नवीन अपडेट – प्राध्यापकांच्या 2 हजार 88 जागा भरण्यास मान्यता; जाणून घ्या सविस्तर माहिती | Professor Bharti 2022

0
429

नवीन अपडेट – प्राध्यापकांच्या 2 हजार 88 जागा भरण्यास मान्यता; जाणून घ्या सविस्तर माहिती | Professor Bharti 2022

Professor Bharti 2022

Professor Bharti 2022 – Latest Update

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त आठ हजार पदांपैकी २ हजार ८८ जागा भरण्यास मान्यता दिली आहे. या भरतीनंतर आढावा घेऊन उर्वरित जागा भरतीस मान्यता देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 अन्य महत्वाच्या भरती

12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!

Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!

Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!

Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022

Professor Bharti 2022 – Latest Update

 • मराठवाडा विद्यापीठास शुक्रवारी (ता. नऊ) चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे आदींची उपस्थिती होती. श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ‘सारथी’च्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणीपासून छात्रवृत्ती देणे, उच्चशिक्षणाचा नवीन आकृतिबंध मातृभाषेतून शिक्षण यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले.

अकृषी विद्यापीठांत भरतीस मान्यता; 659 पदे भरणार | Professor Recuitment 2022

Professor Bharti 2022  : The latest update for Professor Recruitment 2022. As per the latest news, The Department of Higher and Technical Education has approved the recruitment of 659 posts of approved teachers and teacher equivalents in 15 non-agricultural universities and recognized universities of the state. Further details are as follows:-

राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे व शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील मंजूर असलेल्या शिक्षक आणि शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदे भरती करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विविध विद्यापीठांमधील रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला असला तरीही प्रत्यक्षात एकूण एक हजार १६६ जागा रिक्त आहेत. त्यातील ६५९ जागा भरण्यासाठी मान्यता मिळाली असून उर्वरित ५०७ जागा रिक्त राहणार आहेत.

घटनाक्रम –

 • – राज्य सरकारने २५ मे २०१७ च्या निर्णयानुसार सर्व विभागांतील पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर होईपर्यंत बंदी घातली होती.
 • – त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली अकृषी विद्यापीठातील शिक्षकीय पदांचा आकृतीबंध सुधारित करण्याची कार्यवाही सुरू झाली
 • – या काळात सेवानिवृत्ती व इतर कारणास्तव विद्यापीठांमधील अनेक पदे रिक्त झाली.
 • – शासनाने नेमलेल्या उपसमितीच्या १६ जुलै २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत १५ अकृषी आणि अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर पदांच्या ८० टक्के इतक्या मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता मिळाली.
 • – उपसमितीने दिलेल्या मंजुरीनुसार ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यात सरकारने मान्यता दिली
 • – त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत वित्त विभागाने पदभरतीवर निर्बंध आणले
 • – त्यामुळे ही पदे मान्य होऊनही भरता आली नाहीत.
 • – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव पुन्हा वित्त विभागास सादर करण्यात आला
 • – त्याअनुषंगाने वित्त विभागाने स्थापन केलेल्या उपसमितीच्या १८ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये याबाबत प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला
 • – बैठकीत उपसमितीने ६५९ पदे भरण्यास मंजुरी दिली.
 • – आता राज्यातील १५ अकृषी विद्यापीठे आणि सरकार मान्य अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर असलेल्या शिक्षक व शिक्षक समकक्ष अशा एकूण ६५९ पदांच्या भरतीला मान्यता दिल्याचा अध्यादेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढला आहे.

Professor Recruitment – Vacancy Details 

विद्यापीठाचे नाव : मंजूर पदे : रिक्त पदे : भरतीस मान्यता मिळालेली पदे

 • मुंबई विद्यापीठ : ३७८ : २११ : १३६
 • एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई : २५८ : १२९ : ७८
 • कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक : ४३ : २१ : १२
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : ३३९ : १६० : ९२
 • गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : ४३ : २० : ११
 • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : ४६ : १६ : ०७
 • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : २६२ : १२४ : ७२
 • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ४०० : १९१ : १११
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद : २७२ :१२८ : ७३
 • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : १११ : २८ : ०६
 • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : १६७ : ५४: २१
 • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : १२१ : ३७ : १३
 • डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे : ५३ : २५ : १४
 • गोखले अभिमत विद्यापीठ, पुणे : २४ : १३ : ०८
 • टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठ, पुणे : १७ : ०९ :०५

Previous Update –

1300 प्राध्यापकांच्या रिक्त पदांपैकी 463 भरतीस मान्यता 

 • राज्यभरातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या सुमारे 15 हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.
 • गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक पदांची भरती झाली नसल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
 • दुसरीकडे सीएचबी प्राध्यापकांवरील ताण वाढत चालला आहे.
 • प्राध्यापकांची रिक्त जागा भरण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली, तरीही दोन वर्षांपासून प्राध्यापक भरती रखडली आहे.
 • प्राध्यापकांच्या रिक्त व पदभरतीच्या मंजूर जागा यांचा ताळमेळ नाही.
 • मागील काही वर्षांत महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक निवृत्त झाले आहेत.
 • या जागादेखील सरकारने अद्याप भरलेल्या नाहीत.
 • त्यामुळे महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत सापडले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 2017 च्या पटसंख्येनुसार प्राध्यापकांच्या 2 हजार 88 जागा भरण्यास मंजुरी दिली आहे. 3 नोव्हेंबर 2108 च्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर विभागातील केवळ 463 प्राध्यापकांची पदे भरण्यात येणार आहेत. महाविद्यालयांकडून 31 ऑक्टोबरपर्यंत आवश्यक सर्व कागदपत्रांसह पदभरती ना-हरकत प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव मागवून घेऊन त्यावर कार्यवाही करावी, असे आदेश उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी नुकतेच सर्व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत. कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे महाविद्यालयांचे येणारे प्रस्ताव तपासून पुणे कार्यालयामार्फत राज्य शासनास पाठविले जात आहेत.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here