समूहदर्शक शब्द – Samuhdarshak Shabd / Collective Words
मराठी व्याकरणातील आपण सोपे भाग अगोदर बघतो आहे. यातील समूहदर्शक शब्द हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.समूहदर्शक शब्द आपल्याला जसेच्या तसे स्पर्धा परीक्षेला न विचारता ते वाक्यात रिकाम्या जागा भरायला सांगतात.
एका पेक्षा जास्त वस्तू , घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्यांना समूहदर्शक शब्द म्हणले जाते.
समूह : शब्द
आंब्याच्या झाडांची : आमराई
उतारुंची : झुंबड
उपकरणांचा : संच
उंटांचा/ लमानांचा : तांडा
केसांचा : पुंजका, झुबका
करवंदाची : जाळी
केळ्यांचा : घड, लोंगर
काजूंची : गाथण
किल्ल्यांचा, चाव्यांचा : जुडगा
खेळाडूंचा : संघ
माशांची : गाथण
गाईगुरांचे : खिल्लार
गुरांचा : कळप
गवताचा : भारा
गवताची : पेंडी, गंजी
चोरांची, दरोडेखोरांची : टोळी
जहाजांचा : काफीला
ताऱ्यांचा : पुंजका
तारकांचा : पुंज
द्राक्षांचा : घड, घोस
दुर्वाची : जुडी
धान्याची : रास
नोटांचे : पुडके
नाण्यांची : चळत
नारळाचा : ढीग
पक्ष्यांचा : थवा
प्रशपत्रिकांचा, पुस्तकांचा : संच
पालेभाजीची : जुडी, गड्डी
वह्यांचा : गठ्ठा
पोत्यांची, नोटांची : थप्पी
पिकत घातलेल्या आंब्याची : अढी
फळांचा : घोस
फुलझाडांचा : ताडवा
फुलांचा : गुच्छ
बांबूचे : बेट
भाकरीची : चळड
मडक्यांची : उतरंड
महिलांचे : मंडळ
लाकडांची, उसाची : मोळी
वाघाचा : वृंद
विटांचा, कलिंगडाचा : ढीग
विद्यार्थ्यांचा : गट
माणसांचा : जमाव
मुलांचा : घोळका
मुग्यांची : रांग
मेंढ्याचा : कळप
विमानांचा : ताफा
वेलींचा : कुंज
साधूंचा : जथा
हरणांचा, हत्तींचा : कळप
सैनिकांची/चे : तुकडी, पलटण, पथक
ढगांचा : घनमंडल
फळांचा : घोस
मुलांचा, मुलींचा : घोळका
माणसांचा : घोळका
पोळ्यांची : चवड, चळत
घरांची : चाळ
केसांची : जट
चाव्यांचा : जुडगा
वानरांची : टोळी
वाळूचा : ढीग
फुल झाडांचा : ताटवा