत मार्जिन मनी अनुदानासाठी केस पाठविले जाते.
 • त्यानंतर अनुदानीत अमाऊंट नोडल बँकेकडून कर्ज देणा-या बँकेस वितरीत करण्यात येते.
 • वितरीत करण्यात आलेले अनुदान लाभार्थीचे नांवे ३ वर्षाकरिता टर्म डिपॉझिट रिसीट मध्ये डिपॉझिट करण्यात येते.
 • तीन वर्षानंतर आवश्यक ती खात्री केल्यानंतर अनुदानीत रक्कम कर्ज खात्यात पाठवली जाते.
 • याप्रकारे लाभार्थीस त्याच्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज सुविधा तसेच अनुदान सुविधा उपलब्ध करण्यात येते.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

PMEGP ऑनलाइन अर्ज करण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे –

 1. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी PMEGP च्या अधिकृत वेबसाइटला (खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची वेबसाइट) भेट द्या किंवा येथे क्लिक करा: https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp
 1. ऑनलाइन PMEGP अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा आणि तुमच्या माहितीनुसार सर्व आवश्यक तपशील भरा
 2. सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर, भरलेले ट्रॅक सेव्ह करण्यासाठी ‘सेव्ह अॅप्लिकंट डेटा’ वर क्लिक करा.
 3. तुम्ही तुमचा डेटा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अर्जाच्या अंतिम सबमिशनसाठी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील
 4. अर्ज पूर्ण झाल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, अर्जदाराचा आयडी क्रमांक आणि पासवर्ड त्याच्या/तिच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जाईल.

पीएमईजीपी योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्याची पायरी (ऑफलाइन)

 1. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
 2. सर्व माहिती भरल्यानंतर, अर्ज मसुदा म्हणून जतन करा.
 3. अर्जाची प्रिंटआउट घ्या.
 4. अर्जाची प्रिंटआउट जवळच्या कार्यालयात जमा करा.
 5. संबंधित बँकेने केलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करा.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची ठळक वैशिष्ट्ये –

 • २५ लाखांपर्यंत गुंतवणुकीचे उद्योग तथा १० लाख पर्यंतच्या व्यवसाय सेवा घटक प्रकल्पांना ९० ते ९५ टक्के कर्ज राष्ट्रीयीकृत बँका तथा विभागीय ग्रामीण बँका, आयडीबीआय मार्फत उपलब्ध होते.
 • उर्वरित ५ ते १० टक्के रक्कम अर्जदारास भरावी लागते. एकूण कर्जापैकी सर्वसाधारण गटातील उमेदवाराला शहरी भागात १५ टक्के व ग्रामीण भागात २५ टक्के मार्जिन मनी अनुदान प्राप्त होते.
 • तथा विशेष गटातील उमेदवाराला शहरी भागात २५ टक्के व ग्रामीण भागात ३५ टक्के मार्जिन मनी अनुदान प्राप्त होते. विशेष गटात अनुसूचित जाती/जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्यांक, महिला, अपंग उमेदवार, माजी सैनिक यांचा समावेश होतो.
 • वय अठरा वर्षे पूर्ण असलेला उमेदवार पात्र असून उत्पन्नाची अट नाही. तथापि ५ लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीचे व्यापार सेवा घटकासाठी, तसेच १० लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीच्या उद्योग प्रकल्पासाठी शिक्षण आठवी वर्ग पास अन्यथा शिक्षणाची अट नाही.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची उदिष्ट्ये –

 • स्वयं रोजगाराच्या नव्या उद्योगांमार्फत/परियोजनातून/सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून देशातील शहरी क्षेत्रांबरोबरच ग्रामीण क्षेत्रात देखील रोजगाराची हमी देणे.
 • पारंपारिक/ ग्रामीण आणि शहरी कारागीरांना व बेरोजगार तरुणांना व्यापक स्वरुपात एकत्र आणणे आणि त्यांना यथासंभव त्यांच्या जागेतच स्वयंरोजगार मिळवून देणे.
 • पारंपारिक/ग्रामीण आणि शहरी कारागीरांना व बेरोजगार तरुणांना कायमस्वरुपी आणि टिकाऊ असा स्वयंरोजगार देणे, जेणेकरुन त्या गावातील तरुण लोक शहराकडे जाणे टाळतील.
 • पारंपारिक कामगारांची पैसे मिळवण्याची क्षमता वाढविणे आणि तसेच ग्रामीण आणि शहरातील बेरोजगारांची संख्या कमी करणे आणि त्याच्या विकासात वाढ करणे.

PMEGP ई-ट्रॅकिंग सिस्टमद्वारे पीएमईजीपी कर्ज अर्जाची स्थिती तपासण्यासाठी स्टेप्स

 1. PMEGP च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा या लिंकवर क्लिक करा: gov.in/pmegp/
 2. नवीन पेज उघडण्यासाठी ‘नोंदणीकृत अर्जदारासाठी लॉगिन फॉर्म’ वर क्लिक करा जिथे तुम्ही लॉगिन आणि पासवर्ड फील्ड पाहू शकता.
 3. तुमचा आयडी आणि पासवर्ड टाका आणि लॉगिन वर क्लिक करा
 4. शेवटी तुमच्या PMEGP कर्ज अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, तुम्हाला ‘स्थिती पहा’ वर क्लिक करावे लागेल.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

PMEGP कर्ज तपशील

पीएमईजीपी कर्ज वाटप: पीएमईजीपी कर्जाच्या अंतर्गत दिलेल्या पैशाच्या ब्रेकअपवर एक नजर आहे

 1. अर्ज मंजूर झाल्यानंतर, बँक प्रकल्प खर्चाच्या ९५ टक्के (समाजातील दुर्बल घटकांसाठी) किंवा ९० टक्के (सामान्य अर्जदारांसाठी) वाटप करते.
 2. यापैकी १५-३५ टक्के मार्जिन मनी किंवा सबसिडी आहे जी सरकार प्रदान करते. बँकांकडून घेतलेल्या मार्जिन मनीची रक्कम अर्जदाराने घेतलेल्या वास्तविक भांडवली खर्चाच्या प्रमाणात असेल. उर्वरित मार्जिन मनी जी न मिळालेल्या रकमेच्या प्रमाणात आहे ती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला (KVIC) परत केली जाईल.
 3. कार्यरत भांडवलाची आवश्यकता PMEGP कर्जासाठी आवश्यक आहे की मार्जिन मनी लॉक केल्यानंतर तीन वर्षांत किमान एकदा कार्यरत भांडवल खर्च रोख क्रेडिट मर्यादेइतका असावा. शिवाय, तो मंजूर मर्यादेच्या ७५ टक्के पेक्षा कमी नसावा.

पीएमईजीपी योजनेंतर्गत कोणत्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते हे सूचक क्षेत्र:

 • पीएमईजीपी कर्ज खालील क्षेत्रातील उद्योगांसाठी दिले जाते:
 • कृषी आधारित अन्न प्रक्रिया
 • वन-आधारित उत्पादने
 • हाताने तयार केलेला कागद आणि फायबर
 • खनिज-आधारित उत्पादने
 • पॉलिमर आणि केमिकल-आधारित उत्पादने
 • ग्रामीण अभियांत्रिकी आणि बायो-टेक
 • सेवा आणि वस्त्र

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची 'ही' योजना तुम्हाला माहितीये का?
बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची ‘ही’ योजना तुम्हाला माहितीये का?
Bhagyashree Kanya Yojana Maharashtra
Bhagyashree Kanya Yojana Maharashtra

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here